ज्या दिवशी पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा कोश असलेला तंबू उभा करण्यात आला त्या दिवशी परमेश्वराच्या ढगाने त्याच्यावर छाया केली; रात्री तो पवित्र निवास मंडपावरील ढग अग्नि सारखा दिसला.
Cross references
दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे.
इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला.
तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसरच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला.
जेव्हा मोशे तंबूत जाई तेव्हा उंच ढग खाली उतरून येई आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा पवित्र मंडप उभा कर.
योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली.
मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला.
दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने पवित्र निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
परमेश्वराचा मेघ दिवसा पवित्र निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.
प्रत्येक दिवशी परमेश्वराचा ढग त्यांच्यावर राहून त्यांना मार्ग दाखवीत असे.
मिसरमधल्या लोकांनी कनानच्या लोकांना हे सांगितले आहे. तू परमेश्वर आहेस हे त्यांना अगोदरच माहीत झालेले आहे. तू आपल्या लोकांबरोबर असतोस हे त्यांना माहीत झाले आहे. लोकांनी तुला पाहिले हे त्यांना माहीत आहे. लोकांना खास ढगाविषयी माहिती आहे. तुझ्या लोकांना मार्ग दाखविण्यासाठी तू त्या ढगाचा उपयोग करतोस हे त्या लोकांना माहीत आहे. रात्री त्या ढगाचा अग्नी होतो आणि तुझ्या लोकांना मार्ग दाखवतो हे ही त्यांना माहीत आहे.
मोशेने त्या काठ्या कराराच्या मंडपात परमेश्वरा पुढे ठेवल्या.
दिवसा तू त्यांना (आमच्या पूर्वजांना) मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री तू अग्निस्तंभ वापरलास. अशा प्रकारे त्यांचा मार्ग प्रकाशमान करत तू त्यांना वाट दाखवलीस.
तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्निस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवत राहिलास.
देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा व रात्री अग्रीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
देवाने ढग पांघरुणासारखे पसरले. देवाने अग्रिच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल.
तो करुबाकडे गेला तेव्हा करुब मंदिराच्या दक्षिणेकडील भागात उभे होते. ढगाने आतले अंगण व्यापले.
बंधूनो, तुम्हांला हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.