जेव्हा मोशे तंबूत जाई तेव्हा उंच ढग खाली उतरून येई आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे.
Cross references
देवाचे अब्राहामाशी बोलणे संपल्यावर देव अब्राहामाला सोडून वर (स्वर्गात) गेला, व अब्राहाम तेथे एकटाच राहीला;
मग अब्राहामाशी बोलणे संपविल्यावर परमेश्वर निघून गेला आणि अब्राहाम आपल्या तंबूकडे परत गेला.
दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे.
मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवदतांच्यामधुन मी तुझ्याशी बोलेन; आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
या प्रमाणे परमेश्वराने सीनाय पर्वतावर मोशे बरोबर आपले बोलणे संपविले व मग त्याने आपल्या बोटांनी लिहिलेल्या दोन सपाट दगडी पाट्या (आज्ञापट) मोशेला दिल्या.
ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोरबोलत असे. परमेश्वराशी बोलल्यानंतर मोशे नेहमीआपल्या छावणीत माघारी जाई तरी मोशेचा मदतनीस. नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
तुझ्याबरोबर कोणालाही चढून वर येण्याची परवानगी नाही; पर्वतावरील कोणत्याच ठिकाणी कोणी माणूस देखील दिसू नये; तसेच तुझ्या जनावरांच्या खिल्लारांना व मेंढ्यांच्या कळपांना पर्वताच्या पायध्याशी देखील चरु देऊ नयेस.
“परमेश्वर तू जर मजवर खूष असशील तर कृपा करून आमच्याबरोबर चाल! हे लोक ताठमानेचे आहेत हे मला माहीत आहे; परंतु आम्ही केलेल्या पापाबद्दल तू आम्हाला क्षमा कर! आणि तुझे लोक म्हणून आमचा स्वीकार कर.”
मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.
मग मी खाली येऊन तेथे तुझ्याशी बोलेन. मग तुझ्यावर असलेल्या आत्म्यातून काही भाग मी त्यांनाही देईन. मग लोकांची काळजी घेण्यास ते तुला मदत करतील. ह्या प्रकारे इस्राएल लोकांची जबाबदारी केवळ तुझ्या एकट्यावर राहणार नाही.
दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वारी असलेल्या मेघस्तंभात परमेश्वर प्रगट झाला.
देव उंच ढगांतून बोलला. त्यांनी त्याच्या आज्ञा पाळल्या आणि देवाने त्यांना नियम दिले.
मग तेथेच परमेश्वराचा वरदहस्त मला लाभला. तो मला म्हणाला, “उठ आणि दरीकडे जा. तेथे मी तुझ्याशी बोलेन.”