तो ढग सतत पवित्र निवास मंडपावर असे आणि रात्री तो अग्निसारखा दिसे.
Cross references
दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे.
परमेश्वराचा मेघ दिवसा पवित्र निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.
अशा प्रकारे तळ कधी हलवावा व कधी थांबून तळ कोठे ठोकावा हे परमेश्वर इस्राएल लोकांना दाखवीत असे. जोपर्यंत ढग पवित्र निवास मंडपावर राही तोपर्यंत इस्राएल लोक आपला मुक्काम तेथेच ठेवीत.
प्रवासात तो तुमच्यासाठी मुक्कामाचे ठिकाण शोधायला तसेच रात्री अग्नीत व दिवसा मेघात प्रकट होऊन तुम्हाला मार्गदर्शन करायला तुमच्यापुढे चालत असे.
दिवसा तू त्यांना (आमच्या पूर्वजांना) मेघस्तंभाने मार्गदर्शन केलेस आणि रात्री तू अग्निस्तंभ वापरलास. अशा प्रकारे त्यांचा मार्ग प्रकाशमान करत तू त्यांना वाट दाखवलीस.
तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्निस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवत राहिलास.
देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा व रात्री अग्रीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
देवाने ढग पांघरुणासारखे पसरले. देवाने अग्रिच्या खांबाचा रात्री प्रकाशासाठी उपयोग केला.
ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल.
बंधूनो, तुम्हांला हे माहीत असावे असे मला वाटते की, आपले सर्व पूर्वज मेघाखाली होते. ते सर्व तांबड्या समुद्रातून सुखरुप पार गेले.
देव ख्रिस्तामध्ये जगाशी स्वत:चा समेट करीत होता. मनुष्यांची पापे त्यांच्याविरुद्ध मोजत नव्हता. आणि त्याने आम्हांला समेटाचा संदेश दिला आहे.
आणि स्वर्गातील सिंहासनापासून झालेली मोठी वाणी मी ऐकली.ती वाणी म्हणाली, “आता माणसांच्या बरोबर देवाची वस्ती आहे. आणि तो त्यांच्या बरोबर राहील. आणि तो त्यांचा देवहोईल.