Home Bibles निर्गम 40:2 · मराठी बायबल
निर्गम 40:2 · मराठी बायबल

“पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी दर्शनमंडपाचा पवित्र मंडप उभा कर.

Cross references

निर्गम 12:1

मोशे व अहरोन अद्याप मिसरमध्ये असताना परमेश्वर त्यांच्याशी बोलला. तोम्हणाला,

निर्गम 13:4

आज अबीब महिन्यात तुम्ही मिसर सोडून निघत आहात.

निर्गम 26:1

परमेश्वर मोशेला म्हणाला, “पवित्र निवास मंडप कातलेल्या तलम सणाच्या कापडाच्या दहा पडद्यांपासून व निव्व्या, जांभव्व्या व किरमिजी रंगाच्या सुतापासून तयार करावा. एखाद्या शिवणकाम करणाऱ्या कुशल कारागिराकडून त्या पडद्यांवर, पसरलेल्या पंखाच्या करुब देवदूतांची चित्रे शिवावीत.

निर्गम 26:7

“त्यानंतर ह्या पवित्र निवास मंडपाला झाकून टाकणारा असा दुसरा मंडप बकऱ्याच्या केसापासून तयार केलेल्या अकरा पडद्यांच्या सहाय्याने तयार करावा.

निर्गम 26:30

मी तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणे पवित्र निवास मंडप बांधावा.

निर्गम 27:21

अहरोन व त्याची मुले यांनी दिवा जळत ठेवण्याची काळजी घ्यावी; अंतरपटातील पडद्यामागील आज्ञापटाच्या बाहेर असलेल्या दर्शन मंडपात त्यांनी जावे; आणि तो दीपवृक्ष संध्याकाळापासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर जळत ठेवण्याची खातरीने सोय करावी; हा इस्राएल लोकांसाठी व त्यांच्या वंशासाठी पिढ्यान्पिढ्या कायमचा विधी आहे; तो त्यांनी पाळलाच पाहिचे.”

निर्गम 30:36

त्यातले काही कुटून त्याचे चूर्ण करावे, व ते दर्शन मंडपात पवित्र करारापुढे ठेवावे; ह्याच कोशापुढे मी तुला दर्शन देत जाईन; हे चूर्ण तुम्ही परमपवित्र लेखाचे.

निर्गम 35:11

पवित्र निवास मंडप, त्याचा बाहेरील तंबू व त्यावरील आच्छादान, त्याचे आकडे, फव्व्या, अडसर, खांब, व खुर्च्या;

निर्गम 36:18

हे दोन पडदे जोडून एक तंबू करण्यासाठी त्यांनी पितळेच्या पन्नास गोल कड्या केल्या.

निर्गम 40:6

“दर्शन मंडपाच्या म्हणजे पवित्रनिवास मंडपाच्या दारापुढे होमार्पणासाठी वेदी ठेव.

निर्गम 40:17

योग्य वेळी म्हणजे दुसऱ्या वर्षातील पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पवित्र निवास मंडपाची उभारणी झाली.

गणना 1:1

इस्राएल लोक मिसर देशातून निघाल्यावर दुसऱ्या वर्षाच्या दुसऱ्या महिन्याच्या पहिल्या दिवशी सीनाय रानातील दर्शनमंडपात परमेश्वर मोशेशी बोलला; तो म्हणाला,

गणना 7:1

मोशेने पवित्र निवास मंडप उभा करण्याचे काम संपविले व त्याच दिवशी परमेश्वराला तो समर्पित केला. त्याने पवित्र निवास मंडप, त्यातील सर्व सामान तसेच वेदी व तिच्या सोबत वापरावयाची उपकरणे ही सर्व तेलाच्या अभिषेकाने पवित्र केली. त्यावरुन त्या वस्तू फकत परमेश्वराच्या उपासनेकरिताच वापरावयाच्या आहेत हे दिसले.

2 इतिहास 29:3

हिज्कीयाने परमेश्वराच्या मंदिराचे दरवाजे उघडले आणि दुरुस्ती करुन ते मजबूत केले. राजा झाल्याबरोबर आपल्या कारभाराच्या पहिल्या महिन्यातच त्याने हे केले.

यहेज्केल 40:1

आमच्या परागंदा होण्याच्या काळातील पंचविसाव्या वर्षाच्या आरंभाला (आंक्टोंबरमध्ये) महिन्याच्या दहाव्या दिवशी परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. चौदा वर्षापूर्वी ह्याच दिवशी खास्द्यांनी यरुशलेम हस्तगत केले होते. दृष्टान्तात परमेश्वराने मला तेथे नेले.

यहेज्केल 45:18

परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो: “पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मंदिराच्या शुद्धतेसाठी तुम्ही निर्दोष गोऱ्हा द्यावा.

Interlinear

Choose Theme