नंतर लोकांच्या अर्ध्या भागातील प्रत्येक 50 वस्तू मधील एक वस्तू घ्या. त्यात माणसे, गायी, गाढवं, बकऱ्या व इतर प्राणी यांचा समावेश आहे. तो भाग लेवी लोकांना द्या. कारण लेवी लोक परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतात.”
Cross references
परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्रनिवास मंडपाच्या सभोंवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांवर संकट येणार नाही.”
अहरोन दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्याला मदत करतील आणि इस्राएल लोक परमेश्वराची सेवा करण्यास दर्शनमंडपात येतील तेव्हा त्या लोकांना मदत करतील.
दर्शन मंडपातील पवित्र निवास मंडप, बाह्य मंडप आणि आच्छादन यांची निगा राखण्याचे काम गेर्षोनी लोकांवर सोपविण्यात आले. दर्शन मंडपाच्या प्रवेश द्वारावरील पडद्याचीही निगा त्यांच्यावर सोपवली होती.
पवित्र कराराचा कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या, पवित्र मंडपात सेवेसाठी असलेली पात्रे, पडदा व इतर सर्व सामान ह्यांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांनी घेतली.
मरारीवंशातील लोकांना पवित्र निवास मंडपाच्या फळ्या व त्यांचे सर्व अडसर, खांब व उथळ्या आणि पवित्र निवास मंडपाच्या फळ्यांशी निगडीत अशा सर्व सामानाची निगा राखण्याचे काम देण्यात आले;
त्या वर्षाच्या अथवा त्याहून मोठे असलेल्या लेवी माणसांनी पाहिजे तर दर्शनमंडपात सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी; परंतु त्यांनी स्वत: सेवा करु नये. लेवी लोकांना सेवा करण्यास निवडून घेताना तू हा नियम पाळावा.”
परमेश्वर अहरोनला म्हणाला, “या पवित्र जागेविरुद्ध काही वाईट गोष्टी केल्या तर तू, तुझी मुले, तुझ्या वडिलांच्या कुटुंबातले सगळे लोक त्याला जबाबदार रहाल. तू आणि तुझी मुले याजकांविरुद्ध केलेल्या वाईट गोष्टींबद्दल जबाबदार राहाल.
लेवीचे जे वंशज दर्शन मंडपात काम करतात ते त्याच्याविरुद्ध केलेल्या पापाला जबाबदार असतील. हा नियम नेहमी अस्तीत्वात राहील. मी इस्राएल लोकांना जी जमीन देण्याचे वचन दिले आहे ती जमीन लेवीना मिळणार नाही.
युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भाग वेगळा करा. तो भाग परमेश्वराचा आहे. परमेश्वराचा 500 वस्तूत 1 वस्तू असा भाग आहे. त्यांत माणसे, गायी, गाढवे व मेंढ्या यांचा समावेश आहे.
यहोशवाने त्यांना इस्राएल लोकांचे दास केले. लाकडे फोडणे आणि पाणी भरणे ही कामे ते इस्राएल लोकांसाठी आणि परमेश्वराच्या वेदीसाठी करत राहिले. परमेश्वर जे ठिकाण वेदीसाठी निवडील तेथे तेथे त्यांनी हे केले. आजतागायत ते तसेच दास आहेत.
देवाच्या मंदिरावर पहारा करत ते रात्रभर जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
त्यांना नेमून दिल्याप्रमाणे ते वागत. पवित्र निवासमंडपाची देखभाल करत. पवित्र स्थानाचा संभाळ करत. आपले आप्त. याजक आणि अहरोनचे वंशज यांना ते सहाय्य करत. याजकांना ते परमेश्वरच्या मंदिराच्या सेवेत मदत करत.
अहीया हा लेवी घराण्यातील होता. देवाच्या मंदिरातील मौल्यवात चीजवस्तूंच्या कोठारावर तो प्रमुख होता. पवित्र उपकरणे ठेवलेल्या जागेची जबाबदारी अहीयावर होती.
मेंढपाळांच्या वस्त्यांवर आसाच्या सैन्याने धाड घातली. तेथून त्यांनी बरीच मेंढरे आणि उंट घेतले आणि ते यरुशलेमला परतले.
तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हांला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वत:चे रक्त देऊन विकत घेतली.
आणखी असे की, जबाबदारी असलेल्या कारभाऱ्याने विश्वासू असले पाहिजे.
तुम्हाला माहीत नाही काय मंदिरात जे काम करतात ते त्यांचे अन्र मंदिरातून घेतात, आणि जे नियमितपणे वेदीची सेवा करतात, ते वेदीवर जे अर्पण केले जाते त्यात सहभागी होतात.
आणि अर्खिप्पाला सांगा, “जी सेवा तुला प्रभूमध्ये मिळाली आहे ती पुढे चालू ठेव.”
आपल्या पुढाऱ्यांच्या आज्ञा पाळा आणि त्यांच्या अधीन असा. ज्यांना हिशेब द्यावयाचा असतो त्यांच्याप्रमाणे तुमच्या जीवासंबंधाने ते जागरूक असतात, त्यांच्या आज्ञा पाळा यासाठी की, त्यांनी त्यांचे काम दु:खाने न करता आनंदाने करावे.