यहोशवाने त्यांना इस्राएल लोकांचे दास केले. लाकडे फोडणे आणि पाणी भरणे ही कामे ते इस्राएल लोकांसाठी आणि परमेश्वराच्या वेदीसाठी करत राहिले. परमेश्वर जे ठिकाण वेदीसाठी निवडील तेथे तेथे त्यांनी हे केले. आजतागायत ते तसेच दास आहेत.
Cross references
युद्धावर गेलेल्या सैनिकांच्या हिश्श्यातून काही भाग वेगळा करा. तो भाग परमेश्वराचा आहे. परमेश्वराचा 500 वस्तूत 1 वस्तू असा भाग आहे. त्यांत माणसे, गायी, गाढवे व मेंढ्या यांचा समावेश आहे.
नंतर लोकांच्या अर्ध्या भागातील प्रत्येक 50 वस्तू मधील एक वस्तू घ्या. त्यात माणसे, गायी, गाढवं, बकऱ्या व इतर प्राणी यांचा समावेश आहे. तो भाग लेवी लोकांना द्या. कारण लेवी लोक परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतात.”
प्रत्येक 50 वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यांत पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतली.
तुमचा देव परमेश्वर तुमच्या सर्व वसाहतीतून एक विशिष्ट स्थान निवडून घेईल. आपल्या नावाची स्थापना तेथे करील. ते त्याचे खास निवासस्थान असेल. तेथे तुम्ही उपासनेसाठी जात जा.
मग परमेश्वर एक ठिकाणी आपले खास निवासस्थान निवडेल. त्याला तो आपले नाव देईल. तिथे तुम्ही मी सांगतो त्या सर्व वस्तू घेऊन जा-होमबली, यज्ञबली, धान्याचा व प्राण्यांचा दहावा हिस्सा,परमेश्वराला अर्पण करायच्या वस्तू, नवस फेडायच्या वस्तू आणि पाळीव पशुपक्षी यांचा पहिला गोऱ्हा.
परमेश्वर तुमच्या वसाहतीत कुठेतरी एक पवित्र जागा निवडील. तेथेच तुम्ही हे होमबली अर्पण करा व ज्या इतर गोष्टी करायला सांगितल्या त्या करा.
आणि लबानोनमधून आम्ही तुम्हाला हवे तितके लाकूड झाडे तोडून पाठवू. ओडक्यांचे तराफे करुन आम्ही ते इथून समुद्रमार्गे यापो येथे पोचते करु. तेथून ते तुम्ही यरुशलेमला न्यावे.”