देवाच्या मंदिरावर पहारा करत ते रात्रभर जागे राहत. दररोज सकाळी मंदिराचे दरवाजे उघडण्याचे काम त्यांच्याकडे होते.
Cross references
रात्र सरेपर्यंत शमुवेल आपल्या बिछान्यावर पडून राहिला. सकाळ होताच उठून त्याने मंदिराची दारे उघडली. आपल्याला झालेल्या दृष्टांताची हकीकत एलीला सांगायची त्याला भीती वाटली.
ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
परमेश्वराच्या सर्व सेवकांनो, त्याची स्तुती करा. तुम्ही सेवकांनी मंदिरात रात्रभर सेवा केली.
रेखाबी कुटुंबीयांना एकत्र केले आणि त्यांना परमेश्वराच्या मंदिरात आणले. आम्ही सर्व हानानच्या मुलांच्या खोलीत गेलो. हानान हा इग्दल्याचा मुलगा होता व तो ‘देवाचा माणूस’ होता. ही खोली यहूदाच्या राजपुत्रांच्या खोली शेजारी होती. द्वारपाळ मासेया याच्या खोलीच्या वर ही खोली होती. मंदिराचा द्वारपाळ मासेया हा शल्लूमचा मुलगा होता.
“तुमच्यातील काही याजकांनी मंदिराची प्रवेशद्वारे बंद करुन योग्यरीतीने अग्नी प्रज्वलित करु शकतात पण मी त्यांच्यावर प्रसन्न नाही. मी त्यांच्या भेटी स्वीकारणार नाही.” सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणाला,
जर कोणाला सेवेचे दान असेल तर त्याने सेवेला वाहून घ्यावे, कोणाला शिक्षणाचे दान असेल तर त्याने शिक्षणाला वाहून घ्यावे.