Home Bibles गणना 1:53 · मराठी बायबल
गणना 1:53 · मराठी बायबल

परंतु लेवी लोकांनी आपले तंबू पवित्रनिवास मंडपाच्या सभोंवती ठोकावेत; त्यांनी आज्ञापट असलेल्या पवित्र निवासमंडपाचे रक्षण करावे म्हणजे इस्राएल लोकांवर संकट येणार नाही.”

Cross references

लेवीय 10:6

मोशेने अहरोन व त्याचे मुलगे एलाजार व इथामार यांना सांगितले, “तुम्ही तुमचे केस मोकळे सोडू नका तर ते विंचरा, आणि तुमची वस्त्रे फाडू नका! तुमचे दु:ख दाखवू नका! म्हणजे मग तुम्ही मारले जाणार नाही आणि परमेश्वराचा राग सर्व मंडळीवर भडकणार नाही; सर्व इस्राएल घराणे तुमचे बांधव आहेत; नादाब व अबीहू ह्यांना परमेश्वराने अग्नीने भस्म केल्याबद्दल त्यांनी शोक करावा;

गणना 1:50

लेवी लोकांना सांग की आज्ञापटाच्या पवित्र निवास मंडपाबद्दल ते जबाबदार आहेत; पवित्र निवासमंडप व त्याबरोबर त्यातील सर्व सामानाची त्यांनी काळजी घ्यावी. पवित्रनिवास मंडप व त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे. त्यांनी आपले तंबू पवित्र निवास मंडपाभोवती ठोकावेत आणि त्याची निगा राखावी.

गणना 3:7

अहरोन दर्शनमंडपात सेवा करताना लेवी लोक त्याला मदत करतील आणि इस्राएल लोक परमेश्वराची सेवा करण्यास दर्शनमंडपात येतील तेव्हा त्या लोकांना मदत करतील.

गणना 3:38

मोशे, अहरोन व त्याचे मुलगे ह्यांची छावणी दर्शनमंडपाच्या समोर असलेल्या पवित्र निवास मंडपाच्या पूर्वेस होती. इस्राएल लोकांच्यावतीने पवित्र निवासस्थानाच्या रक्षणाचे काम त्यांना देण्यात आले. सर्व इस्राएलाकरिता त्यांनी हे काम केले. कोणी दुसरा पवित्र निवासस्थानाजवळ आल्यास त्याला जिवे मारावे असा त्यांना आदेश होता.

गणना 8:19

इस्राएल लोकातून मी लेवी लोक निवडले आहेत आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना मी ते दान म्हणून देत आहे. दर्शनमंडपात लेवी लोकांनी सर्व इस्राएल लोकाकरिता काम करावे अशी माझी इच्छा आहे. ते इस्राएल लोकांसाठी असलेली प्रायाश्चिताची अर्पणे करतील त्यामुळे इस्राएल लोक शुद्ध होतील. मग इस्राएल लोक पवित्रस्थानाजवळ आले तरी त्यांना भारी आजार किंवा त्रास होणार नाही.”

गणना 8:24

‘लेवी लोकासाठी विशेष आज्ञा अशी आहे की पंचवीस वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक वयाच्या प्रत्येक लेवी माणसाने दर्शनमंडपातील सेवा करण्यात भाग घ्यावा.

गणना 8:26

त्या वर्षाच्या अथवा त्याहून मोठे असलेल्या लेवी माणसांनी पाहिजे तर दर्शनमंडपात सेवा करणाऱ्या आपल्या बंधूंना त्यांच्या कामात मदत करावी; परंतु त्यांनी स्वत: सेवा करु नये. लेवी लोकांना सेवा करण्यास निवडून घेताना तू हा नियम पाळावा.”

गणना 16:9

तुमची निवड इस्राएलच्या देवाने केली आहे आणि तुम्हाला खास दर्जा दिला आहे म्हणून तुम्ही आनंदी असायला हवे. तुम्ही इस्राएलच्या इतर लोकांपेक्षा वेगळे आहात. परमेश्वराने तुम्हाला खास कामासाठी, इस्राएल लोकांना परमेश्वराची भक्ती करायला मदत व्हावी म्हणून त्याच्या पवित्र निवास मंडपात त्याच्या जवळ आणले. हे पुरेसे नाही का?

गणना 16:46

नंतर मोशे अहरोनला म्हणाला, “तुझे तांब्याचे भांडे आणि थोडासा अग्नी वेदीवरुन घे. नंतर त्यावर उद-धूप टाक. लवकर लोकांकडे जा आणि त्यांना शुद्ध करण्यासाठी काहीतरी कर. परमेश्वर त्यांच्यावर रागावला आहे. आजार पसरायला सुरुवात झाली होती.”

गणना 18:2

तुझ्या कुळातील इतर लेवी लोकांना आण. तुझ्याबरोबर आणि कराराच्या मंडपात काम करण्यासाठी ते तुला आणि तुझ्या मुलांना मदत करतील.

गणना 18:3

लेवी वंशातील लोक तुझ्या सत्तेखाली आहेत. मंडपात जे जे काम करायचे आहे ते ते लोक करतील. परंतु त्यांनी पवित्र स्थानाजवळ आणि वेदीजवळ जाता काम नये. जर ते गेले तर ते मरतील आणि तू सुद्धा मरशील.

गणना 18:4

ते तुझ्या बरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शन मंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशिल तेथे दुसरा कोणीही येऊ नये.

गणना 31:30

नंतर लोकांच्या अर्ध्या भागातील प्रत्येक 50 वस्तू मधील एक वस्तू घ्या. त्यात माणसे, गायी, गाढवं, बकऱ्या व इतर प्राणी यांचा समावेश आहे. तो भाग लेवी लोकांना द्या. कारण लेवी लोक परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतात.”

गणना 31:47

प्रत्येक 50 वस्तूमागे मोशेने एक वस्तू परमेश्वरासाठी घेतली. त्यांत पशू आणि माणसे याचा समावेश होता. नंतर त्याने या वस्तू लेवींना दिल्या. कारण त्यांनी परमेश्वराच्या पवित्र निवास मंडपाची काळजी घेतली.

1 शमुवेल 6:19

पण हा कोश दृष्टीस पडला तेव्हा तेथे याजक नव्हते. तेव्हा बेथशेमेश मधली सत्तर माणसे परमेश्वराने मारली. परमेश्वराने अशी कठोर शिक्षा करावी याबद्दल बेथशेमेशच्या लोकांनी आक्रोश केला.

1 इतिहास 23:32

त्यांना नेमून दिल्याप्रमाणे ते वागत. पवित्र निवासमंडपाची देखभाल करत. पवित्र स्थानाचा संभाळ करत. आपले आप्त. याजक आणि अहरोनचे वंशज यांना ते सहाय्य करत. याजकांना ते परमेश्वरच्या मंदिराच्या सेवेत मदत करत.

2 इतिहास 13:10

“पण आमच्यासाठी परमेश्वर हाच आमचा देव आहे. आम्ही त्याच्याकडे पाठ फिरवलेली नाही. त्याचा त्याग केलेला नाही. परमेश्वराची सेवा करणारे याजक अहरोनचे वंशज आहेत. लेवी त्यांना परमेश्वराच्या सेवेत मदत करतात.

2 इतिहास 13:11

परमेश्वराला ते होमार्पणे वाहतात, तसेच दररोज सकाळ संध्याकाळ सुवासिक धूप जाळतात. मंदिरातील मुद्दाम करवून घेतलेल्या मेजावर समर्पित भाकर मांडतात. रोज संध्याकाळी ते सोन्याच्या दीपवृक्षावरील दिवे लावतात. आम्ही आपल्या परमेश्वर देवाची काळजीपूर्वक सेवा करतो. पण तुम्ही परमेश्वराला सोडले आहे.

यिर्मया 5:31

संदेष्टे खोटे सांगतात, जे काम करण्यासाठी याजकांची निवड केली आहे, ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांना हे आवडते! पण तुमची शिक्षा जवळ आल्यावर तुम्ही काय कराल?”

यिर्मया 23:15

सर्वशक्तिमान परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल म्हणतो, “मी त्या संदेष्ट्यांना शिक्षा करीन. विषमिश्रित अन्न खाण्यासाखी वा जहरमिश्रित पाणी पिण्यासारखी ती शिक्षा असेल. संदेष्ट्यांनी हा आध्यात्मिक आजार आणला व तो सर्व देशात पसरला म्हणून मी त्यांना शिक्षा करीन. हा आजार यरुशलेममधील संदेष्ट्यांकडून आला.”

प्रेषितांचीं कृत्यें 20:28

तुमची स्वत:ची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हांला दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या. कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हांला दिलेले आहे. तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे. ही मंडळी देवाने स्वत:चे रक्त देऊन विकत घेतली.

1 तीमथ्याला 4:13

मी येईर्पांत लोकांमध्ये देवाचे वचन वाचण्यात, बोध करण्यात व शिकविण्यात स्वत:ला वाहून घे.

2 तीमथ्थाला 4:2

वचन गाजवीत राहा. सोयीच्या किंवा गैरसोयीच्या अशा कोणत्याही वेळी तुझे कार्य करण्यास तयार राहा. लोकांना जे करायचे आहे, त्याविषयी त्यांची खात्री पटव. जेव्हा ते चुका करतील तेव्हा त्यांना सावध कर; लोकांना उत्तेजन दे. आणि हे सर्व काळजीपूर्वक शिक्षण देण्याने व मोठ्या सहनशीलतेने कर.

Interlinear

Choose Theme