तू करशील ते प्रत्येक अन्नार्पण मिठाने रुचकर कर; तू आपल्या देवाशी केलेल्या कराराचे मीठ आपल्या अन्नार्पणात घालावयास चुकू नको; तुझ्या सर्व अर्पणाबरोबर मीठ पण अर्पावे.
Cross references
आणि गांध्याच्या कसबाप्रमाणे मिसळून त्यांचे सुवासिक धूप द्रव्य तयार करावे; तसेच त्यात मीठमिसळावे म्हणजे ते मिश्रण केलेल धूप द्रव्य शुद्ध व पवित्र होईल.
लोक ज्या पवित्र गोष्टी मला अर्पण करतात त्या मी परमेश्वर तुला देतो. तो तुझा वाटा आहे. मी तो तुला, तुझ्या मुलांना व मुलींना देत आहे. हा नियम सदैव अस्तित्वात राहील. तो परमेश्वराबरोबर केलेला पवित्र करार आहे. तो मोडतायेणार नाही. मी तुला आणि तुझ्या वंशजांना असे वचन देतो.”
दावीद आणि त्याची मुले यांनी इस्राएलवर सर्वकाळ राज्य करावे असा इस्राएलच्या परमेश्वर देवानेच त्यांना आधिकार दिला आहे हे ध्यानात घ्या. देवाने दावीदाशी तसा मिठाचा करारच केला आहे.
एज्राला द्यायच्या गोष्टी पुढीलप्रमाणे: चांदी 3 3/4 टन, गहू 600 बुशेल, द्राक्षारस 600 गंलन, जैतुनाचे तेल 600 गंलन, एज्राला पाहिजे तितके मीठ.
तू हे परमेश्वराला अर्पण करशील. याजक त्यावर मीठ टाकतील. मग ते त्यांना होमार्पण म्हणून अर्पण करतील.
“तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणा गेला तर ते पुन्हा खारट बनवता येणार नाही व ते निरूपयोगी बनेल. ते फेकून देण्याच्या लायकीचे बनेल. माणसे ते पायदळी तुडवतील.
कारण प्रत्येकाची अग्नीने परीक्षा घेतली जाईल.
तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त आणि मिठाने रुचकर केल्यासारखे असावे. यासाठी की प्रत्येक मनुष्याला कसे उत्तर द्यावे हे तुम्हांला कळावे.