Home Bibles लेवीय 2:12 · मराठी बायबल
लेवीय 2:12 · मराठी बायबल

प्रथम उत्पन्न म्हणून त्यांचे अर्पण परमेश्वराला करावे; पण ते सुवासिक अर्पण म्हणून वेदीवर अर्पू नये.

Cross references

उत्पत्ति 23:10

त्या वेळी तेथे एफ्रोन हित्ती हा हेथी लोकान बसलेला होता; तो त्या सर्वांच्या देखत अब्राहामाला म्हणाला,

उत्पत्ति 23:17

या प्रमाणे मम्रेच्या पूर्वेला असलेले मकपेला येथील शेत, गुहा व त्यातील सर्व झाडी यांवरील एफ्रोनाचा मालकी हक्क बदलून तो अब्राहामाला मिळाला;

निर्गम 22:29

“हंगामाच्या वेळी तुमच्या पहिल्या धान्यातून काही व फळफळांचा काही रस मला दान करावा, हंगामाच्या वर्षाच्या शेवटापर्यंत थांबू नये.“तू तुझा प्रथम जन्मलेला मुलगा मला द्यावा;

निर्गम 23:10

“सहा वर्षे जमिनीची मशागत करा; पेरणी करा; धान्य पिकवा; चांगला हंगाम येऊ द्या.

निर्गम 23:19

“हंगामाच्या वेळी जेव्हा तुम्ही धान्य गोळा करता तेव्हा त्या प्रत्येक प्रथम उपजातील उत्तम तुम्ही आधी परमेश्वराच्या मंदिरात आणावे“करडू त्याच्या आईच्या दुधात शिजवून खाऊ नये.”

लेवीय 7:13

शांत्यर्पण हे देवाकरिता शांत्यर्पणाच्या यज्ञासारखेच आहे म्हणून त्यासोबत त्याने खमीर घातलेल्या भाकरीही अर्पाव्या

लेवीय 23:10

“इस्राएल लोकांना सांग: मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही जाऊन पोहोंचाल व हंगामाच्या वेळी कापणी कराल त्यावेळी पिकाच्या पहिल्या उपजातील पेंढी तुम्ही याजकाकडे आणावी;

गणना 15:20

तुम्ही धान्य गोळा करुन ते दळाल आणि त्याचे भाकरीसाठी पीठ कराल. त्या पिठाचा पहिला भाग तुम्ही नेहमी परमेश्वराला अर्पण केला पाहिजे. हे मळणीच्या वेळी धान्यार्पण करतात त्याप्रमाणे हे अर्पण केले पाहिजे.

गणना 18:12

“आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षारस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वराला देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.

अनुवाद 26:10

आता हे परमेश्वरा, त्या भूमीतील पहिले उत्पन्न आम्ही आणले आहे.’“मग तो उत्पन्नाचा वाटा परमेश्वरासमोर ठेवून परमेश्वराला वंदन करा.

2 इतिहास 31:5

ही आज्ञा सर्व प्रजेच्या कानी गेली. त्याबरोबर इस्राएल लोकांनी आपले धान्याचे पीक, द्राक्ष, तेल, मध आणि इतर बागायती उत्पन्न या सगळ्याचा एकदशांश भाग आणून दिला.

1 करिंथकरांस 15:20

परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे.

प्रकटीकरण 14:4

हे लोक असे होते की त्यांनी स्त्रियांशी वाईट कर्म करुन स्वत:ला भ्रष्ट केले नाही. त्यांनी स्वत:ला शुद्ध राखले. कोकरा जेथेगेला तेथे ते गेले. हे पृथ्वीवरील लोकांमधून खंडणी भरुन मुक्त केलेले होते. देवाला आणि कोकऱ्याला अर्पिलेले ते पाहिलेआहेत.

Interlinear

Choose Theme