Home Bibles 1 करिंथकरांस 15:20 · मराठी बायबल
1 करिंथकरांस 15:20 · मराठी बायबल

परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मेलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथम फळ आहे.

Cross references

प्रेषितांचीं कृत्यें 26:23

त्यानुसार देवाचा अभिषिक्त जो ख्रिस्त (मशीहा) तो दु:ख सहन करील. आणि मेलेल्यांतून उठविला जाणाऱ्यांत तो पाहिला असेल. यहूदी लोकांना तसेच इतर विदेशी लोकांना देव प्रकाशात नेईल.”

रोमकरांस 8:11

आणि ज्या आत्म्याने येशूला मरणातून उठविले तो त्याचा आत्मा तुम्हांमध्ये राहतो त्या तुमच्या मर्त्य शरीराला जीवन देईल.

1 करिंथकरांस 15:6

नंतर तो एकाच वेळी पाचशे हून अधिक बांधवांना दिसला. त्यांच्यापैकी बहुसंख्य अजूनही जिवंत आहेत, तर काही मेले आहेत.

1 करिंथकरांस 15:23

पण प्रत्येक जण त्याच्या क्रमानुसार, ख्रिस्त जो प्रथम फळ आहे, आणि मग ख्रिस्त येण्याच्या वेळी त्याचे असलेले,

कलस्सैकरांस 1:18

आणि तो शरीराचा म्हणजे मंडळीचा मस्तक आहे. तो प्रारंभ आहे, मृतांमधून पुनरुत्थान पावलेल्यांमध्ये तो प्रथम आहे. यासाठी की प्रत्येक गोष्टीत त्याला प्रथम स्थान मिळावे.

1 पेत्र 1:3

आमच्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या पित्याची, देवाची स्तुति असो! त्याच्या महान दयेमुळे त्याने आमचा नवा जन्म होऊ दिला, आणि येशूला मेलेल्यातून उठविण्याने जिवंत व नवीन आशा दिली.

प्रकटीकरण 1:5

आणि येशू ख्रिस्त विश्वासू साक्षी आहे, जो मेलेल्यांमधून उठविले गेलेल्यांमध्ये पहिला आहे.पृथ्वीवरील राजांचा तो सत्ताधीश आहे. आणि जो येशू आमच्यावर प्रेम करतो, ज्या येशूने आम्हाला आमच्या पापांपासूनत्याच्या रक्ताने मुक्त केले;

Interlinear

Choose Theme