एकेकाळी ज्यांनी पौष्टिक अन्न खाल्ले, तेच आता रस्त्यावर मरत आहेत. जे चांगल्या, लाल कपड्यात वाढले, ते आता कचऱ्याच्या ढिगांतून मिळेल ते उचलतात.
Cross references
“तुमच्यामधील अत्यंत संवेदनशील आणि हळव्या मनाचा माणूससुध्दा क्रूर बनेल, मग इतरांची काय कथा! क्रौर्याने त्याची नजर इतरांकडे वळेल. आपली प्रिय पत्नी, अजून जिवंत असलेली मुले ही त्यातून सुटणार नाहीत.
“तुमच्यामधील अतिशय कोमल ह्दयाची आणि नाजूक बाईसुद्धा क्रूर बनेल. नाजुकपणाची कमाल म्हणजे आजतागायत तिने चालायला जमिनीवर पावलेही टेकवली नसतील. पण आता आपला प्राणप्रिय पती, आपली लाडकी मुले यांच्याबद्दलही ती निष्ठुर होईल.
इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.
पण रब-शाके त्यांना म्हणाला, “परमेश्वराने काही मला फक्त तुझ्याशी आणि तुझ्या राजाशी बोलायला पाठवलेले नाही तटबंदीवरील लोकांशीही मी बोलतो आहे. तुमच्याबरोबरच त्यांनाही स्वत:चे मलमूत्र चाटायची वेळ येणार आहे.”
ते डोंगरावर पावसात भिजतात. थंडीवाऱ्यापासून रक्षण करण्यासाठी त्यांच्याजवळ काही नसते म्हणून ते मोठ्या खडकांना चिकटून बसतात.
जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात.
परमेश्वर म्हणतो, “सीयोनमधल्या स्त्रिया फार गर्विष्ठ झाल्या आहेत. आपण इतर लोकांपेक्षा उच्च आहोत हे दाखवीत त्या ताठ मानेने वावरत असतात. त्या डोळे मारीत, आपल्या पैंजणांचा आवाज करीत ठुमकत चालतात.”
ह्या देशात राहणारे लोक दुष्कृत्यांचे धनी आहेत. म्हणून देवाने हा देश नष्ट करायचा पण केला. लोकांना शिक्षा होईल. फारच थोडे वाचतील.
तुम्ही काही स्त्रिया आता शांत आहात. तुम्हाला आता सुरक्षित वाटते आहे. पण तुम्ही जरा उभे राहून माझे म्हणणे ऐकावे.
सियोनच्या कन्ये, तू सुंदर कुरणासारखी आहेस.
‘मृत्यू आला आहे. तो चढून खिडक्यातून आना आला. मृत्यू राजवाड्यात आला. रस्त्यांवर खेळणाऱ्या आमच्या मुलांकडे आला. सार्वजनिक ठिकाणी जमणाऱ्या तरुणांकडे तो आला.’
यरुशलेममधील सर्व लोक उसासे टाकत आहेत. ते अन्न शोधत आहेत. तो अन्नाच्या बदल्यात त्यांच्याजवळच्या चांगल्या वस्तू देऊन टाकत आहेत. जगण्यासाठी ते असे करीत आहेत. यरुशलेम म्हणते, “परमेश्वरा, माझ्याकडे जरा पाहा! लोक माझा तिरस्कार कसा करतात ते बघ तरी!
तुम्ही लोक करीत असलेल्या कृत्यांमुळे शिक्षेचा दिवस जवळ जवळ येत आहे. तुम्ही त्या हिंसाचाराच्या नियमाला जवळ जवळ आणता.
नाही, मग काय पाहण्यासाठी तुम्ही गेला होता? कपडे घातलेला मनुष्य? नाही. तलम कपडे घालणारे आणि ऐषारामात राहणारे लोक राजवाड्यात राहतात.
तेव्हा डुकरे खातात त्या शेंगा तरी खाव्यात अशी त्याला इच्छा होई, पण कोणी त्याला काहीही दिले नाही.
“एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे.
पण जी विधवा चैनीत राहते, ती जरी जिवंत असेल तरी ती खरोखर मेलेली आहे.
तिने स्वत:ला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात तुम्ही तिला छळ व दु:ख द्या. ती तिच्या अंत:करणातगर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते, मी विधवा नाही.’ आणि मी केव्हाच शोक करणार नाही.