Home Bibles नीतिसूत्रे 31:21 · मराठी बायबल
नीतिसूत्रे 31:21 · मराठी बायबल

जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात.

Cross references

उत्पत्ति 45:22

तसेच त्याने प्रत्येक भावाला एक सुंदर पोशाख दिला; व बन्यामीनाला पाच सुंदर पोशाख आणि चांदीची तीनशे नाणी दिली.

2 शमुवेल 1:24

इस्राएली कन्यांनो, शौलासाठी शोक करा. किरमिजी वस्त्रे त्याने तुम्हाला दिली वस्त्रांवरचे सोन्याचे जरीकाम त्याने दिले.

नीतिसूत्रे 25:20

दु:खी माणसासमोर आनंदी गीत गाणे हे त्याला थंडी वाजत असताना त्याच्या अंगावरील कपडे काढून टाकण्यासारखे आहे. ते सोड्यात शिरका मिसळण्यासारखे आहे.

नहूम 2:4

रथ रस्त्यांतून मोकाटपणे धावत आहेत चौकांमधून ते पुढे-मागे कसेही पळत आहेत ते जळत्या मशालीप्रमाणे किंवा ठिकठिकाणी तळपणाऱ्या विजेप्रमाणे दिसत आहेत.

Interlinear

Choose Theme