तुम्ही लोक करीत असलेल्या कृत्यांमुळे शिक्षेचा दिवस जवळ जवळ येत आहे. तुम्ही त्या हिंसाचाराच्या नियमाला जवळ जवळ आणता.
Cross references
देवा, तू दुष्ट न्यायाधीशांना मदत करीत नाहीस. ते वाईट न्यायाधीश कायद्याचा दुरुपयोग करुन लोकांचे आयुष्य कठीण करतात.
लोकांना त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींबद्दल कधीच ताबडतोब शिक्षा केली जात नाही. त्यांना शिक्षा देण्यास विलंब लागतो आणि त्यामुळे इतरांनाही वाईट गोष्टी करण्याची इच्छा होते.
तू म्हणालीस, ‘मी चिरकाल राहीन. मी नेहमीच राणी होईन.’ तू त्या लोकांना वाईट वागविलेस हे तुझ्या लक्षात आले नाही. काय घडेल याचा तू विचार केला नाहीस.
ते येऊन म्हणतात, “आम्ही थोडा द्राक्षरस पिऊ, आम्ही थोडे मद्य पिऊ. आम्ही उद्याही असेच करू. फक्त थोडे जास्त मद्य पिऊ.”
“मानवपुत्रा, इस्राएल देशाबद्दल लोक पुढील गीत का म्हणतात?संकटे लवकर येणार नाहीत.दृष्टान्त खरे होणार नाहीत.
“मानवपुत्रा, तुला झालेला दृष्टान्त प्रत्यक्षात यायला खूप अवधी आहे असे इस्राएलच्या लोकांना वाटते. येथून पुढे अनेक वर्षांनी घडणाऱ्या गोष्टींबद्दल तू बोलत आहेस, असा त्यांचा समज आहे.
अश्दोद व मिसर यांच्या उंच मनोऱ्यांवरून पुढील संदेशाची घोषणा करा: “शोमरोनच्या पर्वतांवर या तेथे तुम्हाला भयंकर गोंधळ पाहायला मिळेल का? कारण लोकांना योग्य आचरण माहीत नाही. ते दुसऱ्यांशी क्रूरपणे वागले. दुसऱ्यांच्या वस्तू घेऊन त्यांनी त्यां उंच मनोऱ्यात लपवून ठेवल्या युध्दात लुटलेल्या वस्तूंनी त्यांचे खजिने भरून गेले आहेत.”
का? कारण मला तुमच्या पुष्कळ पापांची माहिती आहे. तुम्ही खरोखरच काही वाईट कृत्ये केली आहेत. योग्य आचरण करणाऱ्यांना पैसा घेता. न्यायालयात गरिबांवर अन्याय करता.
परमेश्वरचा खास न्यायाचा दिवस पाहण्याची तुमच्यापैकी कीहींची इच्छा आहे. तुम्हाला तो दिवस का बरे पहावयाचा आहे? परमेश्वराचा तो खास दिवस अंधार आणणार आहे, उजेड नाही.
घोडे खडकावरून धावतात का? नाही. लोक गायांच्या साहाय्याने जमीन नांगरतात का? नाही. पण तुम्ही सर्वकाही वरचे खाली करता. तुम्ही चांगुलपणा व न्याय यांचे वीष केले.
माझ्या लोकांतील पापी म्हणतात, “आमचे काही वाईट होणार नाही.’ पण त्या सर्वांना तलवारीने ठार मारले जाईल.”
“पण जर सेवक वाईट निघाला आणि आपला मालक लवकर घरी परत येणार नाही असे म्हणाला तर काय होईल?
जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!
आणि म्हणतील, “ख्रिस्ताच्या येण्याविषयीच्या अभिवचनाचे काय झाले? आम्हाला ते जाणून घ्यायचे आहे, कारण आमचेपूर्वज मेल्यापासून प्रत्येक गोष्ट जगाच्या निर्मितीच्या पासून जशी चालत आली तशीच ती आजसुद्धा घडत आहे.”
एका तासात अशा प्रकारची प्रचंड संपत्ति नष्ट झाली!”प्रत्येक तांडेल, जलप्रवासी तसेच खलाशी आणि समुद्रावर पोट भरणारे सर्व लोक त्या नगरीपासून दूर राहतील.