“एक मनुष्य होता. तो श्रीमंत होता. तो जांभळी आणि तलम वस्त्रे घालीत असे. प्रत्येक दिवस तो ऐषारामात घालवीत असे.
Cross references
नंतर त्या सर्वांचे वजन केले ते त्रेचाळीस पौंड भरले. इस्राएल लोकांनी गिदोनला दिलेल्या इतर भेटवस्तू वेगव्व्याच त्यांचे वजन यात धरलेले नाही. चंद्रकोरी, लोलक या आकारांची भूषणे मिद्यानी राजांच्या अंगावरील जांभळी वस्त्रे उंटांच्या गव्व्यातील साखव्व्या अशा विविध भेटीही त्यांनी दिल्या.
मर्दखय राजाकडून निघाला. त्याने राजाकडचा विशेष पोषाख घातला होता. त्याचे कपडे निळया आणि पांढऱ्या रंगाचे होते. मोठा सोन्याचा मुकुट त्याने घातला होता. तलम सणाचा जांभळा झगा त्याने वर चढवला होता. शूशनमध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला. लोक अतिशय आनंदात होते.
दुष्ट लोक आपल्या मुलांना कोकरा प्रमाणे बाहेर खेळायला पाठवतात. त्यांची मुले सभोवती नाचत असतात.
दुष्ट लोक यशस्वी होतात हे मी पाहिले आणि मी त्या गार्विष्ट लोकांचा मत्सर करायला लागलो.
शहाण्यांना संपत्तीचे बक्षीस मिळते. पण मूर्खांना मूर्खपणाचे बक्षीस मिळते.
तू तुझ्या सोन्या-चांदीच्या अलंकारात व ताग, रेशीम यांच्या कशिदा काढलेल्या वस्त्रांत फारच सुंदर दिसत होतीस. तू चांगल्यातले चांगले अन्न खाल्लेस. तुझे सौंदर्य अप्रतिम होते. तू राणी झालीस!
देव म्हणाला, “तुझी बहीण सदोम आणि तिच्या मुली गर्विष्ठ होत्या. त्यांना अन्नधान्याची विपुलता होती आणि त्यांच्याजवळ भरपूर वेळ होता. पण त्यांनी गरिबांना असहाय्य लोकांना मदत केली नाही.
तुझ्या शिडासाठी त्यांनी मिसरचे सुंदर वेलबुट्टीदार तागाचे कापड वापले. ते शीड तुझे निशाण होते. तुझ्या खोलीचे पडदे निळे जांभळे होते. ते पडद्याचे कापड एलीशाहून आणलेले होते.
पण तुम्ही सर्व सुखसोयी उपभोगता. तुम्ही हस्तिदंती पलंगावर झोपता आणि गाद्या-गिर्द्यावर पसरता. तुम्ही कळपातील कोवळी कोकरे व गोठ्यातील वासरे खाता.
त्यांनी त्याच्या अंगावर जांभळा झागा घातला व काट्यांचा मुगुट करुन त्याला घातला.
त्यांनी त्याची थटृा केल्यावर त्याच्या अंगावरुन जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वत:चे कपडे त्याला घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्याला बाहेर घेऊन गेले.
नंतर त्याने त्यास एक बोधकथा सांगितली: “कोणा एका धनवान मनुष्याच्या जमिनीत फार उत्तम पीक आले.
नंतर फार दिवस झाले नाहीत तोच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने सर्व संपत्ती चैनीचे जीवन जगून उधळून टाकली.
येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “एक श्रीमंत मनुष्य होता. त्याचा एक कारभारी होता. “हा कारभारी तुमचे पैसे उधळतो.’ असे त्या श्रीमंत माणसाला सांगण्यात आले.
जेव्हा येशूने पाहिले की, तो दु:खी झाला आहे, तो म्हणाला, “ज्यांच्याजवळ धन आहे, त्या लोकांचा देवाच्या राज्यात प्रवेश होणे किती कठीण आहे!
श्रीमंत लोकहो ऐका! तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा.
त्या स्त्रीने किरमिजी वजांभळी वस्त्रे घातली होती. तिने घातलेल्या सोने, जवाहिर व मोत्यांनी ती चमकत होती. तिच्या हातात सोन्याचा पेलाहोता, हा पेला वाईट गोष्टींनी आणि तिच्या लैंगिक पापांच्या अशुद्धतेने भरला होता.
तिने स्वत:ला जसे गौरव आणि ऐषाराम दिला तितक्या प्रमाणात तुम्ही तिला छळ व दु:ख द्या. ती तिच्या अंत:करणातगर्वाने म्हणते, ‘मी राणीसाखी सिंहासनावर बसते, मी विधवा नाही.’ आणि मी केव्हाच शोक करणार नाही.
आणि ओरडतील:“भयंकर! भयंकर, हे महानगरी, तलम तागाचे, किरमीजी व जांभळे पोशाख नेसून जी नगरी सजली होती सोने, मौल्यवानरत्ने व मोती यांनी ती झगमगत होती!