“यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.”
Cross references
“परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का? नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही; तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस! तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे! तू महान चमत्कार करतोस!
(सुगीच्या दिवसात यार्देन दुथडी भरून वाहात असते त्याप्रमाणे तिचा प्रवाह फुगलेला होता.) कोश वाहणारे याजक नदीकाठी आले. त्यांनी पाण्यात पाऊल टाकले.
गादच्या घराण्यातील हेच सैनिक, वर्षाच्या पहिल्या महिन्यात यार्देन नदी पार करुन गेले. नदीला तेव्हा पूर आलेला होता. खोऱ्यात राहणाऱ्या लोकांना त्यांनी पार पूर्वेला आणि पश्र्चिमेला पळवून लावले.
तो म्हणाला,“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्त्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.
मी देवाचा पराभव करु शकत नाही. तो सर्वशक्तिमान आहे. मी त्याला न्यायालयात खेचू शकत नाही आणि त्याला माझ्या बाबतीत न्यायी बनवू शकत नाही. देवाला न्यायालयात नेण्यासाठी बळांचा वापर कोण करेल?
मी निष्पाप आहे, पण काय विचार करावा ते मला कळत नाही. मी माझ्याच आयुष्याचा धिक्कार करतो.
देवाला कुठे शोधावे ते मला माहीत असेत तर किती बरे झाले असते. देवाकडे कसे जावे ते मला कळते तर किती बरे झाले असते.
“ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?”
एकही माणूस त्याला जागे करुन त्याचा राग ओढवून घेण्याइतका शूर नाही. “माझ्याविरुध्द उभा राहाणाराही कुणी नाही.
परमेश्वरा, तू प्रश्र विचारलास. ‘हा अज्ञानी माणूस कोण आहे जो असे मूर्खासारखेबोलतो आहे?’ परमश्वरा मला ज्या गोष्टी कळत तव्हत्या त्यांच्याविषयीच मी बोलत होतो. ज्या गोष्टी समजणे माझ्या आवाक्याबाहेरचे होते त्यांच्याविषयी मी बोलत होतो.
देवा, तू भयकारी आहेस. तू रागावतोस तेव्हा तुझ्याविरुध्द कुणीही उभा राहू शकत नाही.
परमेश्वर न्यायाधीश म्हणून उभा ठाकला. त्याने त्याचे निर्णय जाहीर केले. देवाने देशातल्या दील लोकांना वाचवले त्याने स्वार्गातून निर्णय दिला सर्व पृथ्वी शांत आणि घाबरलेली होती.
स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही.
सर्वशाक्तिमान परमेश्वरा, देवा, तुझ्यासारखा कुणीही इथे नाही. आम्ही तुझ्यावर संपूर्ण विश्वास टाकू शकतो.
कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो.
माझा, तुझ्या सेवकाचा न्यायनिवाडा करु नकोस. कारण हे देवा, कोणीही जिवंत व्यक्ती तुझ्या दृष्टीने निरपराधी ठरत नाही.
पवित्र देव म्हणतो, “तुम्ही माझी तुलना कोणाशी करू शकता का? नाही. कोणीही माझ्या बरोबरीचे नाही.
“सिंह त्याच्या गुहेतून बाहेर आला आहे. राष्ट्रांचा नाश करणाऱ्याने कूच करायला सुरवात केली आहे. तुमच्या देशाचा नाश करण्यासाठी त्याने त्याचे घर सोडले आहे. तुमच्या शहरांचा नाश होईल. तेथे कोणीही शिल्लक राहणार नाही.
“यिर्मया, माणसांबरोबर धावण्याच्या शर्यतीत जर तू दमतोस, तर मग घोड्यांशी तू कशी स्पर्धा करणार? जर तू सुरक्षित ठिकाणी कंटाळलास, तर धोकादायक ठिकाणी काय करशील? यार्देन नदीकिनारी वाढणाऱ्या कंाटेरी झुडुंपात तू काय करशील?
म्हणून मी लवकरच उत्तरेकडील कुळांना बोलावून घेईन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी लवकरच बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर ह्याला निरोप पाठवीन. तो माझा सेवक आहे. मी त्यांना यहूदा व यहूदातील लोक यांच्याविरुध्द उठवीन. तुमच्या देशाभोवतालच्या राष्ट्रांच्यासुद्धा विरोधात मी त्यांना आणीन. मी त्या सर्व देशांचा नाश करीन. मी त्या भूमीचे कायमचे ओसाड वाळवंट बनवीन. लोक ते देश व त्याचा वाईट प्रकारे झालेला नाश पाहतील व हळहळतील.
त्यांच्यातीलच एक त्यांचे नेतृत्व करील. तो माझ्या माणसांपैकीच एक असेल. मी सांगितल्यावरच लोक माझ्याजवळ येऊ शकतील. मग मी त्या नेत्याला माझ्याजवळ यायला सांगीन आणि तो माझ्याजवळ येईल. तो मला जवळचा होईल.
परमेश्वर म्हणतो, “कधीतरी, यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपांतून सिंह येईल, व तो शेतांतील गोठ्यांमध्ये जाईल. मग सर्व गुरे दूर पळून जातील. मी त्या सिंहासारखाच असेन. बाबेलच्या भूमीपासूनच मी बाबेलला हुसकून लावीन. ह्यासाठी मी कोणाची निवड करावी बरे? कोणीही माझ्यासारखा नाही. मला आव्हान देणाराही कोणी नाही. म्हणून मीच हे करीन. मला पळवून लावण्यास कोणीही मेंढपाळ येणार नाही. मी बाबेलच्या लोकांचा पाठलाग करीन.”
बाबेल पडेल, आणि त्यामुळे पृथ्वी हादरेल राष्ट्रांतील लोक बाबेलचा आक्रोश ऐकतील.
पहिला प्राणी सिंहासारखा होता व त्याला गरुडासारखे पंख होते. मी त्या प्राण्याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याचे पंख कापण्यात आले. तो जमिनीपासून वर उचलला गेला होता. त्यामुळे तो माणसारसाखा जमिनीवर दोन पायांवर उभा राहिला होता. त्याला मानवी हदय (मन) देण्यात आले होते.
परमेश्वराच्या भयंकर क्रोधाला कोणीही तोंड देऊ शकणार नाही त्याचा भयानक राग कोणीही सहन करू शकणार नाही त्याचा क्रोध अग्नीप्रमाणे धगधगणारा असेल. तो येताच खडक हादरतील.
रडणाऱ्या मेंढपाळांचा आक्रोश ऐका. त्यांच्या बलवान पुढाऱ्यांना दूर नेले गेले. तरुण सिंहाच्या गर्जना ऐका. यार्देन नदीकाठची दाट झुडुपे काढून नेली.
कारण त्याच्या रागाचा मोठा दिवस आला आहे. त्यासमोर कोणीच टिकाव धरु शकत नाही!”