Home Bibles 2 इतिहास 20:6 · मराठी बायबल
2 इतिहास 20:6 · मराठी बायबल

तो म्हणाला,“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्त्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.

Cross references

निर्गम 3:6

मी तुझ्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहाम, इसहाक व याकोब यांचा देव आहे.”देवाकडे पाहाण्यास मोशेला भीती वाटली म्हणून त्याने आपले तोंड झाकून घेतले.

निर्गम 3:15

देव मोशेला आणखी म्हणाला, याव्हे हा तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे असे तू त्यांना सांग. माझे नांव नेहमीच ‘याव्हे’ असेल. इस्राएल लोक पिढ्यन्पिढ्या मला त्याच नांवाने ओळखतील; ‘त्याच याव्हेने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ असे त्यांना सांग!”

अनुवाद 4:39

तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.

यहोशवा 2:11

हे सर्व ऐकून आम्ही फार घाबरून गेलो आहोत. आता तुमच्याशी लढण्याचे शौर्य आमच्या कोणातच नाही. कारण वर स्वर्गात आणि खाली पृथ्वीवर तुमच्या परमेश्वर देवाची सत्ता आहे.

1 राजे 8:23

शलमोन म्हणाला, “हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.

1 राजे 8:30

परमेश्वरा, इस्राएलचे सर्व लोक आणि मी इथे येऊन तुझी प्रार्थना करु तेव्हा त्या प्रार्थना ऐक. तुझे वास्तव्य स्वर्गात असते हे आम्हाला माहीत आहे. तेथे त्या तुझ्या कानावर पडो आणि तू आम्हाला क्षमा कर.

1 इतिहास 29:11

महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग - पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस.

1 इतिहास 29:12

वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच. सर्वांवर तुझा अधिकार आहे. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.

1 इतिहास 29:18

अब्राहाम, इसहाक आणि इस्राएल या आमच्या पूर्वजांचा, हे परमेश्वरा, तूच देव आहेस. त्यांनी उचित तेच करावे म्हणून तू सर्वतोपरी सहाय्य कर. त्यांची मने तुझ्याठायी एकनिष्ठ आणि प्रामाणिक राहावीत याची तू काळजी घे.

2 इतिहास 5:14

त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, इतके परमेश्वराच्या तेजाने देवाचे मंदिर भरुन गेले होते.

2 इतिहास 6:14

शलमोन म्हणाला,”हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.

ईयोब 9:4

देव खूप विद्वान आहे आणि त्याची शक्ती अमर्याद आहे. देवाशी युध्द करु शकणारा माणूस जखमी झाल्याशिवाय कसा राहील?

स्तोत्रसंहिता 46:11

तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.

स्तोत्रसंहिता 47:2

सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.

स्तोत्रसंहिता 47:8

देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.

स्तोत्रसंहिता 62:11

फक्त एकाच गोष्टीवर भरवसा ठेवण्यासारखा आहे असे देव म्हणतो “शक्ती देवापासून येते.”

स्तोत्रसंहिता 115:3

देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.

यशया 14:27

जेव्हा परमेश्वरच संकल्प करतो तेव्हा कोणीच तो रद्द करू शकत नाही. जेव्हा लोकांना शिक्षा करण्यासाठी परमेश्वरच हात उगारतो, तेव्हा कोणीच त्याला थांबवू शकत नाही.

यशया 57:15

देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.

यशया 66:1

देव असे म्हणाला, “आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही. तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही. तुम्ही जागा देऊ शकणार नाही.

यिर्मया 27:5

मी ही पृथ्वी व त्यावरील सर्व माणसे निर्माण केली. मी पृथ्वीवर सर्व प्राणी निर्माण केले. मी माझ्या प्रचंड सामर्थ्याच्या साहाय्याने आणि बळकट हाताने हे निर्माण केले. मी मला पाहिजे त्याला ही पृथ्वी देईन.

यिर्मया 49:19

“यार्देन नदीजवळच्या दाट झुडुपातून कधीतरी सिंह येईल व तो लोक शेतात जेथे मेंढ्या व गुरे ठेवतात, तेथे जाईल. मी त्या सिंहा सारखाच आहे. मी अदोमला जाईन आणि त्या लोकांना घाबरवीन. मी त्यांना पळून जायला भाग पाडीन, त्यांचा एकही तरुण मला थांबवू शकणार नाही. कोणीही माझ्यासारखा नाही. कोणीही मला आव्हान देणार नाही. त्यांचा कोणीही मेंढपाळ (नेता) माझ्या विरोधात उभा राहणार नाही.”

दानीएल 4:17

त्या पवित्र देवदूतांनी अशी शिक्षा मोठ्याने सुनावली. का? कारण परात्पर देवाचेच प्रभुत्व मानवांच्या सर्व राज्यांवर आहे हे पृथ्वीवरील सर्व लेकांना कळावे, देव त्याच्या इच्छेप्रमाणे ही राज्ये त्याला वाटेल त्या माणसांच्या हाती सोपवितो.त्या राज्यांवर राज्य करण्यासाठी तो नम्र लोकांची निवड करतो.

दानीएल 4:25

नबुखद्नेस्सर राजा तुला सक्तीने लोकांपासून दूर जावे लागेल. तू वन्य पशूंमध्ये राहाशील, गुरांप्रमाणे तुला गवत खावे लागले.तू दवात भिजशील, सात पावसाव्व्यानंतर (सात वर्षानंतर) तू धडा शिकशील. परात्पर देवाचेच माणसांच्या राज्यावर प्रभुत्व असते हे तुला कळेल. देव त्याला पाहिजे त्यांच्याच हातात राज्ये सोपवितो.

दानीएल 4:32

तुला सक्तीने लोेकांपासून दूर नेले जाईल. तू वन्य पशूंबरोबर राहाशील. गाईप्रमाणे तू गवत खाशील तुला धडा शिकायला सात पावसाळे (सात वर्षे) जावे लागतील. मग तुला समजून चुकेल की परात्पर देवाचेच माणसांच्या राज्यांवर प्रभत्व असते व तो त्याच्या इच्छेनुसार त्या त्या माणसांच्या हाती राज्ये सोपवितो!”

मत्तय 6:9

म्हणून जेव्हा तुम्ही प्रार्थना करता. तेव्हा तुम्ही अशी प्रार्थना करावी.‘हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.

मत्तय 6:13

आम्हांला परीक्षेत आणू नकोस तर आम्हांला त्या दुष्टापासून सोडीव.’

प्रेषितांचीं कृत्यें 11:17

आपण येशू रिव्रस्तावर विश्वास ठेवला तेव्हा जसे आपणांस तसे त्यासही देवाने सारखेच दान दिले. मग देवाचे काम मी कसा थांबवू शकत होतो?”

Interlinear

Choose Theme