पवित्र देव म्हणतो, “तुम्ही माझी तुलना कोणाशी करू शकता का? नाही. कोणीही माझ्या बरोबरीचे नाही.
Cross references
“परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का? नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही; तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस! तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे! तू महान चमत्कार करतोस!
“होरेब पर्वतावरुन अग्रीतून परमेश्वर तुमच्याशी बोलला. त्या दिवशी तो तुम्हाला दिसला नाही. कारण त्याला कोणताही आकार नव्हता.
साक्षात अग्नीमधून देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतील घडले आहे?
“तुम्ही कोणतीही मूर्ती करु नका. आकाश, पृथ्वी किंवा पाणी यातील कोणाचीही प्रतिमा किंवा मूर्ती करु नका.
देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही. तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही.
देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही.
“तुम्ही माझी तुलना दुसऱ्या कोणाशी करू शकता का? नाही! कोणीही माणूस माझ्याबरोबरीचा नाही. तुम्ही माझ्याबद्दल सर्वच जाणू शकत नाही. माझ्यासारखे काही नाही.