“ईयोब, तू सर्वशक्तिमान देवाशी वाद घातलास. तू मला चूक केल्याबद्दल दोषी ठरवलेस. आता तू चुकलास हे तू कबूल करशील का? तू मला उत्तर देशील का?”
Cross references
मी जन्माला आलो तेव्हाच का मरुन गेलो नाही? मी जन्मत:च का मेलो नाही?
“दु:खी कष्टी लोकांनी का जगत राहायचे? ज्याचा आत्मा कटू आहे अशाला जीवन का द्यायचे?
परंतु देव त्यांचे भविष्य नेहमी गुप्त ठेवतो आणि त्यांच्या भोवती संरक्षक भिंत उभारतो.
देवा, तू माझ्यावर पाहारा का करीत आहेस? मी समुद्र आहे की त्यातला अक्राळ विक्राळ प्राणी?
देवा, तू एक क्षणभरही माझ्यावरची तुझी नजर वळवीत नाहीस. तू मला एक क्षणही एकटा सोडीत नाहीस.
मनुष्य देवाशी वाद घालू शकत नाही. देव हजार प्रश्र्न विचारु शकतो आणि माणसाला त्याच्या एकाही प्रश्र्नाचे उत्तर देता येत नाही.
देव मला चिरडण्यासाठी वादळे पाठवील. काहीही कारण नसताना तो मला जखमा देईल.
देव माझ्यासारखा माणूस नाही. म्हणूनच मी त्याला उत्तर देऊ शकत नाही. आम्ही न्यायालयात एकमेकांना भेटू शकणार नाही.
देवा, मला कष्ट देण्यात मुला सुख वाटते का? तुझ्या निर्मिती विषयी तुलाच आस्था नसावी असे वाटते, की वाईट लोकांनी ज्या मसलती केल्या त्या बाबतीत तू समाधानी आहेस?
मी पाप करतो तेव्हा तू माझ्यावर नजर ठेवतोस कारण त्यामुळेच माझ्या पापाबद्दल तू मला शिक्षा करशील
मला शिक्षा देणे बंद कर आणि तुझ्या भयानक गोष्टींनी मला भयभीत करण्याचे थांबव.
तू माझी प्रत्येक हालचाल निरखशील. पण माझ्या पापांची तुला आठवण होणार नाही.
देवाने मला दुष्ट लोकांच्या स्वाधीन केले आहे. त्याने क्रूर माणसांना मला त्रास द्यायची परवानगी दिली आहे.
परंतु देवानेच माझ्यावर अन्याय केला आहे. त्यानेच मला पकडण्यासाठी सापळा रचला.
“खरोखरच देव आहे. आणि तो आहे हे जसे खरे आहे तसेच तो माझ्या बाबतीत अन्यायी होता हे ही खरे आहे. होय, त्या सर्वशक्तिमान देवाने माझे जीवन कडू करुन टाकले.
देवा तू माझ्याशी फार नीचपणे वागतोस. तू तुझ्या बळाचा उपयोग मला दु:ख देण्यासाठी करतोस.
ईयोब, तू देवाशी वाद घालत आहेस. देवाने तुला सर्व काही नीट सांगावे असे तुला वाटते.
ईयोब, स्वत:ला सावरआणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो.
माणूस, म्हणजे ज्यासाठी त्याला निर्माण केले गेले तो एक माणूस आणि त्याबद्दल वाद करणे निरर्थक आहे. माणूस या विषयी देवाजवळ वाद घालू शकत नाही. का? कारण देव माणसापेक्षा शक्तिशाली आहे. आणि खूप वेळ वाद घातला तरी त्यात बदल होणार नाही.
परमेश्वराने कोणा माणसाची मदत मागितली का? कोणा माणसाने परमेश्वराला प्रामाणिकपणा शिकविला का? परमेश्वराला कोणा माणसाने ज्ञान दिले का? कोणी परमेश्वराला शहाणपण शिकविले का? नाही. या गोष्टी परमेश्वराला अगोदरच माहीत होत्या.
“ह्या लोकांकडे पाहा ते त्यांच्या निर्मात्याशीच वाद घालीत आहेत. माझ्याशी वाद घालणाऱ्यांकडे पाहा. ते खापराच्या तुकड्यासारखे आहेत. कुंभार भांडे करण्यासाठी मऊ, ओला चिखल वापरतो पण चिखल त्याला ‘तू काय करतोस?’ असे विचारीत नाही. निर्मितीला निर्मात्याला प्रश्र्न विचारण्याची हिंमत नसते. हे लोक त्या चिखलासारखे आहेत.
परमेश्वर माझ्या पाठीशी आहे. मी निष्पाप आहे हे तो जाणतो, म्हणून मी अपराधी आहे असे कोणीही म्हणू शकणार नाही. मी चुकत आहे असे कोणाला सिध्द करावेसे वाटत असेल तर त्याने माझ्याकडे यावे. आपण परीक्षा पाहू.
“आईवडिलांनी आंबट द्राक्षे खाल्ली. त्याची आंबट चव मात्र मुलांनी घेतली. ही म्हण तुम्ही नेहमी म्हणता. ते का?तुम्ही पाप करु शकता, भविष्यकाळात कोणालातरी त्याची शिक्षा मिळेल, असे तुम्हांला वाटते.
त्यांनी ते घेतले व मालकाकडे तक्रार करू लागले.
तुमच्यापैकी एखादा मला म्हणेल, “देव जर आमच्या कृति नियंत्रित करतो तर तो अजूनही आमचे दोष का काढतो? शेवटी त्याच्या इच्छेला कोण विरोध करील?”
पवित्र शास्त्र सांगते.“प्रभूचे मन कोणाला माहीत आहे किंवा त्याचा सल्लागार कोण असेल?” यशया 40:13
“प्रभूचे मन कोण जाणतो, जो त्याला शिकवू शकेल?” यशया 40:13परंतु आमच्या ठायी ख्रिस्ताचे मन आहे.
आपण प्रभूला ईर्षेस पेटाविण्याचा प्रयत्न करीत आहोत का? कारण तो जितका सामर्थ्यशाली आहे तितके आम्ही नाही.