मग दैवत कमोश याची मवाबच्या लोकांना लाज वाटेल इस्राएलच्या लोकांनी बेथेलयेथील दैवतांवर भिस्त ठेवली आणि त्याने त्यांना काहीच मदत केली नाही. म्हणून ते खजील झाले मवाबचेही तसेच होईल.
Cross references
कमोश या तुमच्या देवाने दिलेल्या भूमीत तुम्ही खुशाल राहू शकता. म्हणजे आमच्या परमेश्वराने दिलेल्या भूमीत आम्ही राहू.
दुसऱ्या दिवशी अश्दोदचे लोक उठून पाहतात तो, दागेनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पालथी पडलेली आढळली.
कमोश या मवाबी लोकांच्या भंयकर दैवताच्या पूजेसाठी शलमोनाने एक पूजास्थळ बांधले. हे यरुशलेम नजीकच्या टेकडीवर होते. त्याच टेकडीवर मोलख या अम्मोनी लोकांच्या भयंकर दैवतासाठीही एक स्थळ केले.
त्याने मग आपल्या सल्लागाराबरोबर विचार विनिमय केला. त्यांनी त्याला एक तोड सुचवली. त्यानुसार यराबामने सोन्याची दोन वासरे करवून घेतली. मग तो लोकांना म्हणाला, “तुम्हाला यरुशलेमला उपासनेसाठी जायची गरज नाही. तुम्हाला मिसरबाहेर ज्यांनी काढले तेच हे देव.”
राजाने मग एक सोन्याचे वासरु बेथेल येथे आणि दुसरे दान या शहरात बसवले.
तेव्हा त्या संदेष्ट्यांनी एक गोऱ्हा घेतला आणि ते तयारीला लागले. दुपारपर्यंत त्यांनी बालची प्रार्थना केली. “बाल आमच्या हाकेला ओ दे” अशी त्यांनी विनवणी केली. पण कसलाही आवाज आला नाही किंवा उत्तर दिले नाही. आपण रचलेल्या वेदीभोवती ते संदेष्टे नाचले तरी अग्नी काही प्रज्वलित झाला नाही.
एलीया म्हणाला, “त्या बालच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसूट देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
या कृतीमुळे परमेश्वराचा अमस्यावर कोप झाला. परमेश्वराने संदेष्ट्याला अमस्याकडे पाठवले. संदेष्टा राजाला म्हणाला, “अमस्या, त्या लोकांच्या दैवतांची पूजा तू का करत आहेस? त्या दैवतांना तर स्वत:च्याच लोकांचे तुझ्यापासून रक्षण करता आले नाही.”
त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
मवाबवासी त्यांच्या प्रार्थनास्थळी जाऊन प्रार्थना करण्याचा प्रयत्न करतील, पण काय घडले ते त्यांना दिसेल. ते इतके दुर्बल झालेले असतील की प्रार्थना करण्याची शक्ती त्यांच्यात नसेल.”
पुष्कळ लोक खोटे देव तयार करतात. पण अशा लोकांची निराशा होईल. ते सगळे लोक लज्जित होऊन दूर जातील.
“तुम्ही लोक दुसऱ्या राष्ट्रातून पळालेले आहात. तेंव्हा गोळा व्हा आणि माझ्यासमोर या. (हे लोक स्वत:जवळ खोट्या देवाच्या मूर्ती बाळगतात. ते त्या त्यांना वाचवून न शकणाऱ्या देवांची हे लोक प्रार्थना करीत राहतात. ते काय करीत आहेत हे त्यांना कळत नाही.
बेल आणि नेबो माझ्यापुढे वाकतात. ते खोटे देव म्हणजे फक्त मूर्ती आहेत. लोक त्या मूर्तीना जनावरांच्या पाठीवर लादतात त्या मूर्ती म्हणजे वाहून न्यावी लागणारी फक्त ओझी आहेत. खोटे देव लोकांना दमविण्याव्यातिरिक्त काहीही करीत नाहीत.
तुम्ही घडविलेल्या गोष्टी व तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता, म्हणून तुम्ही पकडले जाल. कमोश दैवत कैद केले जाईल आणि त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित व अधिकारी यांनाही नेले जाईल.
“मवाबचे तुकडे केले गेले. लोक रडत आहेत. मवाब शरण आला. आता तो खजील झाला आहे. लोक त्याची खिल्ली उडवितात खरे, पण घडलेल्या गोष्टीमुळे ते भयभीतही होतात.”
मवाब, तुझे वाईट होणार. कमोशच्या लोकांचा नाश होत आहे. तुझी मुलेमुली बंदिवान म्हणून वा कैदीम्हणून नेली जात आहेत.
शोमरोन, तुझे वासरू परमेश्वराने नाकारले आहे. परमेश्वर म्हणतो, ‘मी इस्राएल लोकांवर रागावलो आहे.” इस्राएलच्या लोकांना त्यांच्या पापाबद्दल शिक्षा केली जाईल काही कामगारांनी ते पुतळे घडविले ते काही परमेश्वर नाहीत. शोमरोनच्या वासराचे तुकडे तुकडे केले जातील
शोमरोनमधील लोक बेथ:आवेन येथील वासरांची पूजा करतात. ते लोक अक्षरश:रडतील. ते याजकही खरोखरी रडतील. का? कारण त्यांची सुंदर मूर्ती नाहीशी झाली. ती दूर नेली गेली.
म्हणून तुमच्या सैन्याला रणशिंग ऐकू येईल तुमच्या सर्व गढ्यांचा नाश होईल. तो नाश, शल्मनाने जसा बेथ-आर्बेलचा नाश केला, तसा असेल त्या यूध्दाच्या वेळी, आया मलांबरोबर ठार मारल्या गेल्या.
पण बेथेलास शरण जाऊ नका; गिल्गालला जाऊ नका; सीमा ओलांडून खाली बैरशेब्यालाही जाऊ नका. गिल्गालमधील लोकांना कैदी म्हणून नेले जाईल. आणि बेथेलचा नाश केला जाईल.