एलीया म्हणाला, “त्या बालच्या संदेष्ट्यांना पकडून आणा. त्यांना निसूट देऊ नका” तेव्हा लोकांनी त्या सगळ्यांना धरले एलीयाने मग त्यांना किशोन झऱ्याजवळ नेले आणि तेथे सर्व संदेष्ट्यांची हत्या केली.
Cross references
तसेच त्या संदेष्ट्याला किंवा स्वप्न सांगणाऱ्याला ठार मारा. कारण तो तुम्हाला तुमच्या परमेश्वर देवापासून विचलीत करतो आहे. तुम्ही मिसर देशात गुलाम होतात तेव्हा आपल्या परमेश्वरानेच तुम्हाला तेथून सोडवले आहे. परमेश्वर देवाने आज्ञा देऊन नेमून दिलेल्या जीवनमार्गापासून हा माणूस तुम्हाला दूर नेतो म्हणून आपल्यामधून तुम्ही त्याचे निर्मूलन करा.
“तुमच्या निकटची एखादी व्यक्ती हळूच तुम्हांला दुसऱ्या दैवताच्या भजनी लावायचा प्रयत्न करील. ही व्यक्ति म्हणजे तुमचा सख्खा भाऊ, मुलगा, मुलगी, प्रिय पत्नी, किंवा जिवलग मित्रही असू शकतो. तो म्हणेल, ‘चल आपण या दुसऱ्या दैवताची पूजा करु.’ (तुझ्या किंवा तुझ्या पूर्वजांच्या ऐकिवातही नसलेले हे दैवत असेल
“पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीन बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे.
मी सेनापती सीसरा याला रथ आणि सैन्य यासह किशोन नदीकडे तुझ्या दिशेला यायला लावीन. तेथे सीसराचा पराभव करायला मी तुला मदत करीन.
तेव्हा सीसराने आपले नऊशे लोखंडी रथ आणि सर्व सैन्य एकत्र केले हरोशेथपासून त्या सर्वांनी किशोन नदीच्या दिशेने मोर्चा वळवला.
किशोन या प्राचीन नदीने सीसराच्या सैन्याला वाहून नेले. चला, प्राणपणाने झुंजू या.
अहाब राजाने घडलेली सर्व हकीकत ईजबेलला सांगितली. सर्व संदेष्ट्यांना एलीयाने कसे तलवारीने कापून काढले तेही सांगितले.
यज्ञ आणि होमार्पणे करण्यासाठी बालचे सर्व पूजक बालच्या देवळात शिरले.बाहेर येहूने ऐंशीजणांना तयार ठेवले होते. त्यांना येहूने सांगितले होते, “कोणालाही आतून निसटू द्यायचे नाही. एखादा कोणी गेलाच तर त्याला जाऊ देणाऱ्याला आपला जीव गमवावा लागेल.”
स्वत: यज्ञात होमबली अर्पण केल्यावर लगेच हुजऱ्यांना आणि सरदारांना येहूने सांगितले, “आता, आत जा आणि बालची पूजा करणाऱ्यांना ठार करा. कोणालाही देवळातून जिवंत बाहेर येऊ देऊ नका.”तेव्हा सरदारांनी धारदार तलवारींनी सर्व पूजकांना ठार केले. त्यांनी आणि हुजऱ्यांनी बाल देवतेच्या पूजकांचे मृतदेह बाहेर टाकले ते बालदेळाच्या गर्भगृहात गेले
राजमहालाच्या घोडावेशीजवळ अथल्या पोचताच सैनिकांनी तिला पकडले आणि त्याठिकाणी तिला जिवे मारले.
मग सर्वजण बआल देवतेच्या मंदिरात गेले आणि त्या मूर्तीची त्यांनी नासधूस केली. तिथल्या इतर मूर्ती आणि वेदीदेखील मोडून तोडून टाकल्या. बआलच्या वेदीपुढेच त्यांनी बआलचा याजक मत्तान याला ठार केले.
जो कोणी ‘त्या’ लोकांना मारण्यासाठी आपल्या तलवारीचा उपयोग करीत नसेल, त्याचे वाईट होईल.
सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी जगातील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुध्द आत्म्यांचा नायनाट करीन.
त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्यासंदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणित्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणिखोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले.
मग ज्याने त्यांना फसविले होते, त्याला त्या धगधगत्यासरोवरामध्ये, श्र्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल. आणि त्यांनाअनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील.