“मवाबचे तुकडे केले गेले. लोक रडत आहेत. मवाब शरण आला. आता तो खजील झाला आहे. लोक त्याची खिल्ली उडवितात खरे, पण घडलेल्या गोष्टीमुळे ते भयभीतही होतात.”
Cross references
अश्शूरचा राजा त्यांना कैद करील व त्यांच्या देशापासून त्यांना दूर घेऊन जाईल. आबालवृध्दांना वस्त्रे व जोडे काढून नेले जाईल व त्यांना संपूर्ण नग्न केले जाईल. मिसरचें लोक लज्जित होतील.
त्या देशाभोवती राहणाऱ्यांनी त्यासाठी शोक करावा. तुम्हाला मवाबची किर्ती माहीत आहे. म्हणून त्याच्यासाठी शोक करा. म्हणा, ‘राजाची सत्ता संपली मवाबचे सामर्थ्य व वैभव गेले’
“मवाब परमेश्वरापेक्षा स्वत:ला श्रेष्ठ समजला म्हणून, तो, मद्यप्याप्रमाणे झोकांड्या खाईपर्यंत त्याला शिक्षा करा. तो स्वत:च्याच वांतीत पडून लोळेल. लोक त्याची टर उडवतील.
एके काळी काळी यरुशलेम लोकांनी गजबजलेली नगरी होती. पण आता ती अगदी ओसाड झाली आहे. यरुशलेम जगातील मोठ्या नगरांमधील एक होती. पण आता ती वधवेप्रमाणे झाली आहे. एके काळी ती नगरांमधील राजकुमारी होती. पण आता तिला दासी केले गेले आहे.
परमेश्वराने सियोनकन्येला कसे अभ्राच्छादित केले आहे पाहा! त्याने इस्राएलचे वौभन धुळीला मिळविले .कोपाच्या दिवशी, इस्राएल आपले पायाखालचे आसन आहे. ह्याची परमेश्वराने आठवण ठेवली नाही.
सोने कसे निस्तेज झाले आहे पाहा! चांगले सोने कसे बदलले आहे बघा! रत्ने सगळीकडे पसरली आहेत. रस्त्याच्या नाक्या-नाक्यावर ती विखुरली आहेत.
मग समुद्रकाठाजवळच्या देशांतील सर्व नेते आपला शोक प्रकट करण्यासाठी सिंहासनावरुन खाली उतरतील. ते त्यांचे खास पोशाख उतरवितील. सुंदर वस्त्रे काढून ठेवतील. मग ते ‘थरकापाची (भीतीची) वस्त्रे’ घालतील आणि भीतीने कापत जमिनीवर बसतील. तुझा इतका लवकर नाश झालेला पाहून त्यांना धक्का बसेल.
पृथ्वीवरील ज्या राजांनी त्या स्त्रीशी व्यभिचार केला, आणि जे तिच्या विलासाच्या दिवसाचे भागीदार झाले, ते ती जळतअसताना निघणारा धूर पाहून रडतील आणि तिच्याबद्दल शोक करतील.
ज्या व्यापाऱ्यांनी असा माल विकला, आणि त्यांची संपत्ति तिच्यापासून मिळविली ते तिच्या पिडेच्या भितीमुळे दूर उभेराहतील, ते रडतील व शोक करतील.