बेल आणि नेबो माझ्यापुढे वाकतात. ते खोटे देव म्हणजे फक्त मूर्ती आहेत. लोक त्या मूर्तीना जनावरांच्या पाठीवर लादतात त्या मूर्ती म्हणजे वाहून न्यावी लागणारी फक्त ओझी आहेत. खोटे देव लोकांना दमविण्याव्यातिरिक्त काहीही करीत नाहीत.
Cross references
“आज रात्री मी मिसर देशभर फिरेन आणि त्यातील प्रथम जन्मलेल्या मुलांना व जनावरांतील नरांना मी मारून टाकीन, आणि मिसरमधील सर्व दैवतांना धडा शिकवून दाखवीन की मी परमेश्वर आहे.
दुसऱ्या दिवशी अश्दोदचे लोक उठून पाहतात तो, दागेनची मूर्ती करार कोशा जवळ जमीनीवर पालथी पडलेली आढळली.
गवा खूप बलवान असतो, परंतु तो तुझे काम करील असा विश्वास तुला वाटतो का?
त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील.
पण पाहा! ते येत आहेत! लोकांच्या व घोडेस्वारांच्या रांगा मला दिसत आहेत!”नंतर दूत म्हणाला, “बाबेलोनचा पराभव झाला. ते जमीनदोस्त झाले, बाबेलोनच्या खोट्या देवांच्या सर्व मूर्तींची मोडतोड होऊन त्या धुळीला मिळाल्या आहेत.”
“कामगार एकमेकांना मदत करतात. ते बळकटी येण्यासाठी एकमेकांना उत्तेजन देतात.
इतर देशांतील अशा मूर्ती काकडीच्या मळ्यातील बुजगावण्यासारख्या आहेत. त्या बोलू शकत नाहीत वा चालू शकत नाहीत. लोकांनाच त्या वाहून न्याव्या लागतात. तेव्हा त्यांना घाबरु नका. त्या मूर्ती तुमचे वाईटही करु शकत नाहीत व चांगलेही करु शकत नाहीत.”
हा संदेश मवाब देशासाठी आहे सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांचा देव असे म्हणतो:“नबो पर्वताला वाईट काळ येईल. त्याचा नाश होईल किर्याथाईमचा गर्व उत्तरेल ते काबीज केले जाईल मजबूत ठिकाणे वाकतील त्यांचे शतश: तुकडे होतील.
तुम्ही घडविलेल्या गोष्टी व तुमची संपत्ती यावर तुम्ही भिस्त ठेवता, म्हणून तुम्ही पकडले जाल. कमोश दैवत कैद केले जाईल आणि त्याच्याबरोबर त्याचे पुरोहित व अधिकारी यांनाही नेले जाईल.
“सर्व राष्ट्रांत घोषणा कर! झेंडा उंच उभारुन संदेश दे. माझा सगळा संदेश दे आणि सांग ‘बाबेल काबीज केला जाईल. बेल दैवताची फजिती होईल. मरदोख घाबरुन जाईल. बाबेलच्या मूर्तींची विटंबना केली जाईल. त्या भयभीत होतील.’
बाबलेमधील बेल या दैवताला मी शिक्षा करीन. मी, त्यांने गिळलेल्यांना, त्याला ओकायला लावीन. बाबेलची तटबंदी पडेल, आणि इतर राष्ट्रे बाबेलकडे येणार नाहीत.
बाबेलच्या दैवतांना शिक्षा करण्याची व संपूर्ण बाबेल देशाला लज्जित होण्याची, वेळ नक्कीच येईल. त्या शहराच्या रस्त्यांवर खूप प्रेते पडलेली असतील.
परमेश्वर म्हणतो, “बाबेलमधील मूर्तींना शिक्षा करण्याची वेळ येत आहे. त्या वेळी, देशात सर्व ठिकाणी जखमी लोक यातनेने तळमळतील.
तो त्यांच्या देवतांच्या मूर्तो, धातूच्या मूर्तो आणि सोन्या चांदीच्या किंमती वस्तू घेईल तो त्या वस्तू मिसरला नेईल मग काही वर्षे तो उत्तरेच्या राजाला त्रास देणार नाही,