“परमेश्वरा, तू यहूदाला पूर्णपणे त्याज्य ठरविले आहेस का? सियोनचा तुला तिरस्कार वाटतो का? आमची स्थिती परत न सुधारण्याइतके तू आमचे नुकसान केले आहेस. तू असे का केलेस? आम्हाला शांती पाहिजे होती. पण आमच्या वाट्याला काहीच चांगले आले नाही. जखमा भरुन येण्याची आम्ही आशा केली, पण आमच्या वाट्याला फक्त भीती आली.
Cross references
पण यहूदातील लोकांनीही परमेश्वराच्या आज्ञा मानल्या नाहीत. त्यांनी इस्राएल लोकांचा कित्ता गिरवला.
पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.
परंतु मी जेव्हा चांगल्याची अपेक्षा करीत होतो तेव्हा माझ्या वाट्याला वाईट गोष्टी आल्या. मला उजेड हवा होता तेव्हा अंधार मिळाला.
देवाने हे ऐकले आणि तो खूप रागावला, देवाने इस्राएलला पूर्णपणे झिडकारले.
देवा, तुझ्या “वेलीचे” रक्षण करणाऱ्या भिंती तू का पाडून टाकल्यास? आता जो कोणी तिथून जातो तो तिची द्राक्षे तोडतो.
पण देवा, तू तुझ्या निवडलेल्या राजावर रागावलास आणि तू त्याला एकटे सोडून दिलेस.
जर एखादा माणूस हट्टी असेल आणि प्रत्येक वेळी त्याला ‘तू चुकतो आहेस’ असे कुणी सांगितल्यावर खूप राग येत असेल, तर त्या माणसाचा नाश होईल. तिथे आशेला जागा नाही.
माझ्या लोकांना, ‘टोकाऊ चांदी’ असे म्हटले जाईल. देवाने त्यांचा स्वीकार केला नाही म्हणून त्यांना हे नाव दिले जाईल.”
“यिर्मया, तुझे केस कापून दूर फेकून दे.उजाड डोंगरमाथ्यावर जा आणि रड. का? परमेश्वराने माणसांच्या ह्या पिढीला नाकारले आहे. परमेश्वराने ह्या लोकांकडे पाठ फिरविली आहे. रागाच्या भरात तो त्यांना शिक्षा करील.
आम्ही शांतीची आशा केली पण आम्हाला काहीच चांगले मिळाले नाही. तो आम्हाला क्षमा करील असे आम्हाला वाटले पण अरिष्टच आले.
गिलादमध्ये नक्कीच काही औषध आहे. तेथे नक्कीच वैद्य आहे. मग माझ्या लोकांच्या जखमा का भरुन येत नाहीत?
“मी परमेश्वराचा माझ्या घराचा त्याग केला आहे. मी माझी मालमत्तासोडली आहे. मी माझी प्रियतमा (यहूदा) तिच्या वैऱ्यांच्या ताब्यात दिली आहे.
माझे स्वत:चेच लोक जंगली सिंहाप्रमाणे माझ्याविरुद्ध उलटले. ते माझ्याकडे पाहून डरकाळ्या फोडू लागल्याने मी त्यांच्याकडे पाठ फिरविली.
परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, मोशे आणि शमुवेल जरी यहूदासाठी विनवणी करण्याकरिता माझ्याकडे आले असते तरी यहूदाची मला दया येणार नाही. यहूदाच्या लोकांची मला कीव वाटणार नाही. त्या लोकांना माझ्यापासून दूर ठेव. त्यांना निघून जाण्यास सांग.
पण तरीसुद्धा मी दुखावला का जातो? माझ्या जखमा भरुन येऊन बऱ्या का होत नाहीत, ते मला समजत नाही. देवा, मला वाटते तू बदललास पाणी आटून गेलेल्या झऱ्याप्रमाणे तू झालास. ज्यातून पाणी वाहायचे थांबले आहे अशा प्रवाहाप्रमाणे तू झालास.
परमेश्वर म्हणतो, “इस्राएलच्या व यहूदाच्या लोकांनो, तुम्हाला कधीही बरी न होणारी जखम झाली आहे, कधीही भरुन न येणारी हानी पोहोचली आहे.
तुमच्या व्रणांची काळजी घेणारा कोणीही नाही, म्हणून तुम्ही बरे होणार नाही.
सर्वशक्तिमान परमेश्वराने इस्राएलला व यहूदास, विधवेप्रमाणे टाकून दिलेले नाही. देवाने त्या लोकांचा त्याग केलेला नाही. उलटपक्षी, त्याच लोकांनी इस्राएलच्या एकमेव पवित्र परमेश्वराला सोडण्याचा गुन्हा केला आहे. लोकांनी परमेश्वराला सोडले. पण देवाने काही त्या लोकांना दूर लोटले नाही.
सियोनच्या कुमारी कन्ये, मी तुझी तुलना कोणाशी करू शकतो? कशाबरोबर मी तुझी तुलना करू हे सियोनच्या कुमारी कन्ये? मी तुझे सांत्वन कसे करू? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोणी बरे करु शकेल असे मला वाटत नाही.
तू माझ्या सर्व बाजूंनी दहशत निर्माण केलीस. मेजवानीला एखाद्याला आमंत्रण द्यावे त्याप्रमाणे तू दहशतीला आमंत्रण दिलेस. परमेश्वराच्या कोपाच्या दिवशी कोणीही सुटला नाही. मी ज्यांना जन्म दिला व ज्यांचे लालनपासन केले. त्यांना माझ्या शत्रूने ठार केले.
मदतीची वाट पाहून आमचे डोळे थकले आहेत. पण कोठूनही मदत मिळत नाही. आमचेरक्षण करण्यास एखादे राष्ट्र येत आहे का, ह्यची आम्ही बुरुजावरुन टेहळणी केली. पण एकही देश आमच्याकडे आला नाही.
तू आमच्यावर खूप रागावला होतास! तू आमचा पूर्णपणे त्याग केलास का?
एका महिन्यात मी तीन मेंढपाळांना कामावरुन काढून टाकले. मला मेंढ्यांचा राग आला व त्या माझा तिरस्कार करु लागल्या.
तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला.
जेव्हा लोक म्हणतात, “सगळीकडे शांतता व सुरक्षितता आहे.” तेव्हा त्यांच्यावर अचानक विनाश ओढवेल, ज्याप्रमाणे गर्भवती स्त्रिला अचानक वेदना होतात व मग ते सूटू शकणार नाहीत!