Home Bibles यिर्मया 14:20 · मराठी बायबल
यिर्मया 14:20 · मराठी बायबल

परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझे अपराध केले.

Cross references

लेवीय 26:40

“परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील.

2 शमुवेल 12:13

मग दावीद नाथानला म्हणाला, “माझ्याहातून परमेश्वराचा मोठाच अपराध घडला आहे.”नाथान तेव्हा दावीदाला म्हणाला, “परमेश्वराने हा तुझा अपराध पोटात घातला आहे. तू मरणार नाहीस.

2 शमुवेल 24:10

हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वराला म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.”

एज्रा 9:6

तेव्हा मी ही प्रार्थना केली:हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत.

नहेम्या 9:2

मूळ इस्राएली लोक परकी लोकांमध्ये न मिसळता वेगळा गट करून उभे होते. इस्राएलींनी मंदिरात उभे राहून आपल्या तसेच आपल्या पूर्वजांच्या पापांची कबुली दिली.

ईयोब 33:27

नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही.

स्तोत्रसंहिता 32:5

परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले. आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.

स्तोत्रसंहिता 51:3

मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात.

स्तोत्रसंहिता 106:6

आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले. आम्ही चुकलो. आम्ही दुष्कृत्ये केली.

यिर्मया 3:13

तुम्ही पाप केले आहे एवढे तुम्हाला समजले पाहिजे. तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरुद्ध गेलात तेच तुमचे पाप आहे. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रातील मूर्तींना प्रत्येक हिरव्या झाडाखाली पूजले. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.

यिर्मया 3:25

लज्जेचे आपण अंथरुण करु या आणि पांघरुणाने आपण शरीर झाकतो तशी लाज आपण पांघरु या. आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरुद्ध जाऊन पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी पाप केले. आम्ही लहान असल्यापासून परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

यिर्मया 14:7

या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत. परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर. कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे. आम्ही तुझ्याशी पापाचरण केले,

विलापगीत 1:20

“परमेश्वरा, माझ्याकडे पाहा! मी दु:खी झाले आहे. माझे अंत:करण अस्वस्थ झाले आहे माझ्या मनात खळबळ उडाली आहे. असे होण्याचे कारण माझा हट्टी स्वभाव रस्त्यांवर माझी मुले तलवारीने मारण्यात आली. तर घरा घरांत प्रत्यक्ष मृत्यू होता.

दानीएल 9:5

पण परमेश्वरा आम्ही पाप केले,आम्ही चुकीचे वागलो आम्ही दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याकडे पाठ फिरविली, तुझ्या आज्ञा आणि न्याय निर्णय यांच्यापासून आम्ही दूर गेलो.

दानीएल 9:8

“परमेश्वरा, आम्हा सर्वांना लाज वाटली पहिजे. आमच्या सर्व राजांनी नेत्यांनी आणि आमच्या पूर्वजांनी लाजेने मान खाली घातल्या पाहिजेत. का? कारण परमेश्वरा, त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले.

दानीएल 9:15

“परमेशवर, आमच्या देवा, तू तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आम्हाला मिसरमधून बाहेर आणलेस, आम्ही तुझे आहोत तुझ्या ह्या कृतीमळे आजही तुझी ख्याती आहे. परमेशवरा, आम्ही पाप केले. आम्ही भयानक कृत्ये केली.

लूक 15:18

मी उठून आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणेन, बाबा, मी स्वार्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुद्ध पाप केले आहे.

1 योहान 1:7

पण जर आम्ही प्रकाशात चालतो, जसा देव प्रकाशात आहे तर आमचीविश्वासणारे या नात्याने एकमेकांबरोबर सहभागिता आहे. आणि देवाचा पुत्र येशू याचे रक्त आम्हाला सर्व पापांपासून शुद्धकरते.

Interlinear

Choose Theme