Home Bibles यिर्मया 12:8 · मराठी बायबल
यिर्मया 12:8 · मराठी बायबल

माझे स्वत:चेच लोक जंगली सिंहाप्रमाणे माझ्याविरुद्ध उलटले. ते माझ्याकडे पाहून डरकाळ्या फोडू लागल्याने मी त्यांच्याकडे पाठ फिरविली.

Cross references

यिर्मया 2:15

तरुण सिंह (शत्रू) इस्राएलकडे बघून डरकाळ्या फोडतात व गुरगुरतात. त्यांनी इस्राएलचा नाश केला. इस्राएलमधील शहरे जाळली गेली आहेत. तेथे कोणीही मागे उरले नाही.

यिर्मया 51:38

“बाबेलचे लोक गुरगुरणाऱ्या सिंहाच्या छाव्यासारखे आहेत. ते छाव्याप्रमाणे गुरगुरतात.

होशेय 9:15

त्यांची सर्व पापे गिल्गालमध्ये आहेत. म्हणून तेथपासूनच मला त्यांचा तिरस्कार वाटू लागला.मी त्यांना बळजबरीने माझे घर सोडायला लावीन. कारण ते दुष्कृत्ये करतात. ह्यापुढे मी त्यांच्यावर प्रेम करणार नाही. त्याचे नेते बंडखोर आहेत. ते माझ्याविरुध्द गेले आहेत.

आमोस 6:8

परमेश्वराने, माझ्या प्रभूने, स्वत:ची शपथ घेतली. सर्वशक्तिमान परमेश्वर देवाने अशी शपथ घेतली, “याकोबला ज्या गोष्टींचा अभिमान वाटतो, त्या गोष्टींचा मला तिटकारा करतो. त्याच्या जबूत मनोऱ्यांचा मी तिटकारा करतो. म्हणून मी शत्रूला ती नगरी व त्यातील सर्व काही घेऊ देईन.”

जखऱ्या 11:8

एका महिन्यात मी तीन मेंढपाळांना कामावरुन काढून टाकले. मला मेंढ्यांचा राग आला व त्या माझा तिरस्कार करु लागल्या.

Interlinear

Choose Theme