तर मग मी म्हणतो, “देवाने आपल्या लोकांना सोडून दिले आहे काय?” खात्रीने नाही! कारण मीही इस्राएली आहे. अब्राहामापासूनचा, बन्यामिन वंशातला.
Cross references
“पण परमेश्वर आपल्या लोकांचा त्याग करत नाही. उलट त्याने मोठ्या प्रेमाने तुम्हाला आपले मानले आहे. तेव्हा त्याच्या मोठ्या नावाखातर तो तुम्हाला सोडून देणार नाही.
परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलांना हुसकावून लावले तसेच यहूदांना करीन त्यांना मी नजरेपुढून घालवीन. यरुशलेमचाही मी त्याग करीन. मीच ते नगर निवडले हे खरे पण तेथील मंदिराची मी मोडतोड करीन “माझे नाव राखणारी जागा” असे याच स्थळाबद्दल मी म्हणत होतो.”
मी आश्चर्य करतो, “आमचा प्रभु आपल्याला कायमचा सोडून गेला का? तो आपल्याला कधी तरी परत घेईल का?
जर त्या निवडलेल्या राजाच्या वंशजांनी माझे नियम मोडले.
परमेश्वर त्याच्या माणसांना सोडून जाणार नाही. तो त्याच्या माणसांना मदत केल्याशिवाय सोडून जाणार नाही.
परमेश्वर पुढील गोष्टी सांगतो, “इस्राएलचे वंशज कधीही राष्ट्र बनल्याखेरीज राहणार नाहीत. सूर्य, चंद्र, तारे व समुद्र ह्यांच्यावरील माझे नियंत्रण ढळले, तरच असे होणे शक्य आहे.”
“यिर्मया, लोक काय बोलतात, ते तू ऐकलेस का? ते लोक म्हणतात ‘परमेश्वर इस्राएल आणि यहूदा या घराण्यापासून दूर गेला. परमेश्वराने त्या लोकांची निवड केली होती.’ पण आता तो त्यांचा राष्ट्र म्हणून सुद्धा स्वीकार करीत नाही.”
ते लोक माझ्या परमेश्वराचे ऐकणार नाहीत. म्हणून तोही त्यांचे ऐकणार नाही. आणि ते बेघर होऊन राष्ट्रांतून भटकतील.
परमेश्वर, माझा प्रभू, पापी राज्यावर (इस्राएलवर) लक्ष ठेवीत आहे. परमेश्वर म्हणाला, “मी इस्राएलला पृथ्वीतळावरून पुसून टाकीन. पण याकोबच्या घराण्याचा मी संपूर्ण नाश करणार नाही.
“मी एक यहूदी आहे. आणि किलिकीया प्रांतातील तार्स येथे माझा जन्म झाला. परंतु याच शहरात मी लहानाचा मोठा झालो, आपल्या पूर्वजांच्या नियमांचे सविस्तर शिक्षण मी गमालीएल यांच्या पायाजवळ बसून घेतले. जसे तुम्ही आज देवाविषयीच्या आवेशाने भरलेल आहात तसाच मी देखील देवाविषयीच्या आवेशाने भरलेला होतो.
“मी माझे जीवन तरुणपणापासून माइया प्रांतात व यरुशलेमात कशा रीतिने जगत आलो हे सर्व यहूदी लोकांना चांगले माहीत आहे.
खात्रीने नाही! देव खरा असलाच पाहिजे आणि प्रत्येक मनुष्य खोटा, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, “तू बोलशील तेव्हा योग्य ठरशील आणि तुझा न्याय होत असता तू विजय मिळविशील.”
कारण माझे भाऊ, वंशाने माझे नातेवाईक यांच्याकरिता शापित व्हावे आणि ख्रिस्तापासून मी वेगळा केलेला असावा अशी मी इच्छा करतो.
ते इब्री आहेत काय? मीही आहे. ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? (मी हे मूर्खासारखे बोलतो) मी अधिक आहे.
तर मला अधिक वाटते. मी जेव्हा आठ वर्षांचा होतो, तेव्हा माझी सुंता झाली. मी इस्राएल देशाचा आहे. बन्यामिन वंशाचा आहे. इब्री आईवडिलांपासून झालेला मी इब्री आहे. नियमशास्त्राच्या माझ्या दष्टिकोनाबद्दल म्हणाला तर मी परुशी आहे.