Home Bibles यशया 37:29 · मराठी बायबल
यशया 37:29 · मराठी बायबल

तू माझ्यावर रागावला आहेस व माझी निंदा केली आहेस. तुझे बोलणे मी ऐकले. म्हणून मी तुला शिक्षा करीन. मी तुझ्या नाकात वेसण घालीन. तुला लगाम घालीन आणि तू ज्या रस्त्याने माझ्या देशात आलास, त्याच रस्त्याने मी तुला माझ्या देशातून हाकलून देईन.”

Cross references

2 राजे 19:27

तू कधी स्वस्थ बसतोस, कधी लढाईवर जातोस आणि कधी घरी परततोस, तसेच माझ्याविरुध्द कधी उठतोस ते मला माहीत आहे.

ईयोब 15:25

का? कारण दुष्ट मनुष्य देवाची आज्ञा मानायला तयार नसतो. तो त्याच्या मुठी देवासमोर नाचवतो. तो सर्वशक्तिमान देवाचा पराभव करायचा प्रयत्न करतो.

ईयोब 41:2

ईयोब, तुला लिव्याथानाच्या नाकातून दोरी घालून त्याला वेसण घालता येईल का? किंवा त्याच्या जबड्यात गळ घालता येईल का?

स्तोत्रसंहिता 2:1

इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?

स्तोत्रसंहिता 32:9

म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊनकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा. या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”

स्तोत्रसंहिता 46:6

जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.

स्तोत्रसंहिता 74:4

शत्रूंनी मंदिरात युध्द गर्जना केल्या. ते युध्द जिंकले आहे हे दाखविण्यासाठी त्यांनी मंदिरात झेंडे फडकवले.

स्तोत्रसंहिता 74:23

तुझ्या शत्रूंच्या आरोळ्या विसरु नकोस त्यांनी तुझा पुन्हा पुन्हा अपमान केला आहे.

स्तोत्रसंहिता 83:2

देवा, तुझे शत्रू तुझ्याविरुध्द योजना आखत आहेत. ते लवकरच हल्ला करतील.

स्तोत्रसंहिता 93:3

परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.

यशया 10:12

सीयोनचा डोंगर व यरूशलेम यांच्याबाबतीत योजलेल्या गोष्टी माझा परमेश्वर पार पाडील. नंतर तो अश्शूरला शिक्षा करील. अश्शूरचा राजा फार गर्विष्ठ आहे. त्याच्या अहंकारामुळे त्याने अनेक दुष्कृत्ये केली आहेत. म्हणून परमेश्वर त्याला शिक्षा करील.

यशया 30:28

परमेश्वराचा श्वास (आत्मा), पाणी वाढत जाऊन गळ्यापर्यंत पोहोचणाऱ्या एखाद्या मोठ्या नदीप्रमाणे आहे. परमेश्वर राष्ट्रांचा न्याय करील. हा न्याय कसा असेल? तर ‘नाशाच्या चाळणीतून’ राष्ट्रांना चाळून काढल्याप्रमाणे तो असेल. जसे लगाम घालून जनावरांना ताब्यात ठेवले जाते तसे लोकांना लगाम घालून परमेश्वर नियंत्रणात ठेवील.

यशया 36:4

सेनापती त्या तिघांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीया राजाला अश्शूरचा महान राजा काय सांगतो ते सांगा.सम्राटाचे म्हणजेच अश्शूरच्या राजाचा असा प्रश्र्न आहे की, तुला मदत मिळावी म्हणून तू कशावर पूर्णपणे विश्वास ठेवतोस?

यशया 36:10

शिवाय हेही लक्षात ठेवा की मी या देशात येऊन लढलो तेव्हा परमेश्वर माझ्याच बाजूला होता. मी शहरांचा नाश केला तेव्हा परमेश्वर माझ्याच पाठीशी होता. परमेश्वरानेच मला सांगितले, “ऊठ ह्या देशात जा आणि त्याचा नाश कर.”

यशया 37:7

पाहा! मी माझा आत्मा अश्शूरविरूध्द पाठवीन. अश्शूरच्या राजाला, त्याच्या देशाला असलेल्या धोक्याच्या सुचनेचा वृत्तांत समजेल मग तो त्याच्या देशाला परत जाईल. त्या वेळी त्याच्याच देशात मी त्याला तलवारीने मारीन.”‘

यशया 37:10

“तुम्ही पुढील गोष्टी यहुदाचा राजा हिज्कीया याला सांगाव्या: तू ज्या देवावर विश्वास ठेवतोस त्याच्याकडून फसू नको.‘देव अश्शूरच्या राजाकडून यरूशलेमचा पराभव होऊ देणार नाही.”‘ असे म्हणू नको.

यशया 37:34

तो आला त्याच रस्त्याने स्वत:च्या देशाला परत जाईल. तो ह्या शहरात प्रवेश करणार नाही, हा परमेश्वराने दिलेला संदेश होता.

यहेज्केल 29:4

“पण मी तुझ्या जबड्यात गळ अडकवीन. नाईल नदीतील मासे तुझ्या खवल्यांना चिकटतील. मी तुला आणि त्या माशांना नदीतून ओढून बाहेर काढीन व जमिनीवर टाकीन. तेथून तुम्हाला कोणी उचलणार नाही वा पुरणार नाही. मी तुम्हाला पक्षी व हिंस्र पशू यांच्या स्वाधीन करीन. तुम्ही त्यांचे भक्ष्य व्हाल.

यहेज्केल 35:13

तुला गर्व झाला होता आणि तू माझ्याविरुद्ध बोललास. तू अनेक वेळा माझ्याविरुद्ध बोललास, आणि मी खरेच सांगतो की मी प्रत्येक शब्द ऐकला.”

यहेज्केल 38:4

मी तुला पकडीन आणि परत आणीन. तुझ्या सैन्यातील सर्व माणसांना मी परत आणीन. घोडे व सर्व घोडेस्वार यांनाही मी परत आणीन. मी तुम्हाला सर्वांना वेसण घालून परत आणीन. सर्व सैनिकांनी गणवेश घातलेले असतील आणि ढाली व तलवारी घेतलेल्या असतील.

आमोस 4:2

परमेश्वराने, माझ्या प्रभूने शपथ घेतली आहे. त्याने त्याच्या पवित्र्याची शपथ घेऊन सांगितले की तुमच्यावर संकटे येतील. माशांचा गळ टाकून ते तुमच्या मुलांना नेतील.

नहूम 1:9

यहूदा, तू परमेश्वराविरुध्द कट कारचत आहेस? पण परमेश्वर संपूर्ण विनाश करणार आहे. त्यामुळे तू पुन्हा त्रास देणार नाहीस.

मत्तय 27:24

लोकांच्या पुढे आपले काही चालणार नाही हे पिलाताने पाहिले. उलट लोक अधिक अशांत होऊ लागले होते म्हणून पिलाताने थोडे पाणी घेतले आणि लोकांच्या समोर आपले हात धुतले. मग पिलात म्हणाला, “या मनुष्याच्या मरणाची जबाबदारी माझ्यावर नाही, तुम्हीच त्यासाठी जबाबदार आहात.”

योहान 15:22

जर मी आलो नसतो आणि त्यांना सांगितले नसते तर ते पापबद्धल दोषी ठरले नसते. आता त्यांना त्यांच्या पापाविषयी सबब सांगता येणार नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 9:4

शौल जमिनीवर पडला, एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला! तू माझा छळ का करतोस?”

प्रेषितांचीं कृत्यें 22:22

येथपर्यंत यहूदी लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले मग ते मोठमोठ्याने ओरडून म्हणू लागले, “अशा मनुष्याल पृथ्वीवरुन नाहीसे केले पाहिजे! तो जिवंत राहण्याच्या लायकीचा नाही!’

Interlinear

Choose Theme