सेनापती त्या तिघांना म्हणाला, “तुम्ही जाऊन हिज्कीया राजाला अश्शूरचा महान राजा काय सांगतो ते सांगा.सम्राटाचे म्हणजेच अश्शूरच्या राजाचा असा प्रश्र्न आहे की, तुला मदत मिळावी म्हणून तू कशावर पूर्णपणे विश्वास ठेवतोस?
Cross references
इस्राएलचा देव परमेश्वर याच्यावरच हिज्कीयाचा विश्वास होता. हिज्कीयासारखा राजा यहूदात त्याच्या आधी किंवा नंतरही झाला नाही. यहूदात हिज्कीया याच्या कारकिर्दीचा प्रारंभ
तेव्हा एक सेनापती त्यांना म्हणाला, “अश्शूरचा महान राजा काय म्हणतो ते हिज्कीयाला सांगा:तू कशाचा भरवंसा धरतो आहेस?
यहूदाचा राजा हिज्कीयाला सांगा “तुम्ही ज्या परमेश्वरावर विसंबून आहात त्याच्याकडून फसगत करुन घेऊ नका. तो म्हणतो, ‘अश्शूरचा राजा यरुशलेमचा पराभव करणार नाही.’
माझ्या पूर्वजांनी इतर देशांना मातीला मिळवले. आपल्या लोकांना विनाशातून सोडवण्याची माझ्यासमोर कोणत्याही देवताची प्राज्ञा नाही. तेव्हा तुमचे दैवत तरी तुम्हाला वाचवू शकेल असे वाटते का?
रात्रंदिवस माझे अश्रूच माझे अन्न झाले आहे. सर्व वेळ माझा शत्रू थट्टा करुन म्हणत आहे, “कुठे आहे तुझा देव?”
माझ्या शत्रूंनी मला मारण्याचा प्रयत्न केला. “तुझा देव कुठे आहे?” असे जेव्हा ते मला विचारतात तेव्हा ते माझा तिरस्कार करत आहेत असे दाखवतात.
माझ्या शंत्रूंनी माझ्याविरुध्द योजना आखल्या आहेत. ते लोक खरोखरच एकत्र आले, भेटले आणि मला मारण्याची योजना त्यांनी आखली.
जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो.
कदाचित् आपण जिंकलेल्या आणि त्याच्या हुकमतीखाली असलेल्या प्रदेशांच्या राजांचा अश्शूर येथे निर्देश करत असेल. अश्शूर स्वत:शीच म्हणतो, ‘माझे सर्व राजपुत्र राजेच नाहीत का?
ऐक! तू अश्शूरच्या राजांबद्दल ऐकले आहेस. अश्शूरच्या सैन्याने प्रत्येक देशाचा पराभव केला आहे. अश्शूरचा राजा तुझा पराभव करून तुला ठार मारील.
“आम्ही चांगले सैनिक व शूरवीर आहोत’ असे तुम्ही म्हणू शकत नाही.
अश्शूर सुंदर फांद्या असलेल्या व गर्द छाया असलेल्या लबानोनमधील उंच गंधसरुसारखा होता. त्याचा शेंडा ढगांना भिडला होता.
म्हणून तो वृक्ष मळ्यातील इतर झाडांपेक्षा उंच होता. त्यांला खूप फांद्या फुटल्या. त्याला भरपूर पाणी मिळाल्याने, त्याच्या फांद्या विस्तारल्या.
लोक मोठ्याने ओरडून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला.
हे लोक कुरकुर करणारे व दोष दाखविणारे आहेत, ते आपल्या वासनांप्रमाणे चालणारे आणि आपल्या तोंडाने बढायामारणारे लोक आहेत, ते आपल्या फायद्यासाठी इतरंचा तोंडपूजेपणा करतात.