Home Bibles स्तोत्रसंहिता 93:3 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 93:3 · मराठी बायबल

परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे.

Cross references

स्तोत्रसंहिता 2:1

इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत?

स्तोत्रसंहिता 18:4

माझे शत्रू मला मारण्याचा प्रयत्न करीत होते. मृत्यूच्या दोऱ्या माझ्या भोवती होत्या मृत्युलोकात नेणाऱ्या पुरात मी सापडलो होतो.

स्तोत्रसंहिता 46:3

समुद्र जेव्हा खवळतो आणि पर्वत थरथर कापायला लागतात तेव्हा ही आम्हाला भीती वाटत नाही.

स्तोत्रसंहिता 46:4

एक नदी आहे आणि तिचे ओढे नाले देवाच्या शहरात, सर्वशक्तिमान देवाच्या सर्वांत पवित्र शहरात सुख - समृध्दी आणतात.

स्तोत्रसंहिता 69:1

देवा, मला माझ्या सर्व संकटांपासून वाचव. पाणी आता माझ्या तोंडापर्यंत चढले आहे.

स्तोत्रसंहिता 69:14

मला चिखलातून बाहेर काढ मला चिखलात बुडू देऊ नकोस. माझा तिरस्कार करणाऱ्या लोकांपासून मला वाचव. मला ह्या खोल पाण्यापासून वाचव.

स्तोत्रसंहिता 96:11

स्वर्गांनो, सुखी राहा! पृथ्वीमाते आनंदोत्सव कर. समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा.

स्तोत्रसंहिता 98:7

कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा.

स्तोत्रसंहिता 107:25

देवाने आज्ञा केली आणि जोराचा वारा वाहायला लागला, लाटा उंच उंच जायला लागल्या.

स्तोत्रसंहिता 124:3

आपले शत्रू आपल्यावर जेव्हा रागावले असते तेव्हा त्यांनी आपल्याला जिवंत गिळले असते.

यशया 17:12

समुद्राच्या गर्जनेप्रमाणे येणारा पुष्कळ लोकांचा आक्रोश ऐक. ते मोठ्याने रडत आहेत. लाटा एकमेकीवर आदळून उठणाऱ्या आवाजाप्रमाणे हा आक्रोश आहे.

यशया 55:12

माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील. शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.

यिर्मया 46:7

नील नदीप्रमाणे हा कोण येत आहे? त्या मोठ्या, वेगवान नदीप्रमाणे कोण बरे येत आहे?

योना 2:3

“तू मला समुद्रात फेकलेस तुझ्या प्रचंड लाटा माझ्याभोवती पाणी होते.

प्रेषितांचीं कृत्यें 4:25

आमचा पिता दावीद हा तुझा सेवक होता. पवित्र आत्म्याच्या सहाय्याने त्याने हे शब्द लिहिले:‘राष्ट्रे का ओरडत आहेत? लोक (देवाविरुद्ध) का व्यर्थ कट रचित आहेत?

प्रकटीकरण 12:15

मग त्यासापाने आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. सापाने ते पाणी स्त्रीकडे ओतले यासाठी की तिने त्या पाण्यात वाहत जावे.

प्रकटीकरण 17:15

मग देवदूत मला म्हणाला, “जे पाण्यांचे प्रवाह तू पाहिले, ज्यावर वेश्या बसली होती, ते म्हणजे पुष्कळ लोक,समुदाय, राष्ट्रांचे व भाषा बोलणारे लोक आहेत.

Interlinear

Choose Theme