Home Bibles यशया 33:13 · मराठी बायबल
यशया 33:13 · मराठी बायबल

“दूर देशांत राहणाऱ्या लोकांनो, मी काय केले ते ऐका. माझ्याजवळ राहणाऱ्या, लोकांनो, माझे सामर्थ्य जाणा.”

Cross references

निर्गम 15:14

इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील; पलिष्टी लोक भीतीने थरथरा कांपतील.

यहोशवा 2:9

त्यांना म्हणाली, “परमेश्वराने हा देश तुम्हाला दिला आहे हे मला माहीत आहे. तुमची आम्हांला भीती वाटते. या देशातील सर्व लोक घाबरून गेले आहेत.

यहोशवा 9:9

त्या लोकांनी सांगिलते, “आम्ही तुमचे दास आहोत. तुमच्या परमेश्वर देवाच्या सामर्ध्याची कीर्ती ऐकून आम्ही फार दूरवरून आलो आहोत. त्याने ज्या गोष्टी केल्या त्याबद्दल आम्ही ऐकले. मिसरमध्ये त्याने जे जे केले ते आमच्या ऐकण्यांत आले.

1 शमुवेल 17:46

आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीन आणि धड पशुपक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ट्यांची आम्ही अशीच अवस्था करुन टाकू. मग इस्राएलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल.

स्तोत्रसंहिता 46:6

जेव्हा परमेश्वर रागाने गर्जेल आणि पृथ्वी कोलमडेल तेव्हा ती राज्ये भीतीने थरथर कापतील. ती राष्ट्रे पडतील.

स्तोत्रसंहिता 48:10

देवा तू प्रसिध्द आहेस. पृथ्वीवर सगळीकडे लोक तुझी स्तुती करतात तू किती चांगला आहेस ते प्रत्येकाला माहीत आहे.

स्तोत्रसंहिता 97:8

सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.

स्तोत्रसंहिता 98:1

परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.

स्तोत्रसंहिता 99:2

सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे.

स्तोत्रसंहिता 147:12

यरुशलेम, परमेश्वराची स्तुती कर. सियोन तुझ्या देवाची स्तुती कर.

स्तोत्रसंहिता 148:14

देव त्याच्या माणसांना बलवान करील. लोक त्याच्या भक्तांची स्तुती करतील. लोक इस्राएलची स्तुती करतील. हेच ते लोक ज्यांच्यासाठी देव लढतो. परमेश्वराची स्तुती करा.

यशया 18:3

त्यांना इशारा करा की त्यांचे काहीतरी वाईट होणार आहे. त्या राष्ट्रांचे वाईट होताना जगातील सर्व लोक पाहतील. डोंगरावर फडकणाऱ्या ध्वजाप्रमाणे ही गोष्ट सर्वांना स्वच्छ दिसेल. ह्या उंच लोकांबाबत घडणारी गोष्ट जगातील सर्व लोक रणशिंगाच्या आवाजाप्रमाणे स्पष्टपणे ऐकतील.

यशया 37:20

पण तू परमेश्वर आमचा देव आहेस म्हणून अश्शूरच्या राजाच्या बळापासून आम्हाला वाचव. म्हणजे सर्व देशांना कळेल की परमेश्वरच फक्त खरा देव आहेस.

यशया 49:1

दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो, माझे म्हणणे ऐका. जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.

यशया 52:10

परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील. देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अती दूरच्या सर्व देशांना दिसेल.

यशया 57:19

मी त्यांना ‘शांती’ हा नवा शब्द शिकवीन. माझ्या जवळ वा दूर असणाऱ्यांना मी शांती देईन. मी त्या लोकांना बरे करीन. त्यांना क्षमा करीन.” परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या

दानीएल 3:27

ते बाहेर येताच, प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राजाचे सल्लागार राज्यपाल ह्यांनी त्यांच्याभोवती गर्दो केली. आगीने शद्रख, मेशख व अबेद्नगो जळाले नाही हे त्यांनी पाहिले होते. त्याचे अंग,केस किंवा वस्त्रे काहीच जळाले नव्हते. एवढेच नव्हे तर ते आगीत असूनसुध्दा त्यांच्या अंगाला जळकट वास येत नव्हता.

दानीएल 6:25

मग दारयावेश राजाने पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या, निरनिराव्व्या भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांतील लोकांना पुढील पत्र पाठविले.अभिवादन.

प्रेषितांचीं कृत्यें 2:5

त्यावेळी यरुशलेमामध्ये काही फार धार्मिक यहूदी लोक होते, हे लोक जगातील प्रत्येक देशाचे होते.

इफिसकरांस 2:11

म्हणून, आठवा की एके काळी, तुम्ही यहूदीतर म्हणून जन्मला होता आणि त्यांना (विदेश्यांना) सुंता न झालेले असे, ज्यांची सुंता झालेली होती ते यहूदी लोक म्हणत होते.

Interlinear

Choose Theme