Home Bibles स्तोत्रसंहिता 97:8 · मराठी बायबल
स्तोत्रसंहिता 97:8 · मराठी बायबल

सियोन ऐक आणि आनंदी हो यहुदाच्या शहरांनो, आनंदी व्हा का? कारण परमेश्वर योग्य निर्णय घेतो.

Cross references

1 इतिहास 16:14

परमेश्वर आमचा देव आहे. त्याच्या सामर्थ्याची साक्ष सर्वत्र आहे.

स्तोत्रसंहिता 48:11

देवा, सियोन पर्वत आनंदी आहे यहूदाची शहरे तुझ्या चांगल्या निर्णयामुळे उल्हासित झाली आहेत.

स्तोत्रसंहिता 48:12

सियोन भोवती फिरा, शहर बघा, बुरुज मोजा.

स्तोत्रसंहिता 52:6

चांगले लोक ते बघतील आणि त्यावरुन. ते देवाला घाबरायला आणि त्याचा आदर करायला शिकतील. ते तुला हसतील.

स्तोत्रसंहिता 58:10

वाईट लोकांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल जर त्यांना शिक्षा झाली तर चांगल्या माणसाला आनंद होईल, तो त्या दुष्टांच्या रक्तात आपले पाय धुवेल.

यशया 51:3

त्याचप्रमाणे परमेश्वर सियोनचे आणि तिच्या उदध्वस्त ठिकाणांचे सांत्वन करील. परमेश्वराला तिच्याबद्दल आणि तिच्या लोकांबद्दल खूप वाईट वाटेल. तो तिच्यासाठी खूप काही करील. परमेश्वर वाळवटांचे रूप बदलेल. ते एदेनच्या बागेसारखे होईल. ती ओसाड जमीन देवाच्या बागेसारखी होईल. तेथील लोक खूप खूप सुखी होतील. ते आनंद व्यक्त करतील. ते आभाराची व विजयाची गीते गातील.

यशया 52:7

“शांती प्रस्थापित झाली आहे चांगुलपणा आला आहे. तारण झाले आहे. सियोन, तुमचा देव हाच राजा आहे.” अशी घोषणा देवदूताकडून ऐकणे असे शुभवर्तमान घेऊन टेकड्यांवरून येणारा देवदूताचा आवाज ऐकणे ही खरोखरच विस्मयकारक गोष्ट आहे.

यशया 62:11

ऐका! परमेश्वर दूरवरच्या देशांशी बोलत आहे “सियोनच्या लोकांना सांगा, पाहा! तुमचा तारणारा येत आहे. त्याचे बक्षिस त्याच्याजवळ आहे. त्याचे कर्म त्याच्या समोर आहे.”

सफन्या 3:14

यरुशलेम, गा आणि सुखी हो! इस्राएल, आनंदाने जल्लोष कर!यरुशलेम, आनंदात राहा! मजा कर!

जखऱ्या 9:9

सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.

मत्तय 21:4

हे यासाठी घडले की संदष्ट्यांपैकी एक जण जे बोलला होता ते पूर्ण व्हावे:

प्रकटीकरण 18:20

हे स्वर्गा, तिच्याबद्दल आनंद कर! संतानो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो आनंद करा! तिने ज्या प्रकारे तुम्हाला नागविलेत्याबद्दल देवाने तिचा न्याय केला आहे.”

प्रकटीकरण 19:1

यानंतर मी मोठ्या जनसमुदायाच्या गर्जनेसारखा स्वर्गातून आवाज ऐकला. ते म्हणत होते:“हालेलुया! तारण, गौरव आणि सत्ता आमच्या देवाची आहेत

Interlinear

Choose Theme