Home Bibles 1 शमुवेल 17:46 · मराठी बायबल
1 शमुवेल 17:46 · मराठी बायबल

आज आमचा देव तुझा पराभव करील. मी तुला ठार करीन. तुझे मुंडके छाटीन आणि धड पशुपक्ष्यांना खायला टाकीन. सगळ्या पलिष्ट्यांची आम्ही अशीच अवस्था करुन टाकू. मग इस्राएलमधील परमेश्वराचे अस्तित्व सगळ्या जगाला कळेल.

Cross references

उत्पत्ति 40:19

तीन दिवस संपण्याच्या आत फारो राजा तुला या बंदीवासातून सोडवील आणि तुझे शीर उडवून टाकील व तुझे धड झाडाला टांगील; आणि पक्षी तुझ्या धडाचे मांस तोडून खातील.”

निर्गम 9:16

परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे. मग सर्व जगाला मी कोण आहे हे कळेल.

निर्गम 15:14

इतर राष्ट्रे ही गोष्ट ऐकून भयभीत होतील; पलिष्टी लोक भीतीने थरथरा कांपतील.

अनुवाद 7:2

तुमचा देव परमेश्वर त्यांना तुमच्या अधिपत्याखाली आणेल आणि तुम्ही त्यांचा पराभव कराल तेव्हा तुम्ही त्यांचा समूळ विध्वंस करा. त्यांच्याशी कुठलाही करार करु नका. त्यांना दया दाखवू नका.

अनुवाद 7:23

पण त्या राष्ट्रांचा बिमोड करण्यात तुमचा देव परमेश्वर तुम्हाला साहाय्य करील. युद्धात त्यांच्यात गोंधळ माजवील आणि शेवटी त्यांचा नाश होईल.

अनुवाद 9:2

तेथील अनाकी वंशाचे लोक उंच आणि धिप्पाड आहेत. हे तुम्हाला माहीत आहेच. त्यांचा पाडाव कोणी करु शकणार नाही असे त्यांच्याबद्दल आपल्या हेरांनी म्हटलेले तुम्ही ऐकलेले आहे.

अनुवाद 28:26

तुमच्या प्रेतांवर जंगली श्र्वापदे आणि पक्षी ताव मारतील आणि त्यांना हुसकावून लावायला कोणी असणार नाही.

यहोशवा 4:24

आपला परमेश्वर अतिशय प्रतापी आहे हे जाणून येथील लोकांना त्याचा धाक वाटावा म्हणून तुमच्या परमेश्वर देवाने असे केले.”

यहोशवा 10:8

परमेश्वर यहोशवाला म्हणाला, “या सैन्याची भीती बाळगू नका. त्याचां पराभव करण्याची मी तुम्हाला आनुज्ञा देत आहे. यांच्यापैकी कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही.”

1 शमुवेल 17:44

दावीदला तो म्हणाला, “जवळ ये आज पक्ष्यांना आणि वन्य, प्राण्यांना तुझे मांस खाऊ घालतो.”

1 राजे 8:43

तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.

1 राजे 18:36

दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.

1 राजे 18:37

हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.”

2 राजे 5:15

नामान आणि त्याच्या बरोबरचे लोक अलीशा संदेष्ट्याकडे आले. त्याच्यासमोर उभे राहून म्हणाले, “इस्राएल मधल्या खेरीज दुसरा कोणी परमेश्वर पृथ्वीतलावर नाही हे आता मला कळले. माझ्याकडून कृपया, ही भेट घ्यावी.”

2 राजे 19:19

तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल.”

स्तोत्रसंहिता 31:8

तू माझ्या शत्रूंना मला घेऊन जाऊ देणार नाहीस तू मला त्यांच्या सापळ्यातून मुक्त करशील.

स्तोत्रसंहिता 46:10

देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”

यशया 37:20

पण तू परमेश्वर आमचा देव आहेस म्हणून अश्शूरच्या राजाच्या बळापासून आम्हाला वाचव. म्हणजे सर्व देशांना कळेल की परमेश्वरच फक्त खरा देव आहेस.

यशया 52:10

परमेश्वर त्याची पवित्र शक्ती सर्व राष्ट्रांना दाखवील. देव त्याच्या लोकांना कसे वाचवितो हे अती दूरच्या सर्व देशांना दिसेल.

यशया 56:9

वन्य पशूंनो, या व खा.

यिर्मया 19:7

येथेच मी यहूदातील व यरुशलेममधील रचलेले बेत हाणून पाडीन. त्या लोकांचा शत्रू पाठलाग करतील. मी ह्या ठिकाणी यहूदातील लोकांना तलवारीच्या घावांनी मरु देईन. त्यांची प्रेते गिधाडे व वन्य पशू ह्यांचे भक्ष्य होईल.

दानीएल 2:47

मग राजा दानीएलला म्हणाला,” तुझा देव अती महत्वाचा व सामर्थ्यशाली आहे, ह्याची मला खात्री पटली. तो परमेश्वरच राजांचा राजा आहे, तो लोकांना अज्ञात गोष्टी सांगतो, हे खरेच आहे म्हणून तू रहस्याचा उलगडा करून देऊ शकलास.

दानीएल 3:29

म्हणून मी आता असा नियम करतो की शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या देवाच्याविरुध्द बोलणाऱ्याचे मग तो कोठल्याही राष्ट्राचा वा कोठलीही भाषा बोलणारा असो, तुक़डे तुकडे करण्यात येतील. व त्याच्या घराची राखरांगोळी करण्यात येईल. दुसरा कोठलेही दैवत आपल्या माणसांना असे वाचवू शकणार नाही.

दानीएल 6:26

“मी नवीन कायदा करीत आहे. हा कायदा राज्याच्या सर्व भागातील सर्व लोकांना लागू आहे. तुम्ही सर्वांनी दानीएलच्या देवाला भ्यायला पाहिजे आणि त्याचा मान राखला पाहिजे. दानीएलचा देव हा जिंवत देव आहे, साक्षात देव आहे. तो सनातन आहे. क्ष्याच्या राज्याचा कधीच नाश होत नाही. क्ष्याचा प्रभाव कधीच नाहीसा होत नाही.

मत्तय 24:28

जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही असतील.

प्रकटीकरण 19:17

नंतर सूर्यात उभा राहिलेला एक देवदूत मी पाहिला. तो मोठ्याने ओरडून आकाशामध्ये उडणाऱ्या सर्व पक्ष्यांना म्हणतहोता, “या! देवाच्या महान मेजवानीसाठी जमा व्हा!

Interlinear

Choose Theme