पण तू परमेश्वर आमचा देव आहेस म्हणून अश्शूरच्या राजाच्या बळापासून आम्हाला वाचव. म्हणजे सर्व देशांना कळेल की परमेश्वरच फक्त खरा देव आहेस.
Cross references
मी माझे सगळे सामर्थ्य वापरून असा आजार तुम्हावर पाठवू शकतो की त्यामुळे तू व तुझी प्रजा या पृथ्वीवरून नष्ट व्हाल.
परमेश्वरा मी माझ्या जिवाची शपथ घेतो. मला आता बोलण्यासारखे काही उरले नाही. इस्राएल शत्रूला शरण गेला आहे.
यावर दावीद त्या पलिष्टी गल्याथला म्हणाला, “तुझी तलवार, भाला-बरची यांच्या बळावर तू माझ्याकडे आला आहेस. पण मी मात्र इस्राएलच्या सैन्याच्या सर्व शक्तिमान परमेश्वराचे नाव घेऊन तुला सामोरा येत आहे. तू त्याला दूषणे दिली होतीस.
तर तू स्वर्गातून त्यांचीही प्रार्थना ऐक. त्यांच्या मनासारखे कर. म्हणजे इस्राएली लोकांप्रमाणेच या लोकांनाही तुझ्याबद्दल भय आणि आदर वाटेल. तुझ्या सन्मानार्थ हे मंदिर मी बांधले आहे हे मग सर्व लोकांना कळेल.
आजची माझी प्रार्थना आणि माझे मागणे परमेश्वर सतत लक्षात ठेवो. हा राजा त्याचा सेवक आहे. त्याच्यासाठी आणि इस्राएल लोकांसाठी त्याने एवढे करावे. एकदिवसही त्यात खंड पडू देऊ नये.
परमेश्वराने एवढे केले तर हा एकच खरा देव आहे हे जगभरच्या लोकांना कळेल.
दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे.
देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”
रागाने तू त्यांचा नाश कर, त्यांचा सर्वनाश कर.नतंर लोकांना कळेल की देव याकोबाच्या लोकांवर आणि सर्व जगावर राज्या करतो.
देवा, मला दया दाखव आणि आशीर्वाद दे. कृपाकरुन आमच्या स्वीकार कर!
देवा, त्या लोकांना खूप घाबरवून सोड आणि त्यांना कायमचे लज्जित कर. त्यांना काळीमा फास आणि त्यांचा नाश कर.
“मी परमेश्वर आहे माझे नाव यहोवा, मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही. माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही.
मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली, पण तरीही तू मला ओळखत नाहीस.
मी त्या मोठ्या राष्ट्रांना दाखवून देईन की माझे नाव खरोखरच पवित्र आहे. तुम्ही त्या राष्ट्रांत माझ्या पवित्र नावाला कलंक लावलात. पण मी पवित्र आहे. हे मी तुम्हाला दाखवून देईन. मग त्या राष्ट्रांना, मी परमेश्वर असल्याचे, समजेल.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.
देव म्हणाला, “मी जे केले, ते इतर राष्ट्रांना पाहू देईन. मग ती राष्ट्रे मला मान द्यायला लागतील. त्या शत्रूविरुद्ध वापरलेले माझे सामर्थ्य ते पाहतील.
“सर्वजगातील लोक माझ्या नावाचा मान राखतात. सर्व जगातील लोक मला उत्तम भेटी आणतात. भेट म्हणून उत्तम धूप माझ्यापुढे जाळतात. का? कारण त्या सर्व लोकांना माझ्या नावाचे महत्व वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.