Home Bibles यशया 30:27 · मराठी बायबल
यशया 30:27 · मराठी बायबल

पाहा! परमेश्वराचे नाव दुरवरून येत आहे, दाट धुराचे ढग पसरविणाऱ्या आगीप्रमाणे त्याचा राग आहे. परमेश्वराचे तोंड रागाने भरले आहे. त्याची जीभ ज्वालेप्रमाणे दिसत आहे.

Cross references

अनुवाद 32:22

माझा क्रोध धगधगणाऱ्या अग्नीप्रमाणे आहे. अधोलोकाच्या तळापर्यंत तो जाळत जातो. पृथ्वी व तिच्यावरील वनस्पती, पर्वतांचे पायथे यांनाही तो भस्मसात करतो.

अनुवाद 33:2

“परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला दहाहजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिकत्याच्याबरोबर होते.

स्तोत्रसंहिता 18:7

पृथ्वी हादरली आणि कंपित झाली. स्वर्गाचा पाया हादरला. का? कारण परमेश्वर क्रोधित झाला होता.

स्तोत्रसंहिता 79:5

देवा, तू आमच्यावर कायमचाच रागावणार आहेस का? देवा, तुझे भावनोद्रेक आम्हाला आगीत असेच जाळत राहणार आहेत का?

यशया 9:5

लढाईत वापरलेला प्रत्येक बूट आणि रक्ताळलेला प्रत्येक गणवेश ह्यांचा नाश होईल. ह्या गोष्टींची होळी केली जाईल.

यशया 10:5

देव म्हणेल, “मी अश्शूरचा उपयोग छडीप्रमाणे करीन. रागाच्या भरात मी अश्शूरकडून इस्राएलला शिक्षा करीन.

यशया 10:16

अश्शूर स्वत:ला श्रेष्ठ समजतो पण सर्वशक्तिमान परमेश्वर एक भयानक रोग अश्शूरमध्ये पसरवील. ज्याप्रमाणे रोगी माणसाचे वजन घटते, त्याप्रमाणे अश्शूरचे वैभव व सामर्थ्य घटेल. नंतर अश्शूरचे वैभव नष्ट होईल. तो रोग सर्वभक्षक आगीप्रमाणे असेल.

यशया 33:12

लोकांची हाडे चुन्याप्रमाणेहोईपर्यंत म्हणजेच हाडांचा भुगा होईपर्यंत लोक जाळले जातील. काटे आणि वाळलेली झुडुपे ह्यांच्याप्रमाणे चटकन ते जळतील.

यशया 34:9

अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल.

यशया 59:19

नंतर पक्ष्चिमेकडील लोक घाबरतील आणि परमेश्वराला मान देतील. पूर्वेकडचे लोक घाबरतील आणि देवाच्या गौरवांचा आदर करतील. देवाने सोडलेल्या झंझावातामुळे, वेगाने वाहणाऱ्या नदीप्रमाणे, देव जलद गतीने येईल.

यशया 66:14

खरोखरी आनंद देणाऱ्या गोष्टी तुम्हाला दिसतील. तुम्ही स्वतंत्र व्हाल आणि गवताप्रमाणे वाढाल. परमेश्वराचे सेवक त्याचे सामर्थ्य पाहतील आणि परमेश्वराचे शत्रू त्याचा राग अनुभवतील.

यशया 66:15

पाहा! परमेश्वर अग्नी घेऊन येत आहे. परमेश्वराचे सैन्य धुळीचे लोट उडवीत येत आहे. आपल्या रागाचा उपयोग परमेश्वर लोकांना शिक्षा करण्यासाठी करील. परमेश्वर रागावल्यावर त्या लोकांना अग्नीच्या ज्वाळांनी शिक्षा करील.

विलापगीत 1:12

रस्त्यावर जाणाऱ्या-येणाऱ्यांनो, तुम्हाला काहीच वाटत नाही असे दिसते! पण जरा माझ्याकडे निरखून पाहा. माझ्या वेदनेप्रमाणे आणखी दुसऱ्या कोणाच्या विदना आहेत का? माझ्या वाठ्याला आलेल्या यातनांप्रमाणे दुसऱ्या काही यातना आहेत का? परमेश्वराने शिक्षा म्हणून मला दिलेल्या विदनेप्रमाणे दुसऱ्या वेदना आहेत का? त्याच्या कोपाच्या दिवशी त्याने मला शिक्षा केली आहे.

दानीएल 7:9

“मी पाहतो तर आपापल्या जागी सिंहासने मांडली गेली व त्यावर प्राचीन राजा त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे कपडे व केस कापसाप्रमाणे सफेद होते. त्याचे सिंहासन अग्नीचे होते. व सिंहासनाची चाके ज्वालांची केलेली होती.

नहूम 1:5

परमेश्वर येईल तेव्हा पर्वतांचा भीतीने थरकाप होईल टेकड्या वितळून जातील परमेश्वर येईल तेव्हा धरणी भयभीत होऊन थरथर कापेल. एवढेच नाही तर, हे जग आणि त्यातील प्रत्येक माणूस भीतीने कापेल.

सफन्या 3:8

परमेश्वर म्हणाला, “थोडे थांब मी ऊभा राहून तुझा न्यायनिवाडा करण्याची वाट बघ! अनेक राष्ट्रांतील लोकांना गोळा करुन, तुला सजा देण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा मला हक्‌क आहे. माझा तुझ्यावरचा राग दाखविण्यासाठी मी त्या लोकांचा उपयोग करीन. मी किती चिडलो आहे हे त्यावरुन कळेल. संपूर्ण देशाचा नाश होईल.

मलाखी 1:11

“सर्वजगातील लोक माझ्या नावाचा मान राखतात. सर्व जगातील लोक मला उत्तम भेटी आणतात. भेट म्हणून उत्तम धूप माझ्यापुढे जाळतात. का? कारण त्या सर्व लोकांना माझ्या नावाचे महत्व वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

2 थेस्सलनीकाकरांस 2:8

आणि मग दुष्ट प्रकट होईल. प्रभु येशू त्याला आपल्या मुखातील श्वासाने मारुन टाकील आणि प्रभु जेव्हा त्याच्या येण्याच्या वेळी मोठ्या वैभवाने प्रकट होईल तेव्हा तो त्याचा नाश करील.

इब्री लोकांस 12:29

कारण आपला देव भस्म करणारा अग्नि आहे.

Interlinear

Choose Theme