Home Bibles अनुवाद 33:2 · मराठी बायबल
अनुवाद 33:2 · मराठी बायबल

“परमेश्वर सीनाय येथून आला. उष:कालच्या प्रकाशाप्रमाणे तो सेईर वरुन आला, पारान डोंगरावरुन प्रकाशला दहाहजार देवदूतांसमवेत आला देवाचे समर्थ सैनिकत्याच्याबरोबर होते.

Cross references

निर्गम 19:18

सीनाय पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर पर्वतातून वर आला. परमेश्वर पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून असे झाले; आणि सर्व सीनाय पर्वत थरथरु लागला.

अनुवाद 5:22

पुढे मोशे, म्हणाला, “ही वचने परमेश्वराने अग्नी, मेघ आणि घनदाट अंधार यातून तुम्हाला मोठ्या आवाजात सांगितली. तेव्हा तुम्ही त्या पर्वताशी एकत्र जमला होता. एवढे सांगितल्यावर अधिक न बोलता त्याने ती दोन दगडी पाट्यांवर लिहून माझ्याकडे दिली.

शास्ते 5:4

परमेश्वरा. पूर्वी जेव्हा तू सेईरमधून आलास, अदोम भूमीतून तू कूच केलेस. तेव्हा पृथ्वी थरारली. आकाशाने वर्षाव केला ढगातून वृष्टी झाली.

1 राजे 11:18

1मिद्यानहून पुढे ते सर्व पारान येथे गेले. तिथे त्यांना आणखी काही जण येऊन मिळाले. मग हा सगळा जथा मिसरला गेला. मिसरचा राजा फारो याच्याकडे त्यांनी आश्रय घेतला. फारोने हदादला राहायला एक घर आणि थोडी जमीन देऊ केली. त्याच्या अन्रवस्त्राची सोय केली.

स्तोत्रसंहिता 50:2

सियोन पर्वतावरुन चमकत असलेला देव सुंदर आहे.

स्तोत्रसंहिता 68:7

देवा, तू तुझ्या माणसांना मिसरमधून बाहेर काढलेस. तू वाळवंटातून चालत गेलास.

स्तोत्रसंहिता 68:17

परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.

स्तोत्रसंहिता 68:18

तो उंच पर्वतावर गेला, त्याने कैद्यांची पलटण बरोबर नेली. त्याने माणसांकडून जे त्याच्या विरुध्द होते, त्यांच्याकडूनही नजराणे घेतले. परमेश्वर, देव तेथे राहाण्यासाठी गेला.

दानीएल 7:9

“मी पाहतो तर आपापल्या जागी सिंहासने मांडली गेली व त्यावर प्राचीन राजा त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे कपडे व केस कापसाप्रमाणे सफेद होते. त्याचे सिंहासन अग्नीचे होते. व सिंहासनाची चाके ज्वालांची केलेली होती.

हबक्कूक 3:3

तेमानहून देव येत आहे. पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे. परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते.

प्रेषितांचीं कृत्यें 7:53

तुम्हीच लोक आहात, ज्यांना नियमशास्त्र मिळाले. देवाने हे नियमशास्त्र देवदूतांकरवी दिले. परंतु तुम्ही ते पाळीत नाही!”

2 करिंथकरांस 3:7

आता जर सेवेमुळे मरण येते, जी दगडावर अक्षरांनी कोरलेली होती आणि जर ती सेवा गौरवाने आली, यासाठी की, इस्राएल लोकांना मोशेच्या चेहऱ्याचे तेजोवलय पाहता येऊ नये, जरी ते तेज कमी होत चालले होते.

2 करिंथकरांस 3:9

कारण जर सेवा जी माणसाचा निषेध करते ती गौरवी असेल, तर तिच्यापेक्षा कितीतरी गौरवी ती सेवा असेल जी नीतिमत्व आणते!

गलतीकरांस 3:10

परंतु नियमशास्त्राच्या कृतीवर जे अवलंबून राहतात ते शापित आहेत. कारण शास्त्रात असेलिहिले आहे की, “नियमशास्त्राच्या पुस्तकात लिहिलेल्या सर्व गोष्टी करण्यात जो कोणी टिकून राहत नाही, तो शापितअसो.”

गलतीकरांस 3:19

तर मग, नियमशास्त्राचा उद्देश काय होता? ज्या संतानाला वचन दिले होते त्याच्या येण्यापर्यंत पापामुळे ते अभिवचनालाजोडण्यात आले होते. नियमशास्त्र हे देवदूताकरवी मोशे या मध्यस्थाच्या होती देण्यात आले.

2 थेस्सलनीकाकरांस 1:7

आणि आमच्याबरोबर जे तुम्ही दु:ख भोगीत आहात त्यांना आमच्याबरोबर विश्रांती देण्यासाठी, प्रभु येशू प्रकट होताना तो स्वर्गातून आपले सामर्थ्यवान दूत आणि अग्निज्वालेसह येईल.

इब्री लोकांस 2:2

कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते.

इब्री लोकांस 12:20

कारण ते जी आज्ञा केली होती सहन करू शकले नाहीत. “जर एखाद्या प्राण्याने जरी पर्वताला स्पर्श केला तरी त्याला दगडमार करण्यात यावा.”

यहूदा 1:14

हनोख, आदामापासूनचा सातवा मनुष्य यानेसुद्धा या लोकांविषयी असेच भाकीत केले आहे: “पाहा हजारो पवित्रदेवदूतांसह प्रभु येत आहे.

प्रकटीकरण 5:11

मग मी पाहिले सिंहासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्या सभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांचीसंख्या अयुतांची अयुते व हजारो हजार होती.

Interlinear

Choose Theme