Home Bibles 2 थेस्सलनीकाकरांस 2:8 · मराठी बायबल
2 थेस्सलनीकाकरांस 2:8 · मराठी बायबल

आणि मग दुष्ट प्रकट होईल. प्रभु येशू त्याला आपल्या मुखातील श्वासाने मारुन टाकील आणि प्रभु जेव्हा त्याच्या येण्याच्या वेळी मोठ्या वैभवाने प्रकट होईल तेव्हा तो त्याचा नाश करील.

Cross references

2 शमुवेल 23:7

त्याचा स्पर्श झाला तर लाकडी आणि पंचदातूचा भाला टोचावा तशा वेदना होतात. (होय, असा माणूस काट्यासारखा असतो) त्यांना आगीच्या भक्ष्य स्थानी टाकतील आणि ती जळून खाक होतील.

ईयोब 4:9

असे लोक देवाच्या शिक्षेमुळे मारले जातात. देवाचा क्रोध त्यांना नष्ट करतो.

स्तोत्रसंहिता 18:15

परमेश्वरा, तू धमकावून बोललास आणि सोसाट्याचा वारा तुझ्या मुखातून बाहेर पडला पाणी हटवले गेले आणि आम्हाला समुद्राचा तळ दिसू शकला. आम्हाला पृथ्वीचा पाया बघता आला.

यशया 11:4

तो गरिबांना प्रामाणिकपणे व सरळपणे न्याय देईल. ह्या देशातील गरिबांसाठी ज्या गोष्टी करण्याचे त्याने ठरविले असेल त्या तो न्यायबुध्दीने करील. त्याने जर काही लोकांना फटकावयाचे ठरविले तर तो तशी आज्ञा देईल आणि त्या माणसांना फटके बसतील. त्याने दुष्टांना मारायचे ठरविले, तर त्याच्या आज्ञेने त्यांना ठार मारले जाईल. चांगलुपणा व प्रामाणिकपणा ह्या मुलाला सामर्थ्य देईल. ते त्याचे संरक्षक कवच असतील.

दानीएल 7:10

प्राचीन राजाच्या समोरून अग्नीची नदी वाहत होती करोडो लोक त्याची सेवा करीत होते. कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. हे दृश्य, न्यायालय सुरू होण्याच्या तयारीत आहे व सर्वांची खाती आत्म उघडली जाणार आहेत, अशा प्रकारचे होते.

दानीएल 7:26

“पण न्यायालय काय घडावे ते ठरवील.मग त्या राजाची सत्ता काढून घेण्यात येईल. त्याच्या राज्याचा पूर्णपणे अंत होईल.

होशेय 6:5

मी संदेष्ट्यांचा उपयोग करुन लोकांसाठी नियम केले. माझ्या आज्ञेप्रमाणे लोकांना ठार मारले गेले. त्या निर्णयांतून चांगल्या गोष्टी निर्माण होतील.

मत्तय 13:19

कोणी राज्याची गोष्ट ऐकतो पण ती त्याला समजत नाही, तेव्हा तो दुष्ट (सैतान) येतो व त्याच्या अंत:करणात पेरलेले ते घेतो, वाटेवर पेरलेला तो हाच आहे.

मत्तय 13:38

आणि शेत हे जग आहे. चांगले बी हे देवाच्या राज्यातील मुले आहेत आणि निदण हे दुष्टाचे (सैतानाचे) मुलगे आहेत.

2 थेस्सलनीकाकरांस 1:8

आणि ज्यांना देव माहीत नाही आणि आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या सुवार्तेसाठी आवश्यक त्या आज्ञा पाळीत नाहीत त्यांना देव शिक्षा करील.

2 थेस्सलनीकाकरांस 2:3

तर कोणीही तुम्हाला कोणत्याही प्रकारे फसवू नये. म्हणून सावध असा. मी असे म्हणतो कारण पहिल्यांदा मोठी बंडखोरी झाल्याशिवाय प्रभूचा दिवस येणार नाही. आणि जो नाशासाठी नेमला आहे, तो नियम मोडणारा प्रकट होईल.

1 तीमथ्याला 6:14

आपल्या प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रकट होण्याच्या समयापर्यत निष्कलंक आणि दोषरहित राहावे म्हणून ही आज्ञा पाळ.

2 तीमथ्थाला 1:10

पण जी आता आम्हाला आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या भूतलावर अवतीर्ण होण्याने प्रगट करण्यात आली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अमरत्व व जीवन प्रकाशात आणले.

2 तीमथ्थाला 4:1

देवासमोर आणि ख्रिस्त येशूसमोर मी तुला गांभीर्याने आज्ञा करतो, जे जिवंत आहेत व जे मेलेले आहेत त्यांचा येशू ख्रिस्त हाच न्याय करणार आहे. येशू ख्रिस्ताचे राज्य व त्याचे परत येणे याविषयी घोषणा कर. मी तुला देवासमोर व ख्रिस्तसमोर ही आज्ञा करतो.

2 तीमथ्थाला 4:8

आता माझ्यासाठी विजेत्यासाठी असलेला मुकुट जो नीतिमत्त्व, तो वाट पाहत आहे. आणि प्रभु जो नीतिमान न्यायाधीश, तो मला त्या दिवशी मुकुट देईल आणि केवळ मलाच तो देईल असे नाही तर जे सर्व त्याच्या येण्याची प्रेमाने वाट पाहत आहेत, अशा सर्वांना देईल.

तीताला 2:13

आणि आपली धन्य आशा म्हणजे आपला महान देव व आपला तारणारा येशू ख्रिस्त याच्या गौरवी प्रकट होण्याच्या दिवसाची आतुरतेने वाट पाहावी.

इब्री लोकांस 10:27

पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही.

1 योहान 2:13

वडिलांनो, मी तुम्हांला लिहितो कारण जो सुरुवातीपासून अस्तित्वात आहे, त्याला तुम्ही ओळखता. तरुणांनो, मीतुम्हांला लिहीत आहे, कारण दुष्टावर तुम्ही जय मिळविला आहे.

1 योहान 3:12

काईन जो त्या दुष्टाचा (सैतानाचा)होता तसे आम्ही असू नये कारण त्याने त्याच्या भावाला मारले आणि कोणत्या कारणासाठी त्याने त्याला मारले? त्याने तसेकेले कारण त्याची स्वत:ची कृत्ये दुष्ट होती, तर त्याच्या भावाची कृत्ये चांगली होती.

1 योहान 5:18

आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देवस्वत: त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्याला हात लावू शकत नाही.

प्रकटीकरण 1:16

त्याच्या उजव्या हातात सात तारे होते. त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली.तो दिवसाच्या मध्यान्ही अतिशय प्रखर तेजाने प्रकाशणाऱ्या सूर्यासारखा दिसत होता.

प्रकटीकरण 2:16

म्हणून पश्चात्ताप करा! नाहीतर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशीलढेन.

प्रकटीकरण 18:8

म्हणून एका दिवसात तिच्या पीडा तिच्यावर येतील. (त्या पीडा म्हणजे): मृत्यू, शोक आणि दुष्काळ ती आगीत भस्महोऊन जाईल कारण सामर्थ्यशाली प्रभु देव तिचा न्याय करील.”

प्रकटीकरण 19:15

त्याच्या तोंडातून एक धारदार तरवार येते जिच्याने तो राष्ट्रांना नमवील,आणि लोखंडी दंडाने तो त्यांच्यावर सता गाजवील. सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाची द्राक्षे तो द्राक्षकुंडामध्ये तुडवील.

प्रकटीकरण 19:20

त्या श्र्वापदाला पकडण्यात आले. त्या प्राण्याच्या समक्ष ज्या खोट्यासंदेष्ट्याने चमत्कार केले होते, त्याला देखील प्राण्याबरोबर पकडण्यात आले. प्राण्याचा शिक्का अंगावर असलेल्या आणित्याच्या मूर्तीची उपासना करणाऱ्या लोकांना त्या खोट्या संदेष्ट्याने चमत्कार दाखवून फसविले, त्या दोघांना (प्राणी आणिखोटा संदेष्टा यांना) धगधगत्या गंधकाच्या अग्नीने भरलेल्या तळ्यात जिवंत असे टाकण्यात आले.

प्रकटीकरण 20:10

मग ज्याने त्यांना फसविले होते, त्याला त्या धगधगत्यासरोवरामध्ये, श्र्वापद आणि खोटा संदेष्टा यांना टाकले होते त्या गंधकाच्या तळ्यात टाकण्यात येईल. आणि त्यांनाअनंतकाळ रात्रंदिवस पीडा होत राहील.

Interlinear

Choose Theme