Home Bibles यशया 30:26 · मराठी बायबल
यशया 30:26 · मराठी बायबल

त्या वेळी, चंद्राचा प्रकाश सूर्यप्रकाशाप्रमाणे प्रखर होईल आणि सूर्यप्रकाश आतापेक्षा सातपट प्रखर होईल. एकादिवसाचा सूर्यप्रकाशआठवड्यातील सूर्यप्रकांशाइतका असेल. परमेश्वर जेव्हा त्याच्या जखमी लोकांना मलमपट्टी करील आणि माराने झालेल्या त्यांच्या जखमा बऱ्या करील तेव्हा असे घडेल.

Cross references

अनुवाद 32:39

“तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!

ईयोब 5:18

देव त्याने केलेल्या जखमांवर मलमपट्टी करतो. तो दुखापत करतो पण त्याचे हात ती बरी करतात.

यशया 1:5

देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे.

यशया 11:9

ह्या सगळ्या गोष्टीवरून, तेथे शांती नांदेल, हेच दिसते. कोणीही माणूस दुसऱ्याला दुखविणार नाही. माझ्या पवित्र डोंगरावर राहणारे लोक वस्तूंचा नाश करू इच्छिणार नाहीत. का? कारण लोकांना परमेश्वराची खरी ओळख पटेल. समुद्रात जसे अथांग पाणी असते, तसेच त्यांना परमेश्वराबद्दल खूपच ज्ञान झालेले असेल.

यशया 24:23

यरूशलेममधील सीयोन पर्वतावर परमेश्वराचे राज्य असेल. त्या देवाचे तेज नेत्यांना दिसेल. त्याच्या तेजापुढे चंद्र ओशाळेल आणि सूर्याला लाज वाटेल.

यशया 60:19

“या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल.

यिर्मया 30:17

मी तुम्हाला पुन्हा तंदुरस्त करीन. तुमच्या जखमा मी बऱ्या करीन. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस. ते म्हणतात, सियोनची काळजी करणारे कोणीही नाही.”

यिर्मया 33:5

“यरुशलेमच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या. म्हणून मला त्या लोकांचा खूप राग आला. मी त्यांच्याविरुद्ध गेलो. मी तेथे पुष्कळ माणसे मारीन. बाबेलचे सैन्य यरुशलेमविरुद्ध लढण्यास येईल. यरुशलेमच्या घरांत खूप मृतदेह असतील.

विलापगीत 2:13

सियोनच्या कुमारी कन्ये, मी तुझी तुलना कोणाशी करू शकतो? कशाबरोबर मी तुझी तुलना करू हे सियोनच्या कुमारी कन्ये? मी तुझे सांत्वन कसे करू? तुझा नाश समुद्राप्रमाणे प्रचंड आहे. तुला कोणी बरे करु शकेल असे मला वाटत नाही.

होशेय 6:1

“चला! आपण परमेश्वराकडे परत जाऊ या! त्याने आपल्याला दुखविले, पण तोच आपल्याला बरे करील. त्याने आपल्याला जखमी केले, पण तोच त्यावर मलमपट्टी करील.

आमोस 9:11

दाविदचा तंबू पडला आहे. पण त्या वेळी, मी तो तंबू पुन्हा उभारीन. मी भिंतींतील भगदाडे बुजवीन. उद्ध्वस्त झोलेल्या वास्तू मी पुन्हा बांधीन. मी त्या पूर्वाे होत्या, तशाच बांधीन.

जखऱ्या 12:8

पण परमेश्वर यरुशलेमच्या लोकांना वाचवील. सर्वात जास्त दुर्बल माणूससुध्दा दावीदासारखा वीर बनेल. आणि दावीदाच्या घराण्यातील पुरुष देवतांप्रमाणे होतील. परमेश्वराच्या स्वत:च्या दूताप्रमाणे ते लोकांचे नेतृत्व करतील.

इब्री लोकांस 6:1

म्हणून ख्रिस्ताविषयीची प्राथमिक माहिती आपण मागे सोडून देऊ व प्रौढतेप्रत जाऊ.

प्रकटीकरण 21:23

प्रभु देवाचे जे तेज ते अखिल नगराला उजेड पुरवीत होते, आणिकोकरा हा त्याचा दिवा आहे.

प्रकटीकरण 22:5

त्या नगरात यापुढे कधीहीरात्र होणार नाही. लोकांना प्रकाश मिळविण्यासठी ह्यापुढे कुठल्याही दिव्याची अथवा सूर्याची गरंज पडणार नाही; कारण प्रभुदेव आपला प्रकाश त्यांना पुरवील. आणि ते लोक अनंतकाळ राज्य करतील.

Interlinear

Choose Theme