योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! हे माझे मुलगे आहेत; हे मला देवाने दिले आहेत.”इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”
Cross references
आणि त्या शिकारीचे मला आवडणारे रुचकर जेवण तयार करुन माझ्याकडे आण म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.”
परमेश्वर तुला भरपूर पाऊस देवो म्हणजे हंगामाच्या वेळी तुझी सुपीक शेते तुला भरपूर धान्य व द्राक्षारस देतील.
एसावाने आपल्या बापाचे शब्द ऐकले तेव्हा त्याला फार राग आला व तो खिन्न झाला; हंबरडा फोडून तो बापाला म्हणाला, “तर मग मला ही आशीर्वाद द्या हो बाबा!”
मी सर्वसमर्थ देवयाची प्रार्थना करतो की त्याने तुला आशीर्वादित करावे; आणि तुला खूप मुले द्यावीत तू महान राष्ट्राचा पिता व्हावे अशी प्रार्थना करतो.
याकोब राहेलीवर रागावला; तो म्हणाला, “तुला पुत्रवती करायला मी काय देव आहे? देवानेच तुला मुले होऊ नयेत असे करुन ठेवले आहे.”
एसावाने आपल्या समोरील स्त्रिया व मुले पाहून विचारले, “तुझ्या बरोबर ही कोण मंडळी आहे?”याकोबाने उत्तर दिले, “देवाने मला दिलेली ही मुले आहेत, देवाने माझे कल्याण केले आहे.”
हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत; आणि हया गोष्टी त्यांचा बाप त्यांच्याशी बोलला; त्याने प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या योग्यातेप्रमाणे आशीर्वाद दिला.
देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, मोशे म्हणाला.
अशाप्रकारे वेशीपाशी जमलेले सर्व लोक आणि वडीलधारी माणसे म्हणाले,परमेश्वर कृपेने तुझ्याकडे येणारी स्त्री, इस्राएल घराण्याची स्थापना करणाऱ्या राहेल व लेआ यांच्यासारखी होवो. एफ्राथा येथे तू कर्ता पुरूष हो. बेथलेहेममध्ये प्रख्यात हो
यथावकाश तिला दिवस राहिले व मुलगा झाला. हन्नाने त्याचे नाव शमुवेल ठेवले. ती म्हणाली, “मी परमेश्वराकडे त्याला मागितले म्हणून त्याचे नाव शमुवेल.”
परमेश्वराकडे मी मुलगा मागितला आणि परमेश्वराने माझी इच्छा पूर्ण केली. परमेश्वराने हा मुलगा मला दिला.
एलकाना आणि त्याची बायको यांना एली मनापासून आशीर्वाद देई. तो म्हणे, “हन्नापासून तुला आणखी संतती होवो. परमेश्वराच्या आशीर्वादाने झालेला मुलगा तुम्ही परमेश्वराला दिलात, तेव्हा तुम्हाला आणखी मुले होवोत.”हन्ना आणि एलकाना मग घरी परतत.
हे सर्व हेमानचे मुलगे. हेमान हा राजा दावीदाचा द्रष्टा होता. देवाने हेमानला वंशवृध्दीचे वचन दिले होते. त्यानुसार हेमानला भरपूर मुलेबाळे झाली. देवाने हेमानला चौदा मुलगे आणि तीन मुली दिल्या.
आता ओबेद-अदोम, याची मुले. शामाया थोरला, अहोजाबाद दुसरा, यवाह तिसरा, साखार चौथा, नथनेल पाचवा,
मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे.
“माझी मुले आणि मी इस्राएल लोकांकरिता निशाणी आणि पुरावे आहोत. सीयोनच्या डोंगरावर राहणाऱ्या सर्वशक्तिमान परमेश्वराने आम्हाला पाठविले आहे.”
यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
विश्वासाने याकोब, जेव्हा तो मरत होता, तेव्हा त्याने योसेफाच्या प्रत्येक मुलाला आशीर्वाद दिला आणि आपल्या काठीवर तो टेकला असताना त्याने देवाची उपासना केली.