परमेश्वर तुला भरपूर पाऊस देवो म्हणजे हंगामाच्या वेळी तुझी सुपीक शेते तुला भरपूर धान्य व द्राक्षारस देतील.
Cross references
तेव्हा इसहाक म्हणाला,“तुला चांगल्या सुपीक जमिनीवर राहावयास मिळणार नाही व तुला भरपूर पाऊसही मिळणार नाही;
तसेच तुमचा बाप आणि तुमच्या घरची सर्व मंडळी यांना घेऊन माझ्याकडे या; तुम्हाला राहावयास मिसरमधील सर्वात उत्तम प्रदेश मी देईन आणि तुमच्या घरातील मंडळी, यांना आमच्या येथे असलेले उत्तम पदार्थ खावयास मिळतील.”
“आशेराची जमीन उत्तम अन्न भरपूर उपजवील; राजाला योग्य असे चांगले अन्नपदार्थ त्याजकडे असतील.”
योग्य आहे का? त्या प्रदेशात झाडे आहेत का? तेथील काही फळे बरोबर घेऊन या.” (हे पहिली द्राक्षे पिकण्याच्या वेळी घडले.)
“आणि मी तुला सर्वात चांगले जैतूनाचे तेल. नवीन द्राक्षारस आणि धान्य देत आहे. या गोष्टी इस्राएलचे लोक मला परमेश्वराला देतात. कापणीच्या वेळी या गोष्टी ते प्रथम गोळा करतात.
तो तुमच्यावर प्रेम करील, तुम्हाला आशीर्वाद देईल. तुमच्या राष्ट्राची तो वाढ करील. तो तुमच्या मुलाबाळांना आर्शीवाद देईल. तुमची शेते पिके तो आशीर्वादीत करील. तो तुम्हाला धान्य, नवीन द्राक्षारस व तेल देईल. तुमची गाया बैले, वासरे मेंढ्या व कोंकरे ह्यांना तो आशीर्वाद देईल. तुमच्या पूर्वजांना वचन दिलेल्या प्रदेशात हे सर्व आशीर्वाद तो तुम्हाला देईल.
तुमचा देव परमेश्वर तुम्हाला उत्तम देशात घेऊन जात आहे. ती भूमी सुजला, सुफला आहे. तेथे डोंगरात उगम पावून जमिनीवर वाहणारे नद्यानाले आहेत.
पण आता मिळणारी जमीन तशी नाही. इस्राएलमध्ये डोंगर आणि खोरी आहेत. आकाशातून पडणाऱ्या पावसाचे पाणी या भूमीला मिळते.
पर्जन्याप्रमाणे माझ्या बोधाचा वर्षाव होईल. तो बोध असेल जमिनीवरुन खळाळणाऱ्या पाण्यासारखा. हिरवळीवर झिमझिमणाऱ्या पावसासारखा. झाडाझुडुपांवर पडणाऱ्या पावसाच्या सरींसारखा.
योसेफा विषयी तो म्हणाला,“योसेफच्या भूमीवर परमेश्वराची कृपादृष्टी असो. परमेश्वरा, त्यांच्या देशात आकाशातून पावसाचा वर्षाव कर आणि त्यांच्या भूमीतून मुबलक पाणी दे.
“म्हणून इस्राएल सुरक्षित राहील. याकोबची विहीर त्यांच्या मालकीची आहे. धान्याने व द्राक्षारसाने संपन्न अशी भूमी त्यांना मिळेल. त्या प्रदेशावर भरपूर पाऊस पडेल.
गिलबोवाच्या डोंगरावर पाऊस किंवा दव न पडो! तिथल्या शेतातून यज्ञात अर्पण करण्यापुरतेही काही न उगवो! कारण शूरांच्या ढालींना तिथे गंज चढला शौलची ढाल तेलपाण्यावाचून तशीच पडली
गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”
लाकडासाठी वृक्षतोड करणाऱ्या तुमच्या सेवकांना मी पुढीलप्रमाणे मेहनताना देईन: 1,25,000 बुशेल गहू, 1,25,000 बुशेल जव, 115,000 गँंलन द्राक्षारस आणि 1,15,000 गँंलन तेल.”
परमेश्वरा तुझ्या घरातल्या चांगल्या वस्तूंमुळे त्यांना नवा जोम येतो. तू त्यांना तुझ्या अद्भुत नदीतून मनसोक्त पिऊ देतोस.
तू जमिनीची काळजी घेतोस तू तिच्यावर सिंचन करतोस आणि तिला धान्य उगवायला सांगतोस. देवा तू झरे पाण्याने भरतोस आणि पिकांना वाढू देतोस.
देव आपल्याला आनंदित करणारा द्राक्षारस देतो. आपली कातडी मऊ करणारे तेल देतो आणि आपल्याला बलवान बनवणारे अन्न देतो.
हर्मोन पर्वतावरुन सियोनवर पडणाऱ्या हळूवार पावसासारखे वाटते.सियोन पर्वतावरच परमेश्वराने त्याचे आशीर्वाद, त्याचे शाश्वत जीवनाचे आशीर्वाद दिले.
“आकाशातील ढगांतून चांगुलपणा पृथ्वीवर पडो. पृथ्वी दुभंगो तारण वाढो, आणि त्याचबरोबर चांगुलपणा वाढो. मी परमेश्वराने त्याला निर्मिले आहे.
परदेशातील मूर्तींत पाऊस पाडण्याचे सामर्थ्य नाही. पावसाच्या सरी पाडण्याची ताकद आकाशात नाही. तूच एक आमचे आशास्थान आहेस. या सर्व गोष्टी करणारा तूच एकमेव आहेस.”
मी इस्राएलासाठी दहिवराप्रमाणे होईन. इस्राएल लिलीप्रमाणे फुलेल, लबानोनमधील गंधसरूंप्रमाणे तो फोफावेल.
परमेश्वर त्याच्या लोकांशी बोलला. तो म्हणाला, “मी तुमच्याकडे पुन्हा धान्य, द्राक्षरस आणि तेल पाठवीन. तुम्ही तृप्त व्हाल. ह्यापुढे, इतर राष्ट्रांत तुमची अप्रतिष्ठा मी होऊ देणार नाही.
मग पुष्कळ राष्ट्रांमध्ये विखुरलेले याकोबचे वाचलेले लोक, परमेश्वराकडून पडलेल्या आणि माणसांवर अवलंबून नसलेल्या दवाप्रमाणे वाटतील. कोणासाठी पण न थांबणाऱ्या गवतावरच्या सरीप्रमाणे ते असतील.
“ते लोक शांततेत लागवड करतील. त्यांच्या द्राक्षवेलींना द्राक्षे लागतील. जमीन चांगली पिके देईल आणि आकाश पाऊस देईल. मी ह्या सर्व गोष्टी माझ्या ह्या लोकांना देईल.
सर्व काही चांगले आणि सुंदर होईल. सर्वत्र आश्चर्यकारक पीक येईल. पण हे पीक फक्त अन्नधान्य व मद्य देणारे नसेल तर तरुण - तरुणींचे असेल.
परंतु काही डहाळ्या तोडून टाकण्यात आल्या आणि तुम्ही रानटी जैतून असता कलम करुन लावले गेलात व जैतूनाच्या पौष्टिक मुळाचे भागीदार झालात.
इसहाकाने विश्वासाने याकोबाला व एसावाला पुढील काळासाठी आशीर्वाद दिले.