Home Bibles उत्पत्ति 27:4 · मराठी बायबल
उत्पत्ति 27:4 · मराठी बायबल

आणि त्या शिकारीचे मला आवडणारे रुचकर जेवण तयार करुन माझ्याकडे आण म्हणजे मग मी ते खाईन व मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.”

Cross references

उत्पत्ति 14:19

मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,“अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो.

उत्पत्ति 24:60

ते सर्व जाण्यास निघाले तेव्हा त्यांनी तिला निरोप देताना आशीर्वाद देऊन म्हटले,“आमचे भगिनी, तू लाखो लोकांची माता हो; तुझी संतती त्यांच्या शत्रुंचा बिमोड करुन त्यांची नगरे जिकूंन त्यांचा ताबा घेवोत.”

उत्पत्ति 27:7

तुझा बाप म्हणाला, “माझ्यासाठी शिकार घेऊन ये आणि त्याचे रुचकर जेवण करुन माझ्याकडे घेऊन ये म्हणजे मी ते खाईन आणि मरण्यापूर्वी तुला आशीर्वाद देईन.’

उत्पत्ति 27:14

तेव्हा त्याने जाऊन ते करडे आईकडे आणले; मग तिने त्यांचे त्याच्या बापाच्या विशेष आवडीचे रुचकर जेवण तयार केले;

उत्पत्ति 27:23

तो याकोब आहे असे इसहाकाला समजले नाही कारण त्याचे हात एसावाच्या हाता सारखे केसाळ होते; म्हणून त्याने याकोबाला आशीर्वाद दिला.

उत्पत्ति 27:25

मग इसहाक म्हणाला, “तू जेवण माझ्याकडे आण, मी ते खाईन, मग तुला आशीर्वाद देईन.” तेव्हा याकोबाने आपल्या बापाला जेवण दिले; ते त्यानी खाल्ले, त्याने त्यांना द्राक्षमद्यही दिले, आणि ते ते प्याले.

उत्पत्ति 27:27

मग याकोब आपल्या बापाजवळ गेला आणि त्याने बापाचे चुंबन घेतले; इसहाकाला एसावाच्या कपडयांचा वासा आला; तेव्हा त्याने त्याला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,परमेश्वराने आशीर्वाद दिलेल्या, पिकाने भरलेल्या शेताच्या सुगंधासारख माझ्या मुलाचा सुगंध दरवळत आहे.

उत्पत्ति 27:31

त्याने आपल्या बापाच्या विशेष आवडीचे रुचकर भोजन तयार केले, व तो ते घेऊन आपल्या बापाकडे आला, तो बापाला म्हणाला, “बाबा, उठा आणि तुमच्या मुलाने शिकार करुन आणलेल्या मृग मांसाचे हे रुचकर जेवण खा; आणि मग मला आशीर्वाद द्या.”

उत्पत्ति 28:3

मी सर्वसमर्थ देवयाची प्रार्थना करतो की त्याने तुला आशीर्वादित करावे; आणि तुला खूप मुले द्यावीत तू महान राष्ट्राचा पिता व्हावे अशी प्रार्थना करतो.

उत्पत्ति 48:9

योसेफ आपल्या बापास म्हणाला, “बाबा! हे माझे मुलगे आहेत; हे मला देवाने दिले आहेत.”इस्राएल म्हणाला, “तुझ्या मुलांना माझ्याकडे आण म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन.”

उत्पत्ति 48:15

आणि इस्राएलाने योसेफाला आशीर्वाद दिला; तो म्हणाला,“माझे पूर्वज अब्राहाम व इसहाक यांनी आपल्या देवाची उपासना केली व त्याच देवाने मला माझ्या सर्व आयुष्यभर चालवले आहे;

उत्पत्ति 49:28

हे सर्व इस्राएलाचे बारा वंश होत; आणि हया गोष्टी त्यांचा बाप त्यांच्याशी बोलला; त्याने प्रत्येक मुलाला ज्याच्या त्याच्या योग्यातेप्रमाणे आशीर्वाद दिला.

लेवीय 9:22

मग अहरोनाने लोकांकडे वळून, हात वर करुन त्यांना आशीर्वाद दिला आणि ज्या वेदीवर त्याने पापार्पण होमार्पण व शांत्यर्पणे केली होती तेथून तो खाली आला.

अनुवाद 33:1

देवाचा भक्त मोशे याने इस्राएल लोकांना आपल्या मृत्युपूर्वी असा आशीर्वाद दिला, मोशे म्हणाला.

यहोशवा 14:13

यहोशवाने यफुन्नेचा मुलगा कालेब याला आशीर्वाद दिला. तसेच हेब्रोन हे शहर त्याला दिले.

यहोशवा 22:6

एवढे बोलून यहोशवाने त्यांना निरोप दिला आणि ते निघाले. ते आपल्या घरी परतले

लूक 2:34

मग शिमोनाने त्यांना आशीर्वाद दिला, तो येशूची आई मरीया हिला म्हणाला, “इस्राएलात, हे मूल, अनेकांचे पडणे व उठणे यांस कारणीभूत ठरेल. जे चिन्ह नाकारले जाईल ते होण्याकरिता याची नेमणूक झाली आहे.

लूक 24:51

तो त्यांना आशीर्वाद देत असतानाच तो त्यांना सोडून गेला. आणि त्याला स्वर्गात घेण्यात आले.

इब्री लोकांस 11:20

इसहाकाने विश्वासाने याकोबाला व एसावाला पुढील काळासाठी आशीर्वाद दिले.

Interlinear

Choose Theme