Home Bibles यशया 56:3 · मराठी बायबल
यशया 56:3 · मराठी बायबल

यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”

Cross references

लेवीय 25:45

तसेच तुमच्या देशात राहाणाऱ्या परदेशीय किंवा उपऱ्या लोकांच्या कुटुंबात जन्मलेली मुले तुम्ही गुलाम म्हणून विकत घ्यावी; ती तुमची मालमत्ता होतील;

गणना 18:4

ते तुझ्या बरोबर असतील आणि तुला मदत करतील. ते दर्शन मंडपाची काळजी घ्यायला जबाबदार असतील. मंडपात जे काही काम करायचे असेल ते सर्व ते करतील. तू जेथे असशिल तेथे दुसरा कोणीही येऊ नये.

गणना 18:7

पण अहरोन फकत तू आणि तुझ्या मुलांनीच याजकाचे काम केले पाहिजे. वेदीजवळ फकत तुम्हीच जाऊ शकता. अति पवित्र स्थानाच्या पडद्याआड फकत तुम्हीच जाऊ शकता. मी तुला एक भेट देत आहे - याजक म्हणून तू करावयाची सेवा. माझ्या पवित्र स्थानाजवळ दुसरा कोणी आला तर त्याला मारुन टाकले जाईल.”

अनुवाद 23:1

“जो भग्नांड किंवा छिन्नेंद्रिय आहे त्याला परमेश्वराच्या उपासनेत सहभागी होण्यास मनाई आहे.

अनुवाद 23:2

ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.

अनुवाद 23:9

“युद्धावर छावणीत असताना जे जे म्हणून अशुद्धकारक त्यापासून दूर राहा.

यशया 14:1

पुढील काळात, परमेश्वर याकोबाला प्रेमाची पुन्हा प्रचिती देईल. तो इस्राएली लोकांची पुन्हा निवड करील. तो त्यांना त्यांची जमीन परत देईल. यहुद्यां व्यतिरिक्त अन्य लोक त्यांना येऊन मिळतील. ते एकत्र होतील आणि त्यांचा एकच वंश याकोबाचा वंश होईल.

यशया 39:7

तू ज्यांना जन्म देशील त्या तुझ्या मुलांना बाबेलचा राजा घेऊन जाईल. बाबेलच्या राजवाड्यात तुझी मुले नोकर म्हणून राहतील.”

यिर्मया 38:7

यिर्मयाला त्या अधिकाऱ्यांनी पाण्याच्या टाकीत टाकले हे एबद-मलेख याने ऐकले. एबद-मलेख कुश देशाचा होता. तो राजाच्या पदरी एक प्रतिहारीम्हणून होता. सिद्कीया राजा बन्यामीनच्या प्रवेशद्वाराशी बसला होता. म्हणून एबद-मलेख राजवाड्यातून निघाला आणि राजाशी बोलण्यासाठी त्या प्रवेशद्वाराजवळ गेला.

यिर्मया 39:16

“यिर्मया मूळ कुशचा रहिवासी असलेल्या एबद-मलेखला संदेश दे ‘सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलच्या लोकांना देव म्हणतो: माझे यरुशलेमबद्दलचे भाकीत मी लवकरच खरे ठरवीन. माझे संदेश अरिष्टावरुन खरे ठरतील, चांगल्या गोष्टी घडून नाही. सर्व गोष्टी खऱ्या ठरत असताना तू तुझ्या डोळ्यांनी पाहशील.

यिर्मया 50:5

ते सियोनची वाट विचारतील, व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. लोक म्हणतील, ‘चला, आपण स्वत: परमेश्वराला जाऊन मिळू या, अखंड राहणारा एक करार करु या. आपण कधीही विसरणार नाही असा करार करु या.’

दानीएल 1:3

नंतर नबुखदनेस्सर राजाने अश्पनजला हुकूम केला. (अश्पनज हा, राजाच्या सेवेत असणाऱ्या नपुंसक अधिकाऱ्यांतील सर्वांत महत्वाचा अधिकारी होता.) राजाने अश्पनजला, काही इस्राएली लोकांना त्याच्या राजवाड्यात आणण्यास सांगितले. नबुखद्नेस्सरला महत्वाच्या घराण्यातील आणि राजघराण्यातील इस्राएली लोक हवे होते.

सफन्या 2:11

ते लोक परमेश्वराला घाबरतील. का? कारम परमेश्वर त्यांच्या दैवतांचा नाश करील. मग दूरदूरच्या प्रदेशांतील सर्व लोक परमेश्वराची उपासना करु लागतील.

जखऱ्या 8:20

सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “भविष्यात, पुष्कळ गावचे लोक यरुशलेमला येतील.

मत्तय 8:10

येशूने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याला आश्चर्य वाटले आणि जे त्याच्यामागुन चालत होते. त्यांना तो म्हणाला, “मी तुम्हांला खरे सांगतो, इस्राएलात इतका मोठा विश्वास असलेला एकही मनुष्य मला आढळला नाही.

मत्तय 15:26

परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे बरे नाही.”

मत्तय 19:12

काही लोकांची लग्न न करण्याची कारणे निराळी असू शकतील. जन्मापासूनच काही माणसे अशी असतात की, ती मुलांना जन्म देऊ शकत नाहीत. इतर काही माणसांनी काही जणांना तसे बनविलेले असते तर आणखी काही माणसांनी स्वर्गाच्या राज्याकरिता लग्न करने सोडून दिले आहे, परंतू ज्याला लग्न करणे शक्य होईल, त्या मनुष्याने लग्नाविषयी ही शिकवण मान्य करावी.”

लूक 7:6

म्हणून येशू त्यांच्याबरोबर गेला. तो घरापासून दूर नव्हता, तोच शताधिपतीने मित्रांना असे सांगण्यासाठी पाठविले की, “प्रभु, आपण त्रास करुन घेऊ नका, कारण आपण माझ्या घरी यावे इतकी माझी योग्यता नाही.

प्रेषितांचीं कृत्यें 8:26

देवाचा दूत फिलाप्पाशी बोलला, तो म्हणाला “तयार हो आणि दक्षिणेकडे जा, यरुशलेमहून गाझाकडे जाणाऱ्या रस्त्याने जा - तो रस्ता वाळवंटातून जातो.”

प्रेषितांचीं कृत्यें 10:1

कर्नेल्य नावाचा मनुष्य कैसरीयामध्ये राहत होता. तो इटलीक नावाच्या पलटणीन शताधिपती होता.

प्रेषितांचीं कृत्यें 10:34

पेत्राने बोलायला सुरुवात केली: “मला आता हे खरोखर समजले आहे की, देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे.

प्रेषितांचीं कृत्यें 13:47

प्रभूने आम्हांला हे करण्यास सांगितले आहे. प्रभु म्हणाला:‘दुसऱ्या देशांसाठी मी तुम्हाला प्रकाश असे केले यासाठी की, तुम्ही पृथ्वीवरील सर्व लोकांना तारणाचा मार्ग दाखवू शकाल.”

प्रेषितांचीं कृत्यें 17:4

सभास्थानांमध्ये काही ग्रीक लोक होते, जे खऱ्या देवाची उपसाना करीत. तेथे काही महत्वाच्या स्त्रियाही होत्या. यातील पुष्कळ लोक पौल व सीला यांना जाऊन मिळाले.

प्रेषितांचीं कृत्यें 18:7

पौल तेथून निघाला आणि सभास्थानाजवळ राहत असलेल्या तीत युस्त नावाच्या देवाच्या भक्ताच्या घरी गेला.

रोमकरांस 2:10

परंतु जो चांगली कृत्ये करतो त्या प्रत्येकाला गौरव, मान आणि शांति मिळेल. प्रथम यहूद्यांना व मग ग्रीक लोकांना मिळेल.

रोमकरांस 15:9

यासाठी की यहूदीतर लोक देवाने त्यांच्यावर दाखविलेल्या दयेबद्दल गौरव करतील, पवित्र शास्त्रात लिहिले आहे:“म्हणून विदेशी लोकांमध्ये मी तुझे उपकार मानीन. आणि तुझ्या नावाची स्तुति करीन.” स्तोत्र. 18:49

रोमकरांस 15:16

ते हे की, विदेशी लोकांची सेवा करण्यासाठी मी ख्रिस्त येशूचा सेवक व्हावे व देवाच्या सुवार्तेचे याजकपण करावे, अशासाठी परराष्ट्रीय हे देवाला मान्य, पवित्र आत्म्याचे समर्पित असे व्हावे.

1 करिंथकरांस 6:17

पंरतु जो स्वत: प्रभूशी जडतो तो त्याच्याशी आत्म्यात एक आहे.

इफिसकरांस 2:12

आठवा की, त्यावेळी तुम्ही ख्रिस्तविरहित, देवाचे लोक जे इस्राएल त्या समाजातून तुम्हाला बहिष्कृत केले होते, आणि देवाच्या अभिवचनाशी निगडित अशा कराराशी तुम्ही परके असे होता, तुम्ही या जगात आशेशिवाय आणि देवाशिवाय जगला.

इफिसकरांस 2:22

त्याच्यामध्ये तुम्हीही इतरांबरोबर आत्म्याच्या द्वारे देवाचे राहण्याचे ठिकाण तयार करण्यासाठी एकत्र रचले जात आहात.

1 पेत्र 1:1

देवाचे निवडलेले लोक जे या जगात प्रवासी आहेत, जे पंत, गलतिया, कप्पदुकिया आशिया व बिथुनिया प्रांतात विखुरलेले आहेत त्या यहूदी लोकांना,

Interlinear

Choose Theme