Cross references
राहेल म्हणाली, “देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला मुलगा देण्याचे ठरवले;” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.
राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे - दान व नफताली;
“दान इस्राएलाच्या इतर वंशाप्रामाणे आपल्या लोकांचा न्याय करील.
दान वंशातला आम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर;
दान वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली;
छावण्यांच्या रागेतील सर्वात शेवटची तीन दले दान वंशाची होती. ती पुढे गेलेल्या दलांचे संरक्षण करणारी पिछाडीची तुकडी होती. तिच्यात पहिले दान कुळाचे लोक होते. ते त्यांच्या निशाणामागे चालले होते. अम्मीशद्दैचा मुलगा अहीएजर त्यांचा सेनानायक होता.
दानच्या कुळातील कुळे होती:शूहामचे शूहामी कूळ.हे कूळे दानच्या कुळातील होते.
दान विषयी मोशे म्हणाला, “दान म्हणजे सिंहाचा छावा. तो बाशान मधून झेप घेतो.”
दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर हे इस्राएलचे मुलगे होत.
शुप्पीम आणि हुप्पीम हे ईरचे वंशज आणि अहेरचा मुलगा हुशीम.
दानच्या वंशातून 28,000 जण युध्दाला तयार होते.