नफतालीचे मुलगे; यासहेल, गुनी, येसेर आणि शिल्लेम हे होते.
Cross references
बिल्हा पुन्हा गर्भवती झाली व तिला याकोबापासून दुसरा मुलगा झाला;
राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे - दान व नफताली;
“नफताली मोकळ्या सुटलेल्या बागडणाऱ्या हरिणीप्रमाणे होईल; त्याचे शब्द म्हणजे त्याचे बोलणे हरिणींच्या पाडसाप्रमाणे गोड व सुंदर असेल.”
नफताली वंशातला एनानाचा मुलगा अहीरा;”
नफताली वंशातील लोक म्हणजे त्यांची कुळे व त्यांच्या वाडवडिलांची घराणी ह्याप्रमाणे जितके पुरुष वीस वर्षाचे व त्याहून अधिक वयाचे असून सैन्यात सेवा करण्यास लायक होते त्या सर्वांची नोंद करण्यात आली.
नफतालीच्या कुळातील कुळे होती:यहसेलचे यहसेली कूळ. गूनीचे गूनी कूळ.
नफताली विषयी मोशेने सांगितले, नफताली, तुला सर्व चांगल्या गोष्टी “भरभरुन मिळतील. तुझ्यावर परमेश्वराचा आशीर्वाद राहील. गालील तलावाजवळचा प्रदेश तुला मिळेल.”
अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर हा इस्राएलवर चाल करुन आला. पेकह इस्राएलचा राजा होता तेव्हा हे घडले. तिग्लथ-पिलेसरने इयोन, आबेल, बेथ माका, यानोह, केदेश, हासोर, गिलाद, गालील आणि सर्व नफताली प्रांत घेतला. तसेच तेथील सर्व लोकांना कैद करुन अश्शूरला नेले.
दान, योसेफ, बन्यामीन, नफताली, गाद व आशेर हे इस्राएलचे मुलगे होत.
यहसिएल, गूनी, येसर आणि शल्लूम हे नफतालीचे मुलगे.हे सर्व बिल्हेचे वंशज.
नफतालीच्या घराण्यातून 1,000 सरदार आले. त्यांच्याबरोबर ढाली आणि भाले बाळगणारे 37,000 लोक होते.