Home Bibles उत्पत्ति 35:25 · मराठी बायबल
उत्पत्ति 35:25 · मराठी बायबल

राहेलीची दासी बिल्हा हिचे मुलगे - दान व नफताली;

Cross references

उत्पत्ति 29:29

(लाबानाने आपली दासी बिल्हा, आपली कन्या राहेल हिला दासी म्हणून दिली.)

उत्पत्ति 30:4

तेव्हा राहेलीने बिल्हा आपला नवरा याकोब ह्याला उपपत्नी म्हणून दिली; आणि याकोब तिजपाशी गेला;

उत्पत्ति 30:6

राहेल म्हणाली, “देवाने माझी प्रार्थना ऐकली आहे. त्याने मला मुलगा देण्याचे ठरवले;” म्हणून तिने त्याचे नाव दान ठेवले.

उत्पत्ति 37:2

याकोबाच्या वंशाचा हा वृत्तान्त आहे.योसेफ सतरा वर्षांचा उमदा तरुण होता. शेळ्यामेढ्यांचा सांभाळ करणे हे त्याचे काम होते. आपल्या भावांबरोबर (म्हणजे आपल्या बापाच्या बायका बिल्हा व जिल्पा यांच्या मुलांबरोबर) तो हे काम करीत असे; त्या भावांनी केलेल्या वाईट गोष्टीविषयी त्याने आपल्या बापाला सांगितले.

उत्पत्ति 46:23

दान याचा मुलगा हुशीम होता

उत्पत्ति 46:25

लाबानाने आपली मुलगी राहेल हिला दिलेल्या बिल्हेचे याकोबापासून झालेले मुलगे दान व नफताली आणि त्यांना झालेली संतती असे हे सात जण त्या कुटुम्बात होते.

यहोशवा 19:32

सहावा हिस्सा नफतालीच्या वंशजांना, त्याच्यातील कुळांना मिळाला.

यहोशवा 19:40

सातवा वाटा दानच्या वंशजांचा त्यांच्यातील प्रत्येक कुळाला जमिनीत हिस्सा मिळाला.

शास्ते 5:17

गिलाद लोक यार्देन नदीपलीकडल्या आपल्या छावणीत तसेच बसून राहिले. आणि दान लोकांनो, तुम्ही आपल्या गलबतांजवळ नुसते बसून का राहिलात? आशेर लोक समुद्रकाठी, सुरक्षित बंदरात तळ ठोकून राहिले.

शास्ते 5:18

पण जबुलून आणि नफताली यांनी मात्र डोंगरावरच्या त्या युध्दात प्राणांची पर्वा न करता पराक्रम केला.

Interlinear

Choose Theme