Home Bibles उत्पत्ति 44:20 · मराठी बायबल
उत्पत्ति 44:20 · मराठी बायबल

आणि आम्ही आपणास उत्तर दिले, ‘होय! आमचा बाप आहे, परंतु तो आता फार म्हातारा झाला आहे; तसेच आम्हाला एक धाकटा भाऊही आहे. आमच्या बापाच्या म्हातारपणी हा आमचा भाऊ जन्मला म्हणून आमच्या बापाचा त्याच्यावर फार जीव आहे; आणि त्याचा तरुण भाऊ मरण पावला; तेव्हा त्या दोघांच्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे; आणि म्हणूनच तो आमच्या बापाचा फार प्रिय व लाडका मुलगा आहे.’

Cross references

उत्पत्ति 35:18

त्या मुलास जन्म देताना राहेल मरण पावली परंतु मरण्यापूर्वी तिने त्याचे नाव बेनओनी’ असे ठेवले; परंतु याकोबाने त्याचे नांव बन्यामीन’ असे ठेवले.

उत्पत्ति 37:3

इस्राएल (याकोब) सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ झगा दिला होता.

उत्पत्ति 37:19

ते एकमेकांस म्हणाले, “हा पाहा, एकामागे एक स्वप्ने पडणारा योसेफ इकडे येत आहे.

उत्पत्ति 37:33

त्यांच्या बापाने तो झगा पाहिला आणि तो योसेफाचाच आहे हे ओळखले! तेव्हा त्याचा बाप म्हणाला, “होय! मुलांनो, हा त्याचाच झगा आहे! हिंस्र पशूने त्याला खाऊन टाकले असावे. माझा मुलगा योसेफ याला हिंस्त्र पशूने खाऊन टाकले आहे यात संशय नाही.”

उत्पत्ति 42:13

परंतु ते भाऊ म्हणाले, “नाही नाही महाराज! आम्ही सर्व भाऊच आहोत. आमच्या कुटुंबातील आम्ही एका बापाचे बारा मुलगे आहोत. आमचा सर्वात धाकटा भाऊ घरी बापाजवळ आहे. आणि आमचा दुसरा एक भाऊ फार पूर्वी मरण पावला. कनान देशातले आम्ही सर्व आपल्या दासासमान आहोत.”

उत्पत्ति 42:36

याकोब त्यांना म्हणाला, “मी माझ्या सर्व मुलांना मुकावे अशी तुमची इच्छा आहे काय? योसेफ गेला; शिमोनही गेला; आणि आता बन्यामीनालाही माझ्यापासून घेऊन जाण्याची तुमची इच्छा आहे!”

उत्पत्ति 42:38

परंतु याकोब म्हणाला, “मी बन्यामीनाला तुमच्याबरोबर पाठविणार नाही; त्याचा भाऊ मरण पावला आणि आता माझी बायको राहेल हिचा एवढा एकच मुलगा राहिला आहे. मिसरच्या फेरीत त्याला काही अपाय झाला तर त्यामुळे मला मरण येईल; आणि अतिशय दु:खी म्हातारा माणूस म्हणून तुम्ही मला कबरेत पाठवाल.”

उत्पत्ति 43:7

त्या भावांनी उत्तर दिले, “त्या प्रमुख अधिकाऱ्याने आम्हा सर्वाविषयी काळजी व चिंता दाखवून मोठया प्रेमाने व कळकळीने आपल्या घरच्या सर्वाविषयी विचारपूस केली, कारण त्याला आपल्या घरच्या सर्वाविषयी माहिती करुन घ्यावयास पाहिजे होती. त्याने आम्हाला विचारले, ‘तुमचा बाप अजून जिवंत आहे का? तुमचा एखादा भाऊ सध्या घरी आहे का?’ आम्ही तर तुसती त्याच्या प्रश्नांची उत्तरे दिली. आम्हाला काय माहीत की तो आमच्या भावाला त्याच्याकडे घेऊन यावयास सांगेल म्हणून.”

उत्पत्ति 44:27

मग आमचा बाप आम्हाला म्हणाला, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की माझी बायको राहेल हिच्या पोटी मला दोन मुलगे झाले;

उत्पत्ति 46:21

बन्यामीनाचे मुलगे; बेला, बेकेर, आशबेल, गेरा, नामान, एही, रोष, मुप्पीम, हुप्पीम आणि आर्द.

उत्पत्ति 49:8

“यहूदा, तुझे भाऊ तुझी स्तुती करतील; तू तुझ्या शत्रूंचा पराभव करशील; तुझे भाऊ तुला लवून नमन करतील.

लूक 7:12

तो गावाच्या वेशीजवळ आला असता, एका मेलेल्या माणसाला अंत्यविधीकरीता नेले जात होते. तो त्याच्या आईचा एकुलता एक मुलगा होता. आणि ती विधवा होती. आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते.

Interlinear

Choose Theme