Home Bibles उत्पत्ति 37:3 · मराठी बायबल
उत्पत्ति 37:3 · मराठी बायबल

इस्राएल (याकोब) सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती करीत असे कारण तो त्याचा म्हातारपणाचा मुलगा होता. त्याने योसेफाला एक विशेष सुंदर पायघोळ झगा दिला होता.

Cross references

उत्पत्ति 37:23

योसेफ त्याच्या भावजवळ येऊन पोहोंचला तेव्हा त्यांनी त्याच्यावर हल्ला केला; त्यांनी त्याचा विशेष सुंदर पायघोळ झगा फाडून टाकला.

उत्पत्ति 37:32

नंतर तो रक्ताने भरलेला झगा आपल्या बापाला दाखवून ते म्हणाले, “आम्हाला हा झगा सांपडला; हा झगा योसेफाचा आहे की काय?”

उत्पत्ति 44:20

आणि आम्ही आपणास उत्तर दिले, ‘होय! आमचा बाप आहे, परंतु तो आता फार म्हातारा झाला आहे; तसेच आम्हाला एक धाकटा भाऊही आहे. आमच्या बापाच्या म्हातारपणी हा आमचा भाऊ जन्मला म्हणून आमच्या बापाचा त्याच्यावर फार जीव आहे; आणि त्याचा तरुण भाऊ मरण पावला; तेव्हा त्या दोघांच्या आईचा हा एकच मुलगा राहिला आहे; आणि म्हणूनच तो आमच्या बापाचा फार प्रिय व लाडका मुलगा आहे.’

शास्ते 5:30

“माझी खात्री आहे. त्यांनी युध्द जिंकले. आता ते पराभूत लोकांकडून लूट गोळा करत आहेत ती आपसात वाटून घेत आहेत. प्रत्येक सैनिकाला एक-दोन मुली ही मिळाल्या आहेत. बहुधा सीसराला भरतकाम केलेल्या रंगीत वस्त्रांची लूट मिळाली. होय, सीसराला बहुमोल कापडच मिळाले असावे, पराक्रमी सीसराला पांघरण्यासाठी.”

2 शमुवेल 13:18

तेव्हा अम्नोनच्या नोकराने तिला तेथून बाहेर काढले आणि दरवाजा लावून घेतला.तामरने रंगीबेरंगी, पट्टट्यापट्ट्यांचा पायघोळ अंगरखा घातला होता. राजकन्या लग्नापूर्वी असा पोषाख करत असत.

स्तोत्रसंहिता 45:13

राजकन्या म्हणजे एक किमती आणि सोन्यात मढवलेला सुंदर हिरा आहे.

यहेज्केल 16:16

तुझ्या सुंदर वस्त्रांचा उपयोग तू तुझी पूजास्थाने सजविण्यासाठी केलास. आणि तेथे तू वेश्येसारखे वर्तन केलेस. तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या तू स्वाधीन झालीस.

योहान 3:35

पिता पुत्रावर प्रीति करतो, पित्याने सर्व गोष्टींवरील अधिकार पुत्राला दिलेला आहे.

योहान 13:22

तेव्हा तो कोणाविषयी बोलतो असा संशय धरून शिष्य एकमेकांकडे पाहू लागले.

Interlinear

Choose Theme