Home Bibles उत्पत्ति 44:27 · मराठी बायबल
उत्पत्ति 44:27 · मराठी बायबल

मग आमचा बाप आम्हाला म्हणाला, ‘मुलांनो, तुम्हाला माहीत आहे की माझी बायको राहेल हिच्या पोटी मला दोन मुलगे झाले;

Cross references

उत्पत्ति 29:18

याकोबाचे राहेलीवर प्रेम जडले होते; म्हणून याकोब लाबानमामास म्हणाला, “तुम्ही मला तुमच्या धाकट्या मुलीशी राहेलीशी लग्न करण्याची परवानगी देणार असाल तर मी तुमच्या घरी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.”

उत्पत्ति 29:28

त्याप्रमाणे याकोबाने आठवडाभर तो सर्व लग्न सोहळा पूर्ण केला; मग लाबानाने त्याची धाकटी कन्या राहेल त्याला बायको करुन दिली;

उत्पत्ति 30:22

मग देवाने राहेलीची प्रार्थना ऐकली; देवाने तिला मुल होणे शक्य केले;

उत्पत्ति 35:16

याकोब व त्याच्या बरोबराचा लवाजमा म्हणजे त्याची, घरची मंडळी व इतर माणसे हे सर्व बेथेल येथून निघाले, ते इफ्राथ (म्हणजे बेथलहेम) गांवाच्या अगदी जवळ आले असताना तेथे पोहोंचण्यापूर्वी राहेलीस प्रसूती वेदना सुरु झाल्या.

उत्पत्ति 46:19

योसेफ व बन्यामीन हे याकोबाची बायको राहेल हिचे मुलगे होते.

उत्पत्ति 46:22

योसेफ व बन्यामीन, याकोबापासून राहेलीस झाले व त्यांना झालेली संतती मिळून ते सर्व चौदा जण ह्या कुटुंबात होते.

Interlinear

Choose Theme