त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफास मिसर देशात नेऊन पोटीफर नांवाचा फारो राजाचा अधिकारी, गारद्यांचा सरदार होता त्यास विकून टाकले.
Cross references
अब्राहामाने पुन्हा लग्न केले, त्याच्या दुसऱ्या बायकोचे नाव कटूरा होते.
ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खाड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांस वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफास मिसर देशास घेऊन गेले.
योसेफाला विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांनी त्याला मिसरला नेले व फारो राजाचा एक अधिकारी गारद्यांचा म्हणजे संरक्षक दलाचा सरदार पोटीफर यास विकले.
त्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत तुरुंगात अटकेत राहिले.
बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याच्या कारकिर्दीच्या एकोणिसाव्या वर्षी, पाचव्या महिन्यात सातव्या दिवशी नबुखद्नेस्सर यरुशलेमवर चाल करुन आला. नबुजरदान हा राजाच्या उत्तम, निवडक सैन्याचा नायक होता.
मेजवानीच्या सातव्या दिवशी राजा अहश्वेरोश द्राक्षारस प्याल्याने उत्तेजित मन: स्थितीत होता. तेव्हा आपल्या तैनातीत असलेल्या महूमान, बिजथा, हरबोना, बिगथा, अवगथा, जेथर आणि कर्खस या सात खोजांना त्याने राणीला राजमुगुट घालून आपल्याकडे आणण्यास सांगितले. राणी खूप सुंदर होती. तेव्हा आपले सर्व अधिकारी व सरदार यांच्यासमोर तिने आपले रुप दाखवावे अशी त्याची इच्छा होती.
यहुदी नसलेले काही लोक देवाला येऊन मिळतील. ह्या लोकांनी असे म्हणू नये “देव त्याच्या लोकांबरोबर आमचा स्वीकार करणार नाही.” नपुसंकाने असे म्हणू नये “मी म्हणजे वठलेला वृक्ष आहे. मला मुले होऊ शकत नाहीत.”
अर्योक शिपायांचा म्होरक्या होता. तोच बाबेलमधील ज्ञानी माणसांना ठार मारणार होता. पण दानीएल त्याच्याशी चातुर्याने व विनयाने बोलला.