Home Bibles उत्पत्ति 40:4 · मराठी बायबल
उत्पत्ति 40:4 · मराठी बायबल

त्या सरदाराने त्या दोघाही अपराध्यांना योसेफाच्या ताब्यात देऊन त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले. ते दोघे काही काळपर्यंत तुरुंगात अटकेत राहिले.

Cross references

उत्पत्ति 37:36

त्या मिद्यानी व्यापाऱ्यांनी योसेफास मिसर देशात नेऊन पोटीफर नांवाचा फारो राजाचा अधिकारी, गारद्यांचा सरदार होता त्यास विकून टाकले.

उत्पत्ति 39:1

योसेफाला विकत घेतलेल्या व्यापाऱ्यांनी त्याला मिसरला नेले व फारो राजाचा एक अधिकारी गारद्यांचा म्हणजे संरक्षक दलाचा सरदार पोटीफर यास विकले.

उत्पत्ति 39:21

परंतु परमेश्वर योसेफाबरोबर होता; आणि योसेफावर परमेश्वराची दया सतत राहिली; काही काळानंतर तुरुंगाच्या अधिकाऱ्यास योसेफ आवडूं लागला.

उत्पत्ति 39:22

त्या अधिकाऱ्याने तुरुंगातील सर्व कैद्यांना योसेफाच्या स्वाधीन केले योसेफ; त्यांचा प्रमुख होता तरी पण तोही त्यांच्या सारखेच काम करी.

स्तोत्रसंहिता 37:5

परमेश्वरावर अवलंबून राहा. त्याच्यावर विश्वास ठेव. आणि तो जे करणे आवश्यक असेल ते करेल.

Interlinear

Choose Theme